
छत्रपती संभाजीनगरमध्ये 34 इलेक्ट्रिक बस धावणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या विकासकामांचे लोकार्पण
विभागीय क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सिंथेटिक अॅथलेटिक ट्रॅक आणि फुटबॉल मैदान उभारण्यात आले आहे. या सुविधांचे रविवारी सायंकाळी ५ वाजता लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या ३४ इलेक्ट्रक बसचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. या बसमुळे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळ मिळण्यासह पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन मिळणार आहे. इलेट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी कॅनॉट गार्डनच्या गेट क्रमांक तीनजवळ तसेच महावीर चौकातील बाबा पेट्रोल पंपाजवळ पुलाखाली उभारण्यात आलेल्या ईव्ही चार्जिंग स्टेशनचेही उद्घाटन होणार आहे.
2 हजार विद्यार्थी बसद्वारे जाणार
याशिवाय सिद्धार्थ उद्यानात उभारण्यात आलेल्या १०० किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या दौऱ्यात महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना जाबिंदा लॉन्स येथे नेण्यात येणार
विभागीय क्रीडा संकुलातील कार्यक्रमानंतर महापालिकेच्या ३४ इलेक्ट्रिक बसमधून सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना जाबिंदा लॉन्स येथे नेण्यात येणार आहे. तेथे सुरू असलेले ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ हे ऐतिहासिक महानाट्य विद्यार्थ्यांना दाखविण्यात येणार आहे. नव्याने दाखल झालेल्या इलेट्रिक बसमधून विद्याथ्यर्थ्यांना महानाट्य पाहण्याची संधी मिळणार आहे.
1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरला कधी येणार आहेत?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी, दि. १, छत्रपती संभाजीनगर शहरात येणार आहेत.
2. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोणती प्रमुख विकासकामे लोकार्पित होणार आहेत?
सिंथेटिक अॅथलेटिक ट्रॅक व फुटबॉल मैदान, ३४ इलेक्ट्रिक बस, ईव्ही चार्जिंग स्टेशन आणि सिद्धार्थ उद्यानातील १०० किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे.
3. सिंथेटिक अॅथलेटिक ट्रॅक आणि फुटबॉल मैदानासाठी किती खर्च झाला?
विभागीय क्रीडा संकुलातील या कामासाठी १० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.