Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pandharpur: आषाढी एकादशीला पंढरपुरात धनगर समाजाचा एल्गार! शेळ्या-मेंढ्यांसह विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालणार; अन्…

आषाढी एकादशीला पंढरपुरात धनगर समाज शेळ्या-मेंढ्यांसह विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालून आंदोलन करणार आहे. पंढरपूर कॉरिडॉरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारण्याची मुख्य मागणी करण्यात आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 14, 2026 | 09:24 PM
आषाढी एकादशीला पंढरपुरात धनगर समाजाचा एल्गार!

आषाढी एकादशीला पंढरपुरात धनगर समाजाचा एल्गार!

Follow Us
Follow Us:
  • आषाढी एकादशीला पंढरपुरात धनगर समाजाचा एल्गार!
  • शेळ्या-मेंढ्यांसह विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालणार
  • कॉरिडॉरमध्ये अहिल्यादेवींचे स्मारक उभारण्याची मागणी
पंढरपूर | शिवाजी हळणवर: आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाने विविध प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली असून, आषाढी एकादशीच्या दिवशी नामदेव पायरीचे दर्शन घेऊन शेळ्या-मेंढ्यांसह श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला प्रतिकात्मक प्रदक्षिणा घालून आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आषाढी यात्रेदरम्यान या आंदोलनाकडे वारकरी, प्रशासन आणि राज्य सरकारचे विशेष लक्ष लागले आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी पंढरपूर येथील रेस्ट हाऊस येथे धनगर समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बैठकीत आंदोलनाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. शासनाने तातडीने मागण्यांची पूर्तता न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

समाजाच्या प्रमुख मागण्यांमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण तात्काळ लागू करणे, पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पात उज्जैन व वाराणसीच्या धर्तीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारून त्याचा प्रकल्पात समावेश करणे, नगरपरिषद हद्दीतील अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनासाठी आरक्षित जागेवरील अतिक्रमणे हटविणे, सांस्कृतिक भवनाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उर्वरित निधी मंजूर करणे तसेच धनगर समाजातील सुशिक्षित युवकांना राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांमार्फत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Pandharpur Wari 2026 : संत सोपानकाकांच्या पालखीच्या आगमनाने नीरा नगरी झाली विठ्ठलमय; १२६ दिंड्यांचे जल्लोषात स्वागत

बैठकीस संतोष बंडगर, सोमनाथ ढोणे, माऊली हळणवर, विष्णू सुळे, प्रशांत घोडके, पंकज देवकते, सचिन कोळेकर, अरुण चौगुले, महेश येडगे, संजय लवटे, बालाजी एडगे, दत्तात्रय चौगुले, दादा लवटे, सूरज सलगर, समाधान चौगुले, अक्षय बोरकर यांच्यासह समाजाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आषाढी एकादशीच्या दिवशी होणाऱ्या या अनोख्या आंदोलनातून धनगर समाज शासनाचे लक्ष आपल्या प्रलंबित प्रश्नांकडे वेधणार असून, सरकार यावर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजनाच्या जागेवरच अतिक्रमण

एकीकडे पंढरपूर नगरपरिषद शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम राबवत असताना, दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनासाठी आरक्षित जागेवरच नव्याने अतिक्रमण करून घरे उभारण्यात आली आहेत. विशेष म्हणजे हि जागा शासनाच्या नोंदीत आरक्षित असून संबंधित अतिक्रमणाकडे नगरपरिषद प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, सामान्य नागरिकांवर कारवाई आणि आरक्षित शासकीय जागेवर अतिक्रमणाकडे दुर्लक्ष हा प्रशासनाचा दुहेरी निकष असल्याचे टिका करण्यात आली.महापूजेसाठी पंढरपुरात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांसमोर हा विषय मांडून भुमिपुजन झाले मग भवन कुठाय? आणि अतिक्रमणावर कारवाई का नाही? असा जाब विचारला जाणार असल्याचा इशारा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Ashadhi Ekadashi Special: पंढरीचा पांडुरंग आणि तिरूमलाचा व्यंकटेश या दोन्ही रूपांमागील साम्य काय? जाणून घ्या

Web Title: Dhangar samaj elgar protest with sheep at pandharpur vitthal temple ashadhi ekadashi marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 09:24 PM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • pandharpur

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.