मुंबई : गणपती विसर्जनाच्या (Ganpati Immersion) दिवशी प्रवाशांची (Passengers) अतिरिक्त गर्दी (Extra Rush) लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने (Western Railway) स्पेशल गाड्या (Special Train) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. चर्चगेट ते विरारदरम्यान ९ आणि १० सप्टेंबरच्या मध्यरात्री चार जादा स्पेशल लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पेशल ट्रेनचे वेळापत्रकही जारी केले आहे.
येत्या शुक्रवारी म्हणजेच ९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची मोठी वर्दळ असते. गेल्या वर्षीची आकडेवारी लक्षात घेतल्यास, मुंबईत ३४ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन झाले होते. गणरायांच्या उत्सवमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी अनेक जण रात्री उशिरा प्रवास करतात. अशा प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पेशल लोकल सोडणार आहे.