Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निम्न वर्ध्याचे ३१ दरवाजे उघडले, प्रकल्प तुडुंब भरून वाहत असल्याने जिल्ह्यात सतर्कतेचा ईशारा

लोअर वर्धा प्रकल्पाचे (Lower Wardha Project ) सर्व ३१ दरवाजे १०० सेमी उघडण्यात आले. तर अप्पर वर्धा काही दरवाजेही उघडण्यात आले आहेत. दोन्ही प्रकल्पांचे पाणी वर्धा नदीत (Wardha River) सोडल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी पात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. आर्वी-कौंडण्यपूर रस्त्याची (Arvi-Koundanyapur road) वाहतूक ठप्प झाली आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Jul 25, 2022 | 05:28 PM
31 gates of lower Wardhya open, warning of vigilance in district as projects overflow

31 gates of lower Wardhya open, warning of vigilance in district as projects overflow

Follow Us
Close
Follow Us:

वर्धा : जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या दमदार पावसाने कहर केला. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प तुडुंब भरल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. रविवारी लोअर वर्धा प्रकल्पाचे (Lower Wardha Project ) सर्व ३१ दरवाजे १०० सेमी उघडण्यात आले. तर अप्पर वर्धा काही दरवाजेही उघडण्यात आले आहेत. दोन्ही प्रकल्पांचे पाणी वर्धा नदीत (Wardha River) सोडल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी पात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. आर्वी-कौंडण्यपूर रस्त्याची (Arvi-Koundanyapur road) वाहतूक ठप्प झाली आहे.

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मध्यम व लघु प्रकल्प यापूर्वीच भरले असून त्यापैकी ७ मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले असून, पूरसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. सध्याच्या परिस्थितीत धाम प्रकल्प, पोथरा प्रकल्प, मदन प्रकल्प, मदन उन्नई धरण, वर्धा कार नदी आणि सुकळी लघु प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. उर्वरित प्रकल्पांनीही धोक्याची रेषा ओलांडली आहे. कवडी, सावंगी, लहादेवी, पारगोठाण अंबाझरी, पांजरा बोथली, उमरी, टेंभरी, आंजी बोरखेडी, दहेगाव गोंडी, कुऱ्हा, रोठा-१, रोठा- २, आष्टी, पिलापूर, कन्नमवरग्राम, परसोडी, मलकापूर, हराशी हे छोटे प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. प्रकल्पांतून दिवसेंदिवस पाणी वाहत असून त्यामुळे लहान – मोठे नाले तुडुंब भरून शेतात व गावांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

रात्रभर राहिले नागरिक जागे

धाम नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने सेलू तालुक्यातील येळाकेळी गावात पुराचे पाणी शिरले होते. लहान पुलावर पाणी वाढल्यामुळे नागरिकांच्या काही घरात पाणी शिरले होते. परिणामी, भितीच्या पोटी नागरिक रात्रभर जागे.

घरांचे नुकसान झाले, विहिरी कोसळल्या

कारंजा तालुक्यात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. पूर व पावसाच्या पाण्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सरवाडी मंडल, कारंजा मंडळ, ठाणेगाव मंडलात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कन्नमवारग्राम मंडळ परिसर, अनेक घरांची पडझड झाली. शेत विहिरी कोसळल्या, पीक जमीन पुराच्या पाण्यात वाहून गेली, अनेक कुटुंबे बाधित, ठाणेगाव येथील रहिवासी सिंधू भिसे यांचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त.

पुरातून वाचला तरुण

आर्वी तालुक्यात पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. कोपरा पुनर्वसन येथे राहणारा २४ वर्षीय तरुण शनिवारी रात्री ९ वाजता बाकडी नदीला आलेल्या पुराच्या तडाख्यात आला होता. तो अडकल्याची माहिती मिळताच जिल्हा बचाव व शोध पथकाने घटनास्थळी पोहोचले. तरुणाला पुरातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.

आष्टीत सतर्कतेचा इशारा

आष्टी तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ४ प्रकल्प आज सकाळी ८ वाजता १०० टक्के क्षमतेने भरले आहे. त्यात आष्टी लघू, प्रकल्प, पिलापूर लघू प्रकल्प, परसोडी लघू प्रकल्प व मलकापूर लघू प्रकल्पाचा समावेश आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने प्रकल्पातील पाणी नदी पात्रात सोडले जात आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाचा वतीने करण्यात आले आहे.

कौढण्यपूर- आर्वी रस्ता बंद

२३ जुलै रोजी झालेल्या सततधार पावसामुळे आर्वी तालुक्यातील कौंढण्यपूर येथील पुलावरुन पाणी वाहत असल्याने कौढण्यपूर ते आर्वी रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक ठप्प पडली होती. याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.

आतापर्यंत ८७४.५ मिमी पाऊस

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून, त्यामुळे सर्व जलाशय, नद्या, नाले तुडुंब भरले आहे. जूनअखेरपर्यंत जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला होता. मात्र, जुलै महिन्यांत पावसाने दोन आठवड्याभ-यापासून हजेरी लावल्यामुळे आतापर्यंत ८७४.५ मिमी पाऊस झाला आहे असून कारंजा, समुद्रपूर तालुक्यात १०० टक्क्यांवर पाऊस झाल्याची नोंद आहे.

Web Title: 31 gates of lower wardhya open warning of vigilance in district as projects overflow nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2022 | 05:27 PM

Topics:  

  • wardha News
  • wardha river

संबंधित बातम्या

Wardha News : अजनी ते पुणे वंदे भारत रेल्वेला आजपासून सुरु
1

Wardha News : अजनी ते पुणे वंदे भारत रेल्वेला आजपासून सुरु

‘तू मला दारू पाजली नाही’ असे म्हणत तरुणावर चाकूने वार; वर्ध्यातील धक्कादायक घटना
2

‘तू मला दारू पाजली नाही’ असे म्हणत तरुणावर चाकूने वार; वर्ध्यातील धक्कादायक घटना

अपत्यप्राप्तीच्या नावावर दाम्पत्याला गंडवलं; शेतीही विकली अन् नंतर 22 लाखांची फसवणूक झाली
3

अपत्यप्राप्तीच्या नावावर दाम्पत्याला गंडवलं; शेतीही विकली अन् नंतर 22 लाखांची फसवणूक झाली

Wardha News :  महाराष्ट्र जलजीवन मिशनमध्ये साडेबारा हजार कोटी थकीत; बांधकाम कंत्राटदारांचा आत्मदहनाचा इशारा
4

Wardha News : महाराष्ट्र जलजीवन मिशनमध्ये साडेबारा हजार कोटी थकीत; बांधकाम कंत्राटदारांचा आत्मदहनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.