Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : दुष्काळ निवारणासाठी ‘जलतारा’ देणार बळ, प्रशासन सज्ज; साडे आठ लाख मनुष्यदिनची रोजगार निर्मिती

Wardha News : वर्धा जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जलतारा उपक्रमाला गती देण्याचे नियोजन केले असून, ५२१ ग्रामपंचायतींमधून ८.३३ लाख मनुष्यदिन रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 17, 2026 | 02:54 PM
drought water shortage

drought water shortage

Follow Us
Follow Us:
  • वर्धा जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट
  • ५२१ ग्रामपंचायतींमध्ये जलताराची कामे
  • प्रशासनाचा मोठा रोजगारनिर्मिती प्लॅन

Wardha News : यंदाच्या मान्सून काळात जिल्ह्यात अल्प पर्जन्यमान झाले. तर आगामी काळात जिल्ह्यातील नागरिकांना कोरड्या दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागणार आहे. या कठीण प्रसंगावर मात करण्यासह होतकरूंच्या हाताला काम मिळावे या हेतूने जिल्हा प्रशासनाच्यावतीने आतापासूनच नियोजन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी पराग सोमण यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने जलताराची १०० कामे घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतींत आगामी काळात या कामांतून तब्बल ८.३३ लाख मनुष्यदिन रोजगाराची निर्मिती होणार आहे.

पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संगोपन व्हावे तसेच ते जमिनीत मुरावे याकरिता जलतारा हा महत्वाकांशी उपक्रम ठरतो. तर आगामी काळात दुष्काळाच्या झळा मजुरांनाही सोसाव्या लागणार आहे. अशा परिस्थितीत दुष्काळाशी लढा देणे आणि भविष्यात पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरावा हा उद्देश असलेल्या जलताराची प्रत्येक ग्रामपंचायतींनी १०० कामे हाती घ्यावे, अशा सूचना जि. प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी सोमण यांनी आठही पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या सूचनांना केंद्र स्थानी ठेवून जिल्ह्यातील आठही तालुक्यांत भागात प्रामुख्याने ग्रामीण जलसंधारणाची ही कामे केली जाणार आहे. या कामांमुळे होतकरूंना गावातच काम मिळणार आहे.

पंचवार्षिकची ११,४७९ कामे मंजूर

व्हीबीजी रामजी योजनेंतर्गत विविध कामे जिल्ह्यात केली जाणार आहेत. २०२६-२७ते २०३०-३१ या पाच वर्षांच्या काळात जिल्हा परिषद म्हणजेच ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ११,४७९ कामे करण्यास प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या कामातून २० लाख ३७ हजार ४४० मनुष्यदिन रोजगाराची निर्मिती होणार आहे. यापैकी जास्तीत जास्त कामे यंदाच्या दुष्काळी काळात पूर्ण करण्याचा मानस प्रशासनाचा असल्याचे सांगण्यात आले.

Wardha News : वर्ध्याच्या 209 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला ब्रेक, 14 गावांच्या पाणीपुरवठा योजनेचं पुढे काय?

मागेल त्याला मिळणार काम

दुष्काळी संकट काळात व्हीबीजी रामजी योजनेंतर्गत रोजगारासाठी पात्र ठरणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांला काम देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने प्रयत्न होणार आहे. नोंदणीकृत मजुराने कामाची मागणी नोंदविताच झटपट त्यावर कार्यवाही होत त्या होतकरूला काम उपलब्ध करून दिले जाणार आहे.

८७२२ कामे प्रगतिपथावर

व्हीबीजी रामजी योजनेंतर्गत जिल्ह्यात सध्यास्थितीत ८ हजार ७२२ विविध कामे प्रगतिपथावर आहेत. तर दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून ५ हजार ७६२ कामांचा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

याबाबत बोलताना वर्धा जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. ज्ञानदा फणसे म्हणाल्या, “८८ दुष्काळाशी लढा देण्याच्या उद्देशाने जिल्हातील ५२१ ग्रामपंचायतींद्वारे प्रत्येकी १०० जलताराची कामे घेतली जाणार आहे. होतकरू ग्रामिणांना गावातच काम मिळावे हा त्यामागील उद्देश आहे. मागेल त्याला काम उपलब्ध करून दिले जाणार आहे.”

Wardha News : जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग गडद, आठही तालुके दुष्काळी यादीमध्ये, आगामी काळात पाणीटंचाई वाढण्याची चिंता

💡

Frequently Asked Questions

  • Que: वर्धा जिल्ह्यात जलतारा उपक्रम का राबवला जाणार आहे?

    Ans: पावसाचे पाणी जमिनीत मुरवून जलसंधारणाला चालना देणे आणि दुष्काळाच्या काळात ग्रामीण मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

  • Que: जलतारा उपक्रमातून किती रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट आहे?

    Ans: वर्धा जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतींमध्ये नियोजित कामांतून ८.३३ लाख मनुष्यदिन रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

  • Que: वर्धा जिल्ह्यात व्हीबीजी रामजी योजनेंतर्गत किती कामे मंजूर झाली आहेत?

    Ans: २०२६-२७ ते २०३०-३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी जिल्ह्यात ११ हजार ४७९ कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

Web Title: Wardha news drought jaltara 8 33 lakh man days employment vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • drought news
  • Maharashtra Drought 2026
  • wardha News

संबंधित बातम्या

Maharashtra Drought 2026: दुष्काळाचा हाहाकार! पाच दुष्काळ पाहिलेल्या ९५ वर्षीय वृद्धाची हृदयद्रावक हाक; ‘अशी परिस्थिती कधी…’
1

Maharashtra Drought 2026: दुष्काळाचा हाहाकार! पाच दुष्काळ पाहिलेल्या ९५ वर्षीय वृद्धाची हृदयद्रावक हाक; ‘अशी परिस्थिती कधी…’

Sambhajinagar News: ५ हजारांत दिवाळी कशी करायची? शेतकऱ्यांची चेष्टा थांबवून १ लाख द्या : रोहित पवारांची टिका
2

Sambhajinagar News: ५ हजारांत दिवाळी कशी करायची? शेतकऱ्यांची चेष्टा थांबवून १ लाख द्या : रोहित पवारांची टिका

BEED : पेरणीसाठी हजारोंचा खर्च, उत्पन्न शून्य, बीडच्या शेतकऱ्यांची दुष्काळापुढे हतबलता
3

BEED : पेरणीसाठी हजारोंचा खर्च, उत्पन्न शून्य, बीडच्या शेतकऱ्यांची दुष्काळापुढे हतबलता

Marathwada Drought Impact : गेवराईचे जिनिंग धोक्यात, दुष्काळामुळे कोट्यवधींच्या उलाढालीस ब्रेक
4

Marathwada Drought Impact : गेवराईचे जिनिंग धोक्यात, दुष्काळामुळे कोट्यवधींच्या उलाढालीस ब्रेक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.