Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्र्यांचा मजीप्रा अधिकाऱ्यांना थेट दम! छत्रपती संभाजीनगरच्या पाणी योजनेत दिरंगाई खपवून घेणार नाही; फडणवीसांचा कडक इशारा

छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर आढावा बैठक घेतली. दिरंगाई करणाऱ्या मजीप्रा अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा देत कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 16, 2026 | 02:37 PM
छत्रपती संभाजीनगरच्या पाणी योजनेत दिरंगाई खपवून घेणार नाही; फडणवीसांचा कडक इशारा (Photo Credit- X)

छत्रपती संभाजीनगरच्या पाणी योजनेत दिरंगाई खपवून घेणार नाही; फडणवीसांचा कडक इशारा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • मुख्यमंत्र्यांचा मजीप्रा अधिकाऱ्यांना थेट दम!
  • छत्रपती संभाजीनगरच्या पाणी योजनेत दिरंगाई खपवून घेणार नाही
  • फडणवीसांचा कडक इशारा
छत्रपती संभाजीनगर: प्रश्न संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा मुख्यमंत्र्यांच्या अजंड्यावर आहे. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून दोन महिन्यात पाणी देण्याचा शब्द दिला होता. तो शब्द पूर्ण करण्यात अधिकारी खोडा घालत असल्याने जलवाहिनीचा मुख्यमंत्र्यांच्या दरबारात पोहोचला होता. मुंबईत झालेल्या बुधवारच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मजीप्रा अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत आताही वेळेत काम पूर्ण केले नाही तर कारवाईचा वडगा तुमच्यावर खूप आला जाऊ शकतो. म्हणून काम वेळेतच पूर्ण करा अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी दम भरला.

मुंबई येथील वर्षा शासकीय निवासस्थानी १५ जुलै रोजी झालेल्या छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट,
खासदार संदिपान भुमरे, आमदार सतीश चव्हाण, माजी खासदार डॉ. भागवत कराड उपस्थित होते. तर इमाव व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शहरातील शेवटच्या नागरिकापर्यंत नियमित व शुद्ध पाणी पोहोचविणे हे शासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पाणीपुरवठा विभागाने परस्पर समन्वयातून काम करत योजना वेळेत पूर्ण करावी.

छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक घरापर्यंत शुद्ध व नियमित पाणी पोहोचविण्याचा संकल्प! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थान, मुंबई येथे छत्रपती संभाजीनगर शहर पाणी पुरवठा योजनेसंदर्भात आढावा बैठक पार पडली. छत्रपती संभाजीनगरवासीयांना पुरेपूर पाण्याचा… pic.twitter.com/7tRMuWzRvB — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 15, 2026


कामातील कोणत्याही प्रकारचा विलंब सहन केला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. योजनेअंतर्गत अपूर्ण राहिलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. जलकुंभांचे बांधकाम, शहरातील पाणी वितरण यंत्रणेचे काम आणि इतर प्रलंबित कामे पूर्ण न झाल्याने शहराला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होत नसल्याची नोंद त्यांनी घेतली. संबंधित विभागाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कंत्राटदारासोबत स्वतंत्र बैठक घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

छ. संभाजीनगरमधील २.८५ लाख गुंठेवारी धारकांना मोठा दिलासा! ७/१२ रद्द करून मिळणार ‘पीआर कार्ड’; मनपा सभेत ठरावाला मंजुरी

हायड्रोलिक टेस्टिंगसह वितरण व्यवस्था कार्यान्वित करा

यावेळी महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष अनिल मकरिये, अपर मुख्य सचिव (नगर विकास) के. गोविंदराज, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव नायक, महापालिका आयुक्त अमोल येडगे, छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त जी. श्रीकांत आदी उपस्थित होते.

मनुष्यबळ वाढवा; टप्पानिहाय आराखडा सादर करा

योजनेची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराने पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. उर्वरित कामांचा टप्पानिहाय कृती आराखडा तयार करून पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला. पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे हायड्रोलिक टेस्टिंग कंत्राटदारामार्फत पूर्ण करून संपूर्ण यंत्रणा कार्यक्षम असल्याची खात्री करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. नळजोडण्यांचे प्रमाण वाढविण्यासह कंत्राटदाराच्या कामाचे नियमित मूल्यांकन करून आढावा घेण्याच्या सूचना दिल्या.
जुन्या पाणीपुरवठा वितरण यंत्रणेव्या कामामुळे खोदलेले रस्ते आणि खड्डे तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने रिस्टोरेशनची कामे गतीने पूर्ण करून पावसाळ्यात खड्ड्यांमुळे अपघात होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, जेणेकरून नागरिकांना त्याचा नाहक आस होणार नाही.

‘बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्या, अन्यथा…’, गोर सेनेचे प्रा. संदेश चव्हाण यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा

Web Title: Delays in the chhatrapati sambhajinagar water supply scheme will not be tolerated fadnavis issues a stern warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • CM Devendra Fadnavis
  • maharashtra news
  • Water supply

संबंधित बातम्या

CSMC Property Survey: मालमत्तांचे सर्वेक्षण आता खासगी एजन्सी करणार! मनपाचा हिरवा कंदील; पण ‘या’ नगरसेवकांचा तीव्र विरोध
1

CSMC Property Survey: मालमत्तांचे सर्वेक्षण आता खासगी एजन्सी करणार! मनपाचा हिरवा कंदील; पण ‘या’ नगरसेवकांचा तीव्र विरोध

Navi Mumbai : नवी मुंबईत ‘सांडपाणी प्रक्रिया’ धोरणाला हरताळ; पालिकेचा पुन्हा बोरवेलवरच भर?
2

Navi Mumbai : नवी मुंबईत ‘सांडपाणी प्रक्रिया’ धोरणाला हरताळ; पालिकेचा पुन्हा बोरवेलवरच भर?

Navi Mumbai: प्रकल्पग्रस्तांची घरे आणि सिडको घरे फ्री होल्ड करावीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मंदा म्हात्रेंची मागणी
3

Navi Mumbai: प्रकल्पग्रस्तांची घरे आणि सिडको घरे फ्री होल्ड करावीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मंदा म्हात्रेंची मागणी

Ghansoli News: घणसोलीतील सिम्प्लेक्सचा होणार क्लस्टर विकास, नागरिकांकडून ३० दिवसांत सूचना-हरकती मागविणार
4

Ghansoli News: घणसोलीतील सिम्प्लेक्सचा होणार क्लस्टर विकास, नागरिकांकडून ३० दिवसांत सूचना-हरकती मागविणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.