Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी योजना-2026’ लागू; अपघाती मृत्यू, अपंगत्व आणि उपचारांसाठी लाखोंची आर्थिक मदत

आषाढी वारीसाठी पंढरपूरला येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने 'विठ्ठल रुक्मिणी वारकरी योजना-2026' लागू केली आहे. या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू, अपंगत्व आणि रुग्णालयीन उपचारांसाठी लाखोंची आर्थिक मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 14, 2026 | 09:35 PM
'विठ्ठल रुक्मिणी वारकरी योजना-2026' लागू; अपघाती मृत्यू, अपंगत्व आणि उपचारांसाठी लाखोंची आर्थिक मदत

'विठ्ठल रुक्मिणी वारकरी योजना-2026' लागू; अपघाती मृत्यू, अपंगत्व आणि उपचारांसाठी लाखोंची आर्थिक मदत

Follow Us
Follow Us:

पंढरपूर | शिवाजी हळणवर : आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे पायी, खासगी किंवा सार्वजनिक वाहनांद्वारे येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महसूल व वन विभागाने ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी योजना-२०२६’ लागू करत अपघाती मृत्यू, अपंगत्व आणि रुग्णालयीन उपचारासाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय १० जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आला असून, त्यावर महसूल व वन विभागाचे सहसचिव संपत सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने आदेश निर्गमित झाले आहेत.

शासन निर्णयानुसार आषाढी वारी सुरू झाल्यापासून ते वारी समाप्त होईपर्यंत म्हणजेच ७ जुलै ते २५ जुलै २०२६ या कालावधीत वारीदरम्यान अपघात किंवा दुर्घटनेत मृत्यू झालेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. मात्र नैसर्गिक मृत्यू, आत्महत्या, विषबाधा, खून किंवा अन्य अपघाताव्यतिरिक्त कारणांमुळे झालेल्या मृत्यूला या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या निकटच्या वारसदारांना ४ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. वारीदरम्यान अपघातामुळे ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ७४ हजार रुपये, तर ६० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास २ लाख ५० हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

Pandharpur: आषाढी एकादशीला पंढरपुरात धनगर समाजाचा एल्गार! शेळ्या-मेंढ्यांसह विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालणार; अन्…

अपघातामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यासही शासनाने मदतीची तरतूद केली आहे. एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी रुग्णालयात दाखल राहिल्यास १६ हजार रुपये, तर एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी उपचार घेतल्यास ५ हजार ८०० रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे.

वारी समाप्त झाल्यानंतर ३० जुलै २०२६ पर्यंत सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यात वितरित करण्यात आलेल्या मदतीचा तपशीलवार अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.

विठ्ठल रुक्मिणी वारकरी योजना-२०२६’मुळे आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांना शासनाच्या सामाजिक सुरक्षेचे संरक्षण मिळणार असून, दुर्घटना घडल्यास संबंधित कुटुंबीयांना तातडीचा आर्थिक आधार उपलब्ध होणार आहे.

तहसीलदारांचे प्रमाणपत्र आवश्यक

या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित वारकरी अथवा त्यांच्या वारसदारांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागणार आहे. अर्जासोबत आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे आल्याचे संबंधित तहसीलदारांचे प्रमाणपत्र, तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा मृत्यू प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहणार आहे. तहसीलदारांनी मागणीनुसार वारकरी वारीस उपस्थित असल्याची खातरजमा करून प्रमाणपत्र देण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार

शासनाने या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आर्थिक मदत मंजूर करून वितरित करण्याचे अधिकार दिले आहेत. अर्जांची पडताळणी करून अपघाताची व्याप्ती, वैद्यकीय कागदपत्रे आणि इतर पुरावे तपासल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना मदत वितरित करण्यात येणार आहे.

Pandharpur Wari 2026 : संत सोपानकाकांच्या पालखीच्या आगमनाने नीरा नगरी झाली विठ्ठलमय; १२६ दिंड्यांचे जल्लोषात स्वागत

निधीची स्वतंत्र तरतूद

या योजनेसाठी आवश्यक निधीची मागणी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल व वन विभागाकडे सादर करायची आहे. हा खर्च राज्य आपत्ती प्रतिसाद निधी तसेच उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागविण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

मदतीचा तपशील

अपघाती मृत्यू : ₹४,००,०००

४० ते ६० टक्के अपंगत्व : ₹७४,०००

६० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व : ₹२,५०,०००

७ दिवसांपेक्षा अधिक रुग्णालयात उपचार : ₹१६,०००

७ दिवसांपेक्षा कमी उपचार : ₹५,८००

Web Title: Vitthal rukmini warkari yojana 2026 financial assistance maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 09:35 PM

Topics:  

  • Ashadhi Ekadashi
  • Ashadhi Wari 2026
  • pandharpur
  • Solapur

संबंधित बातम्या

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश
1

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार
2

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.