पाटण : पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध पायाभूत विकासकामांसाठी 13 कोटी 22 लाख 93 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीसाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडे विशेष शिफारस केली होती. त्यानुसार महसूल व वन विभागाने शासन निर्णय जारी केला असून, विकासकामांना लवकरच गती मिळणार आहे. ही माहिती मंत्री देसाई यांच्या कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.पाटण मतदारसंघातील अनेक गावांमधील अंतर्गत रस्ते, पोहोच रस्ते, संरक्षक भिंती, आरसीसी गटार, सभामंडप, ग्रामपंचायत कार्यालये या मूलभूत सुविधा दुरवस्थेत असल्याने नागरिकांकडून वारंवार मागण्या होत होत्या.
या मागण्यांचा पाठपुरावा करून या निधीतून बोर्गेवाडी (कुंभारगाव) येथील अंतर्गत
रस्ता आणि आरसीसी गटरसाठी 12 लाख, धनगरवाडी (काळगाव) येथील रस्ता सुधारणा 15 लाख, गुढे, जाळगेवाडी, खांडेकरवाडी, माथणेवाडी, शिंगणवाडी, नाणेगाव, ढाणकल, सडादुसाळे, सूर्याचीवाडी, गमेवाडी, बाटेवाडी, मंद्रळकोळे, काटेवाडी, राहुडे, मुरुड, म्हावशी, आंबवणे, म्हारखंड, रेडेवाडी, आटोली, गणेशनगर आदी गावांतील रस्ते सुधारणा, डांबरीकरण व सुशोभीकरणाच्या कामांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे संरक्षक भिंती, सभामंडप, मंदिर सुशोभीकरण, स्मशानभूमी रस्ते, ग्राम सचिवालय इमारती या कामांसाठी देखील निधी वितरीत करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी येथे इमारत बांधकामासाठी तब्बल 1 कोटी 50लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
. हेबेवाडी बाजारतळ सुशोभीकरणासाठी 25लाख,
कुंभारगाव मुस्लिम कब्रस्तान सुधारणा व संरक्षक भिंतीसाठी 20 लाख,
ताईगडेवाडी येथे सुलभ शौचालयासाठी 10लाख,
तसेच आवडे, आडदेव खुर्द, रोडेवाडी, टोळेवाडी, फणसवाडी, उमरकांचन, वेताळवाडी, माजगाव आदी गावांतील सभामंडप व ग्रामसचिवालयांसाठी अनुक्रमे 2 ते 15 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
पालकमंत्री देसाई यांनी कोयना भूकंप – पुनर्वसन निधी समितीकडे प्रस्ताव सादर – केला होता. या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाल्याने मतदारसंघातील ग्रामविकासाला – चालना मिळणार आहे.
या सर्व विकासकामांची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून करण्यात येणार असून, संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.






