मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! जीबी सिंड्रोमचा पहिला रुग्ण आढळला
महाराष्ट्रात जीबी सिंड्रोम म्हणजेच गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) रुग्णांची संख्या वाढतच असून १७३ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १४० जणांना हा आजार झाल्याचं समोर आलं आहे. तर आतापर्यंत GBS च्या ६ संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
3 महिन्यात Liver होईल परफेक्ट त्वरीत करेल काम; हेल्थ कोचने सांगितले कोणता चहा ठरेल रामबाण उपाय
A total of 173 suspected patients have been detected till date. Out of these, 140 patients were diagnosed with Guillain-Barre Syndrome (GBS). A total of 6 deaths have occurred. Of these, 1 death was confirmed as GBS and 5 suspected deaths were reported: Maharashtra Health… pic.twitter.com/dHWlG00J7L
— ANI (@ANI) February 6, 2025
जीबीएसचे रुग्ण वाढल्यावर पुणे महापालिकेला जाग आली आहे. पुण्यातील दूषित पाणी आढळलेल्या आरओ प्लांटला महापालिकेकडून टाळं ठोकण्यात आलं आहे. सिंहगड रोड परिसरात १९ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. आरो प्लांटमध्ये कॉलिफॉर्म बॅक्टेरिया आढळला आहे.
नांदेड सिटी, किरकिटवाडी, नांदोशी धायरी, डीएसके विश्व, आंबेगाव आणि सिंहगड रस्ता परिसरातील रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्यामुळे महानगरपालिकेने या परिसरातील आरो प्लांटची पाहणी केली होती. त्यामध्ये कॉलिफॉर्म जिवाणू असल्याचं आढळलं होतं. त्यानुसार महापालिकेने या आरो प्लांटला नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर थेट कारवाई देखील करण्यात आली आहे. दरम्यान या आजाराने आता राज्यभर पाय पसरायला सुरू केलं आहे.
व्यायाम करताना कोणत्या कारणांमुळे वाढतो Heart Attack चा धोका? ‘या’ लोकांनी करू नये हेव्ही वर्कआऊट
पुण्याचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, ‘‘एनआयव्हीकडून आलेल्या अहवालानुसार जीबीएस आजार हा दूषित पाण्यामुळे होत असल्याचे स्पष्ट होत असून, काही प्रमाणात प्राण्याच्या विष्ठेमुळे देखील तो होऊ शकतो. यापार्श्वभूमीवर महापालिकेने या भागात तात्पुरत्या स्वरुपात एक एमएलडी इतक्या क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. एका महिन्यात हे केंद्र उभे केले जाईल. तसेच एनआयव्हीकडून पाण्यांचे नमूने घेताना ते दोन लिटर इतके घ्यावेत, तसेच ते दोन महिने साठवून ठेवून त्याची पुन्हा तपासणी करावी अशा सूचना केल्या आहेत. खासगी रुग्णालयांकडून नमूने पाठविण्यासंदर्भात सहकार्य केले जात नसल्याची चिंता अहवालात व्यक्त केली आहे. ’’