Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : वर्धेकरांनो, पाणी जपून वापरा! १४ गावांचा पाणीपुरवठा ५ दिवस बंद, २१ ऑक्टोबरपासून तांत्रिक कामासाठी शटडाऊन

Wardha News : वर्ध्यात १४ गावांचा पाणीपुरवठा २१ ऑक्टोबरपासून सलग पाच दिवस बंद राहणार आहे. समृद्धी महामार्गावर जलवाहिनी जोडणीचे काम होणार असून, महिनाअखेरीस आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 18, 2026 | 03:27 PM
Water Shortage

Water Shortage

Follow Us
Follow Us:
  • वर्ध्यात १४ गावांचा पाणीपुरवठा पाच दिवस बंद
  • २१ ऑक्टोबरपासून तांत्रिक काम
  • समृद्धी महामार्गावर जलवाहिनी जोडणीचे काम
 

Wardha News : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पिपरी-मेधेसह १४ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत २१ ऑक्टोबरपासून सलग ५ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. आवश्यक तांत्रिक कामासाठी हा शटडाऊन घेण्यात येणार असून, संबंधित गावांतील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन वापरासाठी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केले आहे.

समृद्धी महामार्गावरील इंटरचेंज क्रमांक ४, येळकेळी परिसरात ७०० मिमी व्यासाची डक्टाइल आयर्न (डीआय) जलवाहिनी क्रॉसिंग करून सध्याच्या मुख्य कच्च्या पाणी उपसा पाइपलाइनला जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम करण्यात येणार आहे. हे गुंतागुंतीचे असल्याने ते सुरक्षितपणे पूर्ण काम तांत्रिकदृष्ट्या जलवाहिनीतून होणारा करण्यासाठी मुख्य पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवणे आवश्यक आहे.

नियोजित शटडाऊनमुळे पिपरी (मेघे), कारला, साटोडा, आलोडी, नालवाडी, म्हसाळा, वरूड, सिंदी मेधे, उमरी मेघे, सावंगी मेघे, बोरगाव-मेधे, वायगाव (निपाणी) आणि सेलू (काटे) या गावांतील पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. संबंधित गावांतील नागरिकांनी २१ ऑक्टोबरपूर्वी पुढील चार ते पाच दिवसांच्या गरजेनुसार पिण्याचे तसेच दैनंदिन वापराचे पाणी साठवून ठेवावे, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.

Wardha News : दुष्काळ निवारणासाठी ‘जलतारा’ देणार बळ, प्रशासन सज्ज; साडे आठ लाख मनुष्यदिनची रोजगार निर्मिती

महिनाअखेरीस आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा ?

दरम्यान, पिपरीसह १४ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या धाम जलाशयात सध्या केवळ ७० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. परिणामी, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस पिपरीसह १४ गावांमध्ये आठवड्‌यातून केवळ एकदाच पाणीपुरवठा करण्याचा निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.

काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्याने पुरवठा

जलवाहिनीचे क्रॉसिंग आणि जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक तांत्रिक तपासणी करण्यात येईल. त्यानंतर पाणीपुरवठा टप्याटप्प्याने पूर्ववत केला जाणार आहे. त्यामुळे काही भागांत नियमित पाणीपुरवठा सुरू होण्यास आणखी वेळ लागू शकतो. या आवश्यक कामासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता दीपक धोटे यांनी केले आहे.

Wardha News : वर्ध्याच्या 209 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला ब्रेक, 14 गावांच्या पाणीपुरवठा योजनेचं पुढे काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: वर्ध्यात १४ गावांचा पाणीपुरवठा कधी बंद राहणार आहे?

    Ans: तांत्रिक कामासाठी २१ ऑक्टोबरपासून सलग पाच दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन आहे.

  • Que: पाणीपुरवठा बंद राहणाऱ्या गावांमध्ये कोणत्या गावांचा समावेश आहे?

    Ans: पिपरी (मेघे), कारला, साटोडा, आलोडी, नालवाडी, म्हसाळा, वरूड, सिंदी मेधे, उमरी मेघे, सावंगी मेघे, बोरगाव-मेधे, वायगाव (निपाणी) आणि सेलू (काटे) या गावांचा समावेश आहे.

  • Que: महिनाअखेरीस आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होणार का?

    Ans: धाम जलाशयातील पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर असा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Web Title: Wardha news 14 villages water supply shutdown october 21 vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • drought news
  • wardha
  • wardha News
  • Water Shortage
  • Water Supply Issue

संबंधित बातम्या

Buldhana: अवैध पाणी उपशावर कारवाई करा, पाणीटंचाई निवारणासाठी सज्ज राहा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
1

Buldhana: अवैध पाणी उपशावर कारवाई करा, पाणीटंचाई निवारणासाठी सज्ज राहा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Yavatmal News: दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान! पाच हजारांच्या मदतीची चर्चा; शेतकऱ्यांमध्ये नाराजी
2

Yavatmal News: दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान! पाच हजारांच्या मदतीची चर्चा; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Beed News : बीडमध्ये दुष्काळाचे संकट गडद; २२५ टँकर्स सुरू, सुनेत्रा पवारांनी दिले महत्त्वाचे निर्देश
3

Beed News : बीडमध्ये दुष्काळाचे संकट गडद; २२५ टँकर्स सुरू, सुनेत्रा पवारांनी दिले महत्त्वाचे निर्देश

Tukaram Mundhe on Maharashtra Drought : दुष्काळात ‘या’ व्यवसायाची मोठी संधी, तुकाराम मुंढेंनी दिला शेतकऱ्यांना कानमंत्र
4

Tukaram Mundhe on Maharashtra Drought : दुष्काळात ‘या’ व्यवसायाची मोठी संधी, तुकाराम मुंढेंनी दिला शेतकऱ्यांना कानमंत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.