
आषाढी एकादशी काही दिवसांवर येऊन ठेपली
पंढरपुरात आजपासून आषाढी यात्रा संपेपर्यंत VIP दर्शन बंद
आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक पंढरपुरात पोहोचले
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा मोठा निर्णय
आषाढी एकादशी काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने पंढरपुरात (Pandharpur)वारकऱ्यांनी लगबग वाढू लागली आहे. महाराष्ट्रभर नाहीतर, अनेक देशांच्या विविध भागांतून लाखो वारकरी विठुरायाच्या चरणी येणार आहेत. याची दाखल घेऊन श्री- विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समिती जोरदार तयारीला लागली आहे. यंदा वारकऱ्यांच्या गैरसोय टाळण्यासाठी 16 जुलै ते 3 ऑगस्ट या कालवधीत श्री विठ्ठल- रुक्मिणीचे दर्शन दिवसरात्र सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
24 तास मुखदर्शन घेता येणार…
मंदिरातील परंपरेनुसार 16 जुलै रोजी शुभवेळेत श्रींचा पलंग काढण्याचा धार्मिक विधी पार पडेल. त्यानंतर प्रक्षाळपूजा होईपर्यंत भाविकांना दिवसाचे चोवीस तास मुखदर्शन घेता येणार आहे. याच काळात पदस्पर्श दर्शनही दररोज 22 तास 15 मिनिटे सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.
Pandharpur: आषाढी एकादशीला पंढरपुरात धनगर समाजाचा एल्गार! शेळ्या …
पलंग काढल्यानंतर मंदिरातील काही पारंपरिक राजोपचारांमध्ये तात्पुरते बदल होणार आहेत. काकडा आरतीसह काही विशिष्ट सेवा काही दिवसांसाठी स्थगित राहतील. मात्र, नित्य पूजा, महानैवेद्य, गंधाक्षता आणि इतर धार्मिक विधी पूर्वीप्रमाणेच नियमितपणे पार पडतील. त्यामुळे मंदिरातील दैनंदिन पूजा व्यवस्थेत कोणताही अडथळा येणार नाही.
वारीच्या काळात होणाऱ्या प्रमुख धार्मिक कार्यक्रमांचाही आराखडा निश्चित करण्यात आला आहे. शासकीय महापूजा, मंदिर समितीची पाद्यपूजा, संत भानुदास महाराज पुण्यतिथी, श्री विठ्ठलांच्या पादुकांची मिरवणूक आणि इतर पारंपरिक कार्यक्रम नियोजनानुसार पार पडणार आहेत. मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सर्व व्यवस्था वेळेत पूर्ण झाल्याचे सांगितले आहे.
15 जुलैपासून VIP दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद...
दरम्यान, यंदाच्या वारीत सर्वसामान्य भाविकांना समान संधी मिळावी, यासाठी 15 जुलैपासून VIP दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी किंवा शिफारस पत्राच्या आधारे विशेष प्रवेश दिला जाणार नाही. या निर्णयाचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
Pandharpur: आषाढी एकादशीला पंढरपुरात धनगर समाजाचा एल्गार! शेळ्या …
आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा महत्त्वाचा भाग मानली जाते. यंदा 24 तास दर्शनाची सुविधा आणि VIP प्रवेशबंदीमुळे सर्व भाविकांना अधिक सुलभ, शिस्तबद्ध आणि समान पद्धतीने विठ्ठलाचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.