Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महालक्ष्मी धोबीघाटात १५० पीएनजी गॅसजोडण्या! लाकूड-कोळशाच्या वापराला मिळाला पूर्णविराम; प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

परिसरातील प्रदूषण कमी होऊन दरवर्षी सुमारे १५० टन कार्बन डायऑक्साइडचे होणारे उत्सर्जन थांबण्यास मदत होणार आहे. लाकूड आणि कोळशाच्या तुलनेत पीएनजी गॅस स्वस्त, सुरक्षित आणि हाताळण्यास सोपा असल्याने धोबी बांधवांच्या इंधन खर्चात बचत होण्यासाठी उपक्रम राबवण्यात आला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 06, 2026 | 09:30 AM
महालक्ष्मी धोबीघाटात १५० पीएनजी गॅसजोडण्या! लाकूड-कोळशाच्या वापराला मिळाला पूर्णविराम; प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

महालक्ष्मी धोबीघाटात १५० पीएनजी गॅसजोडण्या! लाकूड-कोळशाच्या वापराला मिळाला पूर्णविराम; प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

Follow Us
Follow Us:

मुंबईची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख असलेल्या जगप्रसिद्ध महालक्ष्मी धोबीघाट परिसराने वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी एक नवी पर्यावरणपूरक वाटचाल सुरू केली आहे. मुंबई महापालिकेच्या विशेष उपक्रमांतर्गत धोबीघाटातील कपडे भट्टी मालकांसाठी १५० पीएनजी जोडण्या कार्यान्वित करण्यात येत असून, यामुळे गेल्या कित्येक दशकांपासून कपडे उकळण्यासाठी चालणाऱ्या लाकूड आणि कोळशाच्या पारंपरिक वापराला आता विराम मिळण्यास सुरुवात झाली आहे.(फोटो सौजन्य – AI)

Mumbai Local मध्ये महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय! महिलांचा डबा ओळखणे होणार सोपे; ‘पिंक स्टॉपिंग पॉइंट’चा प्रस्ताव

महालक्ष्मी धोबीघाटात दररोज हजारो कपडे उकळण्यासाठी आणि स्वच्छ करण्यासाठी शेकडो भट्टयांमध्ये दगडी कोळसा व लाकूड जाळले जात असे. या जुन्या पद्धतीमुळे महालक्ष्मी, सात रस्ता आणि सभोवतालच्या परिसरात प्रचंड धूर पसरून मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत होते. सातत्याने धुराच्या संपर्कात आल्यामुळे येथे पिढ्यानपिढ्या काम करणाऱ्या धोबी बांधवांना दमा, खोकला आणि श्वसनाच्या गंभीर विकारांना सामोरे जावे लागत होते. मात्र, आता थेट पीएनजी गॅस लाईन जोडल्यामुळे हा परिसर धूरमुक्त होण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे.

पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, या बदलामुळे परिसरातील प्रदूषण कमी होऊन दरवर्षी सुमारे १५० टन कार्बन डायऑक्साइडचे होणारे उत्सर्जन थांबण्यास मदत होणार आहे. लाकूड आणि कोळशाच्या तुलनेत पीएनजी गॅस स्वस्त, सुरक्षित आणि हाताळण्यास सोपा असल्याने धोबी बांधवांच्या इंधन खर्चात बचत होत असून कपडे उकळण्याची प्रक्रिया जलद झाल्याने वेळेचीही बचत होत आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेच्या पर्यावरण विभागाने स्मशानभूमी, बेकरी आणि धोबीघाट अशा व्यावसायिक ठिकाणी नैसर्गिक गॅस किवा विद्युत जोडणीच्या माध्यमातून प्रदूषण थांबवण्याची मोहीम हाती घेतली आहे. मुंबई पालिकेच्या ‘क्लीन एअर’ आणि वायू प्रदूषण नियंत्रण मोहिमेतील हा एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे.

Mumbai Metro वर वाढता विश्वास; अवघ्या १७९ दिवसांत ३० कोटी प्रवाशांचा टप्पा पार, एमएमआरडीए मेट्रो नेटवर्कची मोठी झेप

८८ महालक्ष्मी धोबीघाटात एकूण ७३२ व्यावसायिक असून पहिल्या टप्प्यात १५० जणांना गॅस जोडणी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. गॅस कंपनीच्या काही तांत्रिक अडचणींमुळे कामास काहीसा विलंब होत असला, तरी या प्रकल्पामुळे व्यावसायिकांचा मोठा आर्थिक व आरोग्याचा फायदा होणार आहे, अशी माहिती संतोष कनोजिया, अध्यक्ष, धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास सहकारी संस्था लिमिटेड यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: 150 png gas connections at mahalaxmi dhobighat an end to the use of wood and coal a step towards a pollution free environment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • lpg cylinder
  • LPG Gas
  • Mumbai News

संबंधित बातम्या

IIT Bombay Student Suicide : ‘वरच्या जातीचा मी, तू खालच्या जातीचा’; साहिलच्या वडिलांचा गंभीर आरोप, क्राइम ब्रांचकडे तपास
1

IIT Bombay Student Suicide : ‘वरच्या जातीचा मी, तू खालच्या जातीचा’; साहिलच्या वडिलांचा गंभीर आरोप, क्राइम ब्रांचकडे तपास

Gunratna Sadavarte : लालबागचा राजा मंडळांविरुद्ध गुणरत्न सदावर्ते आक्रमक, हायकोर्टात दाखल करणार याचिका
2

Gunratna Sadavarte : लालबागचा राजा मंडळांविरुद्ध गुणरत्न सदावर्ते आक्रमक, हायकोर्टात दाखल करणार याचिका

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन
3

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन

Tapovan School Food Controversy: मेथीची भाजी डब्यात आणल्याने विद्यार्थ्याला दंड; मीरा भाईंदरमधील तपोवन शाळेला पालिकेची नोटीस
4

Tapovan School Food Controversy: मेथीची भाजी डब्यात आणल्याने विद्यार्थ्याला दंड; मीरा भाईंदरमधील तपोवन शाळेला पालिकेची नोटीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.