Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माथेरानच्या विकासासाठी ५ वर्षांचा रोडमॅप! शंभूराज देसाईंचे आश्वासन; ‘माथेरानला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनवणार’

राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी माथेरानच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. "माथेरान शहराच्या विकासासाठी पाच वर्षांचा रोडमॅप तयार केला जाईल आणि...

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 25, 2025 | 06:18 PM
माथेरानच्या विकासासाठी ५ वर्षांचा रोडमॅप! शंभूराज देसाईंचे आश्वासन (Photo Credit - X)

माथेरानच्या विकासासाठी ५ वर्षांचा रोडमॅप! शंभूराज देसाईंचे आश्वासन (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचा माथेरानवर फोकस!
  • ₹८८ कोटींचा विकास निधी
  • आता ई-रिक्षा, रोप-वे प्रकल्पाला गती मिळणार
Matheran Nagar Parishad Election: माथेरान गिरीस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युतीच्या उमेदवारांसाठी श्रीराम चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला राज्याचे पर्यटन मंत्री नामदार शंभूराज देसाई, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

माथेरानसाठी ५ वर्षांचा रोडमॅप – शंभूराज देसाई

राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी माथेरानच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. “माथेरान शहराच्या विकासासाठी पाच वर्षांचा रोडमॅप तयार केला जाईल आणि त्यानुसार पुढील पाच वर्षे विकासाची गंगा आणली जाईल,” असे जाहीर आश्वासन त्यांनी दिले. या रोडमॅपवर दरवर्षी आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नियंत्रण समिती: देसाई यांनी संनियंत्रण समितीमध्ये स्थानिक नगराध्यक्ष आणि आमदाराचा समावेश असावा, असे मत व्यक्त केले.

पर्यटन स्थळ: माथेरानला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनवायचे आहे. वन विभागाने विकासकामांमध्ये सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

निवास व न्याहारी (B&B): ‘निवास आणि न्याहारी व्यवस्था’ (Bed and Breakfast) माथेरानमध्ये लागू करण्यासाठी निवडणुकीनंतर तत्काळ बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

ई-रिक्षा: पर्यावरणपूरक ई-रिक्षांमुळे स्थानिक घोडे मालकांच्या व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.

हे देखील वाचा: Satara News : निवडणूकीची जोरदार तयारी; पाटण मतदारसंघासाठी 13 कोटी 23 लाखांचा निधी मंजूर

मिनी ट्रेनसाठी ₹१५० कोटींचा निधी – खासदार बारणे

खासदार श्रीरंग बारणे यांनी माथेरानसाठी केलेल्या कामांची माहिती दिली. स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक वेळा भेट देणारा खासदार होण्याचा मान मला मिळाला आहे. मिनी ट्रेन बंद करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा लोकसभेत आवाज उठविला आणि मिनी ट्रेन मार्ग अद्ययावत करण्यासाठी तब्बल ₹१५० कोटींचा निधी आणला. भुयारी गटार योजना आणि पर्यावरणपूरक ई-रिक्षांसाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी चंद्रकांत चौधरी यांना नगराध्यक्ष करण्याचे आवाहन केले.

‘औरंगजेब विचारांच्या हाती देऊ नका’ – आमदार थोरवे

कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या भाषणातून युतीच्या उमेदवारासाठी जोरदार समर्थन केले. माथेरानच्या विकासासाठी गेल्या पाच-सहा वर्षांत प्रयत्न केले असून, ₹८८ कोटींचा विकास निधी आणला गेला आहे. माथेरानला ‘मॉडेल हिल स्टेशन’ बनवायचे आहे, अशी संकल्पना त्यांनी मांडली. कर्जत तालुका औद्योगिक वसाहत नसलेला असल्याने, तो पर्यटन तालुका म्हणून घोषित व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. फिनिक्युलर रेल्वे आणि रखडलेला रोप वे प्रकल्प आल्यास माथेरान पर्यटनाच्या बाबतीत आघाडीवर येईल, असे त्यांनी सांगितले.

धार्मिक आवाहन

“माथेरान हे हिंदुत्वाच्या विचारांचे असल्याने, माथेरान हे औरंगजेब विचारांच्या हाती देऊ नका,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले. चौधरी कुटुंबाचे माथेरान शहरासाठी मोठे योगदान असून, चंद्रकांत चौधरी हे गोरगरिबांना मदत करणारे ‘दाता नेता’ आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांनीही माथेरानमध्ये वेगाने विकास व्हावा यासाठी पर्यटन मंत्र्यांनी लक्ष देण्याचे आवाहन केले. सभेचे प्रास्ताविक शिवसेनेचे शहर प्रमुख मनोज खेडकर यांनी केले, तर भाजप शहर चिटणीस राजेश चौधरी यांनी पर्यायी वाहतूक व्यवस्था आणि लॉजिंग, घोडेवाले यांच्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

हे देखील वाचा:  महापालिकेच्या मलिद्यासाठी ठाकरे बंधू एकत्र, मुंबईकर जनता त्यांचा…; शंभूराज देसाईंची टीका

Web Title: 5 year roadmap for the development of matheran tourism minister shambhuraj desai assures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 06:17 PM

Topics:  

  • Maharashtra Local Body Election
  • Matheran
  • matheran news
  • Shambhuraj Desai

संबंधित बातम्या

Tourism News: “पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांची…”; मंत्री शंभूराज देसाईंचे स्पष्ट निर्देश
1

Tourism News: “पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांची…”; मंत्री शंभूराज देसाईंचे स्पष्ट निर्देश

Matheran News : “हेरिटेज नॉर्म माथेरान पालिका इमारतीला लागू नाहीत का ?” राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल
2

Matheran News : “हेरिटेज नॉर्म माथेरान पालिका इमारतीला लागू नाहीत का ?” राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल

Raigad News: माथेरानमध्ये वाद पेटला! हात रिक्षाचालकांना ई-रिक्षा नाही, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर
3

Raigad News: माथेरानमध्ये वाद पेटला! हात रिक्षाचालकांना ई-रिक्षा नाही, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Shambhuraj Desai News: आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? महायुतीत ठिणगी, शंभूराजे देसाईंनी सुनावले खडे बोल
4

Shambhuraj Desai News: आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? महायुतीत ठिणगी, शंभूराजे देसाईंनी सुनावले खडे बोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.