Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर; बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचा भन्नाट किस्सा सांगत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

राजकारणात एकमेकांवर टीका करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात एकाच मंचावर आले. यावेळी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रकलेचे किस्से सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

  • By विवेक
Updated On: Oct 29, 2026 | 10:25 PM
uddhav thackeray at book launch

uddhav thackeray at book launch

Follow Us
Follow Us:
  • फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर
  • पुस्तक प्रकाशन सोहळ्यात तिन्ही नेत्यांची उपस्थिती
  • उद्धव ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांचा भन्नाट किस्सा
 

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गुरुवारी एक अत्यंत दुर्मिळ क्षण पहायला मिळाले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी संपादित ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या मराठी व्यंगचित्रकलेचा 100 वर्षांचा प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तिन्ही दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने आयोजित हा प्रकाशन सोहळा दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यंगचित्राबद्दलचे अनेक किस्से सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, शिवसेनेच्या ‘सामना’ची नुकतीच सुरुवात झाली होती, त्या काळात कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्याशी संबंधित एक व्यंगचित्र काढायचे होते. त्यावेळी मराठी माणसांवर होणाऱ्या अत्याचारांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

मात्र, या चित्रात हेगडे यांचा पडलेला चेहरा योग्य कोनातून दाखवायचा होता. त्यासाठी आवश्यक असलेला फोटोच मिळत नव्हता. कर्मचाऱ्यांसमोर अडचण उभी राहिल्यानंतर बाळासाहेबांनी स्वतः पेन्सिल हातात घेतली आणि काही सेकंदांत तो चेहरा रेखाटून दिला. उद्धव ठाकरेंनी हा किस्सा सांगत बाळासाहेबांच्या व्यंगचित्रकलेवर असलेली जबरदस्त पकड अधोरेखित केली.

Raj Thackeray : 2029 पर्यंत त्यांना मुख्यमंत्री ठेवा म्हणजे झालं, राज ठाकरेंचा खोचक टोला

व्यंगचित्रातून राजकीय टोलेबाजी

व्यंगचित्र काढताना त्याचा नेमका अर्थ संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे, असं सांगत उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या शैलीचं महत्त्व स्पष्ट केलं. केवळ स्वतःपुरतं चित्र काढण्यापेक्षा त्यातून लोकांपर्यंत विचार पोहोचणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी नमूद केलं.

वसंतराव नाईक आणि ‘मेघदूत’ची आठवण

यावेळी उद्धव ठाकरेंनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या काळातील आणखी एक आठवण सांगितली. मंत्र्यांची वेगवेगळी व्यक्तिमत्त्वं आणि त्यांच्याकडे असलेल्या खात्यांवर भाष्य करणारी व्यंगचित्रं बाळासाहेबांनी काढली होती. त्यापैकी ‘मेघदूत’ या व्यंगचित्राचाही त्यांनी उल्लेख केला.

अशा व्यंगचित्रांतून राजकीय व्यवस्थेवर मार्मिक भाष्य करता येतं, हा मुद्दा मांडताना उद्धव ठाकरेंनी पुढच्या शंभर वर्षांच्या इतिहासाची सुरुवात आजपासून करण्याचं आवाहन केलं.

या कार्यक्रमात तिन्ही नेत्यांची उपस्थिती आणि उद्धव ठाकरेंनी सांगितलेले बाळासाहेबांचे किस्से यामुळे जुन्या राजकीय आठवणींना उजाळा मिळाला.

Amit Satam : ‘लोकशाही बचाव, अराजकता हटाव’; अमित साटमांची मोठी घोषणा, राहुल गांधींविरोधात मुंबई भाजप रस्त्यावर उतरणार!

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुस्तक प्रकाशन सोहळ्यात कोणते नेते एकाच मंचावर आले?

    Ans: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे पुस्तक प्रकाशन सोहळ्यात एकाच मंचावर उपस्थित होते.

  • Que: उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या कोणत्या व्यंगचित्राचा किस्सा सांगितला?

    Ans: उद्धव ठाकरेंनी कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्याशी संबंधित व्यंगचित्राचा किस्सा सांगितला. हेगडे यांचा पडलेला चेहरा योग्य कोनातून काढण्यात अडचण आली असता बाळासाहेबांनी काही सेकंदांत पेन्सिलने तो चेहरा रेखाटून दिल्याची आठवण त्यांनी सांगितली.

  • Que: उद्धव ठाकरेंनी ‘मेघदूत’ व्यंगचित्राचा उल्लेख का केला?

    Ans: बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि मंत्र्यांवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून केलेल्या राजकीय टोलेबाजीची आठवण सांगताना उद्धव ठाकरेंनी ‘मेघदूत’ व्यंगचित्राचा उल्लेख केला.

Web Title: Uddhav thackeray balasaheb cartoon stories devendra fadnavis raj thackeray vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 10:22 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • raj thackeray
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

ॲपवरून टॅक्सी बुक करताय? महाराष्ट्रात लवकरच नवी यंत्रणा येणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय!
1

ॲपवरून टॅक्सी बुक करताय? महाराष्ट्रात लवकरच नवी यंत्रणा येणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय!

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा ठाण्यात पराभव करता येत नाही, म्हणून बदनामीचा डाव; मिलिंद देवरा यांची उद्धव ठाकरेंवर टीका
2

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा ठाण्यात पराभव करता येत नाही, म्हणून बदनामीचा डाव; मिलिंद देवरा यांची उद्धव ठाकरेंवर टीका

Sai Dongar Deforestation : राज ठाकरेंना चक्क जैन मुनी निलेशचंद्र यांचा पाठिंबा! वृक्षतोडीवरून घेतली ठाम भूमिका
3

Sai Dongar Deforestation : राज ठाकरेंना चक्क जैन मुनी निलेशचंद्र यांचा पाठिंबा! वृक्षतोडीवरून घेतली ठाम भूमिका

Mumbai Metro 12A : मानपाडा ते तळोजा मेट्रोला मंजुरी! ‘१८.४० किमीचा मार्ग, साडेतीन वर्षांत काम पूर्ण होणार’ – मुख्यमंत्री फडणवीस
4

Mumbai Metro 12A : मानपाडा ते तळोजा मेट्रोला मंजुरी! ‘१८.४० किमीचा मार्ग, साडेतीन वर्षांत काम पूर्ण होणार’ – मुख्यमंत्री फडणवीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.