Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

३६ रेशन दुकानदारांचे परवाने होणार कायम! मंत्री छगन भुजबळ यांचे आश्वासन

आजपर्यंत त्यांच्या विरोधात कोणत्याही तक्रारी नाहीत. असे असताना तात्पुरते व्यवस्थापन असलेल्या रास्तभाव धान्य दुकानदारांकडे कोणत्याही प्रकारचे प्राधिकार पत्र नाही.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 23, 2024 | 11:25 AM
३६ रेशन दुकानदारांचे परवाने होणार कायम! मंत्री छगन भुजबळ यांचे आश्वासन
Follow Us
Follow Us:

रत्नागिरी जिल्ह्यातील ३६ रास्त धान्य दुकानदारांचे असलेले तात्पुरते परवाने कायमस्वरूषी केले जातील, असे आश्वासन अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे. रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम, रमेश राणे यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी हे आश्वासन देण्यात आले असून याचा दुकानदारांना फायदा होणार आहे.

याबाबत पत्रकारांना माहिती देताना जिल्हाध्यक्ष कदम म्हणाले, जिल्ह्यात शेकडो रास्त धान्य दुकाने असून त्यातील ३६ दुकानदारांना २००१ ते २०१७ या काळात तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तात्पुरत्या स्वरुपात रास्तभाव धान्य दुकानांचे व्यवस्थापन मंजूर करण्यात आले होते. याच तात्पुरते आदेशाच्या आधारेच आजतागायत संबंधितांकडे वितरण व्यवस्थापन आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षांपासून संबधित ही दुकाने चालवीत असून त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन ही दुकानेच आहेत. या दुकानदारांनी कोरोना काळात शिधापत्रिकाधारकांना चांगल्याप्रकारे सेवा दिली आहे.

आजपर्यंत त्यांच्या विरोधात कोणत्याही तक्रारी नाहीत. असे असताना तात्पुरते व्यवस्थापन असलेल्या रास्तभाव धान्य दुकानदारांकडे कोणत्याही प्रकारचे प्राधिकार पत्र नाही. हे पत्र मिळाल्यास शासन नियमानुसार देय होणारी अनामत रक्कम, प्राधिकार पत्र शुल्क, नुतनीकरण शुल्क आदी नियमानुसार भरण्यास ते तयार असून त्यांच्याकडे सदरचे व्यवस्थापन चालविण्यास पुरेशी जागाही उपलब्ध आहे. याचा विचार करून गेल्या तीन वर्षापासून आम्ही अन्न, नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांच्याकडे या दुकानदारांना कायमस्वरूपी परवाना मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. त्याला आता यश आले असून तसे आदेश लवकरच ते देणार असल्याचे त्यांनी आम्हाला काही दिवसांपूर्वी झालेल्या भेटीत सांगितले असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.

Web Title: 36 licenses of ration shopkeepers will be permanent minister chhagan bhujbals assurance maharashtra government maharashtra political party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2024 | 11:25 AM

Topics:  

  • chipalun
  • Maharashtra Government
  • Minister Chhagan Bhujbal
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Gadchiroli News : गडचिरोलीत उभा राहणार हरित पोलादाचा प्रकल्प; महाराष्ट्र सरकारचा जॉन कॉकरिलसोबत मोठा करार
1

Gadchiroli News : गडचिरोलीत उभा राहणार हरित पोलादाचा प्रकल्प; महाराष्ट्र सरकारचा जॉन कॉकरिलसोबत मोठा करार

अनुसूचित जातींच्या उमेदवारांना मोठा दिलासा; MPSC मुलाखतीच्या तयारीसाठी BARTI कडून मिळणार 10 हजारांची मदत
2

अनुसूचित जातींच्या उमेदवारांना मोठा दिलासा; MPSC मुलाखतीच्या तयारीसाठी BARTI कडून मिळणार 10 हजारांची मदत

Pune News : पुणे ठरतेय GCC चे हब; वर्षभरात 800 पेक्षा अधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
3

Pune News : पुणे ठरतेय GCC चे हब; वर्षभरात 800 पेक्षा अधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाला मोठं यश? जरांगेंच्या मागण्यांवर सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
4

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाला मोठं यश? जरांगेंच्या मागण्यांवर सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.