Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar Building Collapse : संभाजीनगरमध्ये व्यापारी संकुलाचे छत कोसळले; कामगार दबल्याची भीती

Sambhajinagar Building Collapse : छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा परिसरात जालना रोडवरील नव्याने उभारण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलाचे पहिल्या मजल्याचे छत २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी कोसळले. या दुर्घटनेत दोन कामगार जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 30, 2026 | 09:41 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • घटनेने परिसरात खळबळ उडाली 
  • वीजपुरवठा खंडित झाल्याने अडथळे  
  • मलबा हटवण्याचे काम युद्धपातळीवर 
Sambhajinagar Building Collapse : छत्रपती संभाजीनगर येथे चिकलठाणा परिसरातील आठवडी बाजाराजवळ जालना रोडवर नव्याने उभारण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलाच्या पहिल्या मजल्याचे छत २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास कोसळले. या दुर्घटनेत पाच ते सहा कामगार दबले असण्याची भीती व्यक्त करण्यात आली. अंकुश संताराम कांबळे (३५) आणि अशफाक एस. के. कडू (२३) या दोन जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अग्निशमन विभागाचे प्रमुख अशोक खांडेकर यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आणखी व्यक्ती दबल्याची शक्यता वर्तवली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत जेसीबी आणि क्रेनच्या साहाय्याने मलबा हटविण्याचे काम सुरू होते. जालना रोडवरील द्वारकादास श्यामकुमार कपड्याच्या दालनाशेजारी हे बांधकाम सुरू आहे.

घटनेने परिसरात खळबळ उडाली

गुरुवारी या ठिकाणी छत टाकण्याचे काम सुरू होते. सायंकाळी काम संपल्यानंतर छताला आधार देण्यासाठी विहिरीच्या कठड्यावर उभे केलेले लोखंडी पाइप वाकल्याने छताचा काही भाग कलला. त्यानंतर संपूर्ण छत अचानक कोसळले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन विभागाचा एक बंब, अधिकारी आणि जवान घटनास्थळी रवाना झाले, रात्री पावणेआठच्या सुमारास जेसीबी, क्रेन आदी यंत्रांच्या मदतीने मलबा हटविण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, रात्रीची वेळ आणि काही काळ वीजपुरवठा खंडित झाल्याने बचावकार्यात अडथळे आले. वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर मलबा हटविण्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.

Buldhana: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी

वीजपुरवठा खंडित झाल्याने अडथळे

रात्री पावणेआठच्या सुमारास मलबा हटविण्यास सुरुवात झाली, मात्र, अंधार आणि काही काळ वीजपुरवठा खंडित झाल्याने कामात अडथळे निर्माण झाले. वीज आल्यानंतर जेसीबी आणि क्रेनच्या साहाय्याने मलबा हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. पाच ते सहा कामगार दबले असण्याची भीती व्यक्त होत असली, तरी अग्निशमन विभागाकडून एक व्यक्ती दबल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.

मलबा हटवण्याचे काम युद्धपातळीवर

रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी अग्निशमन विभागाचे कर्मचारी मलबा उपसण्याचे काम युद्धपातळीवर करत होते. हा मलबा हटवण्यासाठी वेळ लागणार असून मलब्याखाली आणखी कुणी दबलेले आहे का, हे संपूर्ण मलबा हटवल्यावरच कळेल.

Washim: ‘श्री बालाजी’च्या १५ आजी-माजी संचालकांना नोटीस; ५ नोव्हेंबर रोजी होणार सुनावणी, साखर कारखान्यातील गैरकारभार प्रकरण

 

Web Title: Chhatrapati sambhajinagar chikalthana commercial complex roof collapse sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 09:41 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election 2026
  • Chhatrapati Sambhajinagar News

संबंधित बातम्या

Ganja Farming Case: छत्रपती संभाजीनगरमध्ये गांजाची शेती; 52 लाखांचा मुद्देमाल जप्त, शेतकरी अटकेत
1

Ganja Farming Case: छत्रपती संभाजीनगरमध्ये गांजाची शेती; 52 लाखांचा मुद्देमाल जप्त, शेतकरी अटकेत

Child Abuse Case : पोटच्या मुलीचा छळ; हातापायांना सिगारेटचे चटके दिल्याचा आरोप, बापाला अटक
2

Child Abuse Case : पोटच्या मुलीचा छळ; हातापायांना सिगारेटचे चटके दिल्याचा आरोप, बापाला अटक

चिमुरडीच्या हातापायांवर सिगारेटचे चटके, डोक्याचे केसही कापले; आरोपी वडिलांना अटक
3

चिमुरडीच्या हातापायांवर सिगारेटचे चटके, डोक्याचे केसही कापले; आरोपी वडिलांना अटक

Sambhajinagar News: जरांगेंच्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपचे फॉरेन्सिक ऑडिट होणार; शिवेंद्रराजे भोसले
4

Sambhajinagar News: जरांगेंच्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपचे फॉरेन्सिक ऑडिट होणार; शिवेंद्रराजे भोसले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.