Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्राथमिक शिक्षकांची ५०० पदे रिक्त! भंडारा जिल्ह्यातील प्रकार; एकाच शिक्षकावर ४ वर्गांची जबाबदारी

अध्यापनाचे काम सोडून शिक्षक इतर कामांत व्यस्त असल्याने विद्यार्थ्यांच्या पाया कच्चा राहत असून, या शैक्षणिक नुकसानीला नेमके जबाबदार कोण? असा जळजळीत प्रश्न आता पालकांनी उपस्थित केला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 19, 2026 | 02:35 PM
प्राथमिक शिक्षकांची ५०० पदे रिक्त! भंडारा जिल्ह्यातील प्रकार; एकाच शिक्षकावर ४ वर्गांची जबाबदारी

प्राथमिक शिक्षकांची ५०० पदे रिक्त! भंडारा जिल्ह्यातील प्रकार; एकाच शिक्षकावर ४ वर्गांची जबाबदारी

Follow Us
Close
Follow Us:

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद शाळा सध्या भीषण शिक्षक टंचाईचा सामना करत आहेत. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची तब्बल ५०० पदे रिक्त असून एकीकडे नवीन शैक्षणिक सत्राच्या प्रवेशाची तयारी सुरू असताना दुसरीकडे अनेक शाळांमध्ये १ ते ४ वर्गासाठी केवळ एकच शिक्षक उपलब्ध असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.एकाच शिक्षकावर शाळेचा डोलारा जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये विद्याथ्यांची संख्या पुरेशी असतानाही शिक्षकांची संख्या मात्र अत्यल्प आहे. उदाहरणार्थ कोलारी येथे ४४ विद्यार्थ्यांसाठी फक्त १ शिक्षक असून (स्वयंसेवकाचा कार्यकाळ संपला), पळसगाव येथे ४३ विद्यार्थ्यांसाठी १ शिक्षिका आहे. विहीरगाव येथे ४३ विद्यार्थ्यांसाठी १ शिक्षक, पालांदूर येथे चक्क ९२ विद्यार्थ्यांसाठी केवळ १ शिक्षिका कार्यरत आहे. गत शैक्षणिक सत्रात कंत्राटी स्वयंसेवकांच्या मदतीने गाडा हाकला जात होता. मात्र, ३१ मार्च रोजी या स्वयंसेवकांचा कार्यकाळ संपल्याने आता पुन्हा एकाच शिक्षकावर ४ वर्गांचा भार येऊन पडला आहे.(फोटो सौजन्य – istock)

Amravati Scandal: “सुनावणी नको, तारीख नको सरळ ‘एन्काउंटर’….”, अमरावती Video प्रकरणावर माजी खासदार नवनीत राणा यांचा संताप

पवित्र पोर्टलकडून वाढल्या अपेक्षा

मे महिन्यात ‘पवित्र पोर्टल’ अंतर्गत शिक्षक भरती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यात ५०० शिक्षकांची गरज असल्याने ही भरती प्रक्रिया पार पडल्यास ग्रामीण भागातील शाळांना संजीवनी मिळू शकते.मात्र, जर ही भरती लांबणीवर पडली, तर जिल्हा परिषद शाळा बंद पाडण्याचे हे षड्यंत्र असल्याची भावना सामान्य जनतेमध्ये निर्माण होत आहे.

शाळेत एकच शिक्षक असताना त्यांना बीएलओसारखी अशैक्षणिक कामे देणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्यासारखे आहे, असे मत सुजाण पालकांनी व्यक्त केले आहे. अध्यापनाचे काम सोडून शिक्षक इतर कामांत व्यस्त असल्याने विद्यार्थ्यांच्या पाया कच्चा राहत असून, या शैक्षणिक नुकसानीला नेमके जबाबदार कोण? असा जळजळीत प्रश्न आता पालकांनी उपस्थित केला आहे. शाळेव्यतिरिक्त इतर कामे शिक्षकांवर लादण्यापेक्षा शिक्षणाच्या दर्जाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

केवळ लाखनी तालुक्यातच ६० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या संदर्भात लोकप्रतिनिधी आणि पालकांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार दाद मागितली. मात्र, ‘शिक्षक उपलब्ध नाहीत’ असे सांगून बोळवण केली जात आहे, लाखनीचे गटशिक्षणाधिकारी सुभाष बावनकुळे यांनी वरिष्ठ स्तरावर किमान २ शिक्षकांची मागणी केल्याचे स्पष्ट केले असले, तरी प्रत्यक्ष नियुक्ती कधी होणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे.

३ महिन्याचे रेशन मिळणार आता एकत्र! पुरवठा विभागाचा पुढाकार; पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गरिबांना सुविधा

जिल्हा परिषद शिक्षकांना केवळ अध्यापनच नाही, तर शासनाच्या आदेशानुसार बीएलओ (मतदार नोंदणी अधिकारी) आणि इतर अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. शाळेत एकच शिक्षक असताना त्यांना अशा कामात विद्यार्थ्यांच्या जुंपल्यामुळे अध्यापनाकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे शाळांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पालकांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: 500 vacancies of primary teachers type from bhandara district one teacher is in charge of 4 classes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • Education Department
  • Maharashtra Schools
  • yavatmal latest news

संबंधित बातम्या

Career News: ‘RTE’ प्रवेश प्रक्रियेत नियोजनाचा अभाव; फक्त २६ हजार विद्यार्थांनी…
1

Career News: ‘RTE’ प्रवेश प्रक्रियेत नियोजनाचा अभाव; फक्त २६ हजार विद्यार्थांनी…

CET News : दुसऱ्या संधीच्या PCM-PCB नोंदणीला उस्फुर्त प्रतिसाद; दोन दिवसांत ‘इतक्या’ विद्यार्थ्यांची नोंदणी
2

CET News : दुसऱ्या संधीच्या PCM-PCB नोंदणीला उस्फुर्त प्रतिसाद; दोन दिवसांत ‘इतक्या’ विद्यार्थ्यांची नोंदणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.