Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्य सरकारचा मोठा निर्णय! २२ जुलै रोजी अजितदादांची जयंती शासकीय स्तरावर साजरी होणार; सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक जारी

राज्य सरकारने २२ जुलै रोजी अजितदादा पवार यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सर्व शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचे आदेश जारी.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 15, 2026 | 07:23 PM
राज्य सरकारचा मोठा निर्णय! २२ जुलै रोजी अजितदादांची जयंती शासकीय स्तरावर साजरी होणार (Photo Credit- X)

राज्य सरकारचा मोठा निर्णय! २२ जुलै रोजी अजितदादांची जयंती शासकीय स्तरावर साजरी होणार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • राज्य सरकारचा मोठा निर्णय!
  • २२ जुलै रोजी अजितदादांची जयंती शासकीय स्तरावर साजरी होणार
  • सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक जारी
मुंबई: राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश सन २०२६ मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला आहे. या संदर्भातील अधिकृत परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आले असून, मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये २२ जुलै रोजी शासकीय स्तरावर हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांचा तात्काळ निर्णय

अजितदादांच्या लोकसेवेचा आणि महाराष्ट्राच्या विकासातील त्यांच्या योगदानाचा गौरव व्हावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे यासंदर्भात आग्रही मागणी केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सामान्य प्रशासन विभागाने अवघ्या २४ तासांत हे परिपत्रक जारी केले.

Ajit Pawar: मोठी बातमी! अजितदादा पवार यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ द्या; राष्ट्रवादीच्या आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

मंत्रालयापासून ते शाळा-महाविद्यालयांपर्यंत होणार प्रतिमेचे पूजन

परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी राज्यभरात हा शासकीय उपक्रम राबवला जाईल. या दिवशी राज्यातील सर्व शासकीय यंत्रणांच्या कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाणार आहे. याशिवाय राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांमध्येही या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांवर या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

प्रशासनावरील मजबूत पकड, पायाभूत सुविधांचा विकास आणि लोककल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून शासनाने हा निर्णय घेतला असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Pravin Tarde : ‘पहिली भेट दादांच्या चरणी’; ‘देऊळबंद 2’ सिनेमाचे 100 कोटी पार! अजित पवारांच्या स्मृतिस्थळी केले वंदन

Web Title: Major decision by the state government ajit dadas birth anniversary to be celebrated at the government level on july 22

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 07:19 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Govenment
  • maharashtra news
  • NCP News

संबंधित बातम्या

Kolhapur: ‘गोकुळ टिकवण्याचं राजकारण जिंकणार’; सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल (Video)
1

Kolhapur: ‘गोकुळ टिकवण्याचं राजकारण जिंकणार’; सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल (Video)

राजकीय वर्तुळात खळबळ! राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांसह १४ जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
2

राजकीय वर्तुळात खळबळ! राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांसह १४ जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Mitti Cafe : दिव्यांगांच्या कौशल्याला नवे व्यासपीठ! राज्यपालांच्या हस्ते मिट्टी कॅफेचे उद्घाटन,
3

Mitti Cafe : दिव्यांगांच्या कौशल्याला नवे व्यासपीठ! राज्यपालांच्या हस्ते मिट्टी कॅफेचे उद्घाटन,

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर
4

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.