वैद्यकीय प्रवेशाच्या नावावर 3 लाखांनी फसवणूक
जयसिंगपूर : श्री दत्त शासकीय व निमशासकीय सेवकांची पतसंस्था मर्यादित, जयसिंगपूर येथे तब्बल ७ कोटी ५७ लाख ५६ हजार ११७ रुपये इतक्या रकमेचा अपहार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संस्थेचे चेअरमन, संचालक, मॅनेजर, शाखाधिकारी व कर्जदार अशा १० जणांविरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद सुभाष दादासाहेब देशमुख तालुका लेखापरीक्षक, शिरोळ यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर २०१४ ते २१ मार्च २०२५ या कालावधीत संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून नियमबाह्य कर्ज वाटप, नियमबाह्य गुंतवणूक व रोख शिल्लक रकमेचा अपहार केला. त्यामुळे संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. संस्थेच्या ठेवीदारांनी आपली रक्कम परत मिळत नसल्याबाबत सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर जिल्हा विशेष लेखापरीक्षक किरणसिंह पाटील व उपनिबंधक नीलकंठ करे यांच्या आदेशानुसार लेखापरीक्षक सुभाष देशमुख यांनी २०१८ ते २०२३ या कालावधीचे फेर लेखापरीक्षण केले.
सदर अहवालात ७.५६ कोटींच्या अपहाराची बाब उघड झाली. अहवाल प्राप्त झाल्यानंतर उर्मिला राजमाने (सहाय्यक निबंधक, शिरोळ) यांनी अधिकृतपणे देशमुख यांना पोलिसांत फिर्याद देण्याचे आदेश दिले. त्यानुसार, अनिलकुमार महादेव तराळ, प्रमोद मनोहर जाधव, बाळासो दत्तू लोहार, रेखा महादेव तराळ, अनिल बाळासो घोलप, रावसाहेब भूपाल कोळी, वैशाली अनिलकुमार तराळ, राजीव गणपत कोळी, इंद्रजीत महादेव जाधव यांच्यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ठेवीदारांमध्ये अस्वस्थता
जयसिंगपूरमधील पतसंस्थेत 7 कोटींचा अपहार झाला आहे. या प्रकरणाची चर्चा आता सगळीकडे सुरु झाली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकरणामुळे ठेवीदारांमध्ये अस्वस्थता पसरली असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
टेलिग्रामवर नोकरीच्या आमिषाने फसवणूक
दुसऱ्या एका घटनेत, टेलिग्राम अॅपवर नोकरीचे आमिष दाखवून तब्बल 6 लाख 9 हजार 884 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपी तरुणाला अटक केली आहे.