Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : वर्ध्याच्या 209 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला ब्रेक, 14 गावांच्या पाणीपुरवठा योजनेचं पुढे काय?

Wardha News : वर्धा शहरासह पिपरी (मेघे) आणि परिसरातील 14 गावांसाठी प्रस्तावित 209 कोटी 65 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. 2057 पर्यंतची पाण्याची गरज लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पाला शहराच्या हद्दवाढीच्या मुद्द्यामुळे विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 15, 2026 | 09:07 PM
water tank

water tank

Follow Us
Follow Us:
  • वर्ध्याची 209 कोटींची पाणीपुरवठा योजना अडकली
  • 2057 पर्यंतच्या पाण्याचं नियोजन
  • 29 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचाही प्रस्ताव
 

Wardha News : वर्धा शहरासह परिसरातील गावांमध्ये वाढणारी लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तयार केलेल्या नवीन जलपुरवठा योजनेला सध्या ब्रेक लागला. ऑक्टोबर २०२५ मध्ये मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आलेला हा प्रस्ताव अद्याप प्रलंबित असल्याची माहिती समोर आली. आगामी ३० वर्षांतील पाण्याची गरज लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या मंजुरीबाबत अद्याप स्पष्टता नाही.

संबंधित योजनेत वर्धा शहरासह पिपरी (मेघे) आणि अन्य १४ गावांचा समावेश करण्यात आला होता. योजनेचा एकूण प्रस्तावित खर्च २०९ कोटी ६५ लाख ८७हजार रुपये असून, त्याअंतर्गत २०५ किमी लांबीची नवीन वितरण जलवाहिनी टाकण्याचे नियोजन करण्यात आले होते. तसेच जुन्या प्रादेशिक जलपुरवठा योजनेतील विविध कामांची दुरुस्तीही केली जाणार होती. वर्धा शहरातील वाढते नागरीकरण, शैक्षणिक संस्थांची वाढती संख्या आणि सुमारे साडेचार लाख लोकसंख्येच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्याची गरज लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली होती. २०५७पर्यंतची पाण्याची गरज पूर्ण करून भविष्यातील संभाव्य जलसंकट टाळणे, हा या योजनेमागील मुख्य उद्देश होता.

Wardha News : जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग गडद, आठही तालुके दुष्काळी यादीमध्ये, आगामी काळात पाणीटंचाई वाढण्याची चिंता

भविष्यात वर्धा शहराच्या हद्दीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन योजनेच्या प्रस्तावात काही सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आवश्यक बदलही करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा आता योजनेच्या मंजुरीत अडथळा ठरत असल्याची माहिती आहे. शहरालगतच्या काही ग्रामपंचायतींनी हद्दवाढीला विरोध केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे योजनेच्या अंतिम मंजुरीचा प्रश्न कायम असून, ती कधी मार्गी लागणार, याबाबत अनिश्चितता आहे.

योजनेत कोणती कामे प्रस्तावित?

नव्या जलपुरवठा योजनेंतर्गत अनेक महत्त्वाची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यात प्रामुख्याने येळाकेळी येथील हेडवक्र्स, जुन्या हेडवक्र्सची दुरुस्ती आणि नवीन हेडवक्र्क्सची उभारणी. हनुमान टेकडी येथील जलशुद्धीकरण केंद्र भागातील जुन्या केंद्राची दुरुस्ती आणि २९ एमएलडी क्षमतेच्या नवीन जलशुद्धीकरण केंद्राची निर्मिती, १४ नवीन जलकुंभ म्हणजेच समाविष्ट १४ गावांमध्ये स्वतंत्र क्षमतेचे प्रत्येकी एक जलकुंभ उभारणे, नवीन जलवाहिन्या म्हणजेच शहर आणि परिसरात २०५ किमी लांबीची जलवाहिनी टाकणे. शिवाय जुन्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती तसेच आवश्यक तांत्रिक आणि पूरक कामांचा समावेश आहे.

Wardha News : सोयाबीनचा भाव वाढला, पण शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही! वर्ध्यातील बाजारभावामुळे चर्चेला उधाण

Web Title: Wardha news water supply project 209 crore pending approval 14 villages vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 09:07 PM

Topics:  

  • wardha News
  • Water Shortage
  • Water supply

संबंधित बातम्या

पाणी वाचवणे हेच प्रथम कर्तव्य! पुणेकरांवर २५ टक्के कपातीचे संकट? जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाने चर्चेला उधाण
1

पाणी वाचवणे हेच प्रथम कर्तव्य! पुणेकरांवर २५ टक्के कपातीचे संकट? जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाने चर्चेला उधाण

Wardha News : जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग गडद, आठही तालुके दुष्काळी यादीमध्ये, आगामी काळात पाणीटंचाई वाढण्याची चिंता
2

Wardha News : जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग गडद, आठही तालुके दुष्काळी यादीमध्ये, आगामी काळात पाणीटंचाई वाढण्याची चिंता

Wardha News : सोयाबीनचा भाव वाढला, पण शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही! वर्ध्यातील बाजारभावामुळे चर्चेला उधाण
3

Wardha News : सोयाबीनचा भाव वाढला, पण शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही! वर्ध्यातील बाजारभावामुळे चर्चेला उधाण

Buldhana Water Shortage : येळगाव धरणात फक्त ८० टक्केच जलसाठा शिल्लक
4

Buldhana Water Shortage : येळगाव धरणात फक्त ८० टक्केच जलसाठा शिल्लक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.