रोहित पवारांचा भाजपवर निशाणा (फोटो- टीम नवराष्ट्र)
भाजपच्याच जागा बिनविरोध कशा होत आहेत? – रोहित पवार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक होणार रंगतदार
जामनेर, चिखलदरा येथे निवडणूक बिनविरोध
Maharashtra Local Body Election: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. डिसेंबर महिन्यात 2 तारखेला मतदान आणि 3 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान काही नगरपरिषद, नगरपंचायतीमध्ये निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामध्ये भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यावरून आता रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
रोहित पवारांनी साधला भाजपवर निशाणा
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मामेभाऊ श्री. प्रल्हाद कलोती यांची चिखलदरा नगरपरिषदेच्या नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, ना. गिरीश महाजन साहेब यांच्या पत्नी सौ. साधनाताई महाजन यांची जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, ना. जयकुमार रावल जी यांच्या मातोश्री सौ. नयनकुवर ताई रावल यांची दोंडाइचा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मामेभाऊ श्री. प्रल्हाद कलोती यांची चिखलदरा नगरपरिषदेच्या नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, ना. गिरीश महाजन साहेब यांच्या पत्नी सौ. साधनाताई महाजन यांची जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, ना. जयकुमार रावल जी… — Rohit Pawar (@RRPSpeaks) November 21, 2025
बिनविरोध निवडणुका होत आहेत ही चांगली गोष्ट आहे, परंतु भाजपच्याच जागा बिनविरोध कशा होत आहेत? हा प्रश्न आहे. साम-दाम-दंड-भेद वापरून लोकशाहीचा गळा घोटला जात नसेल ही अपेक्षा! घराणेशाहीवरून आरोप करणाऱ्या भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘कुटुंब कल्याण योजना’ राबवत पक्षाच्या ‘तळागाळातल्या कार्यकर्त्यांना’ ‘न्याय’ देऊन पक्षांतर्गत ‘लोकशाही’ ‘मजबूत’ करत आपला पक्ष कसा #PARTY_WITH_DIFFERANCE आहे हे दाखवून दिलं. असो…! वर्षानुवर्षे भाजपासाठी काम करणाऱ्या केशव उपाध्ये, माधव भंडारी यांच्यासारख्या निष्ठावंतांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत…!
भाजपकडून निवडणुकीत एकाच कुटुंबातील सहा सदस्यांना दिली उमेदवारी
लोहा मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस यांच्यात त्रिपक्षीय लढत होण्याची अपेक्षा आहे. परिषदेत १० वॉर्ड आहेत आणि २० सदस्य निवडून येणार आहेत. मंगळवारी, नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि इतर पक्षांनी आपले अर्ज दाखल केले. याचदरम्यान, भारतीय जनता पक्षावर एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना तिकीट दिल्याचा आरोप होत आहे. हा मुद्दा स्थानिक निवडणुकांशी संबंधित आहे आणि आता विरोधकांकडून भाजपवर हल्ला होत आहे. शिवसेना-भाजप युतीने एकाच कुटुंबातील सहा सदस्यांना उमेदवारी दिल्याची माहीती मिळत आहे. काँग्रेसचा आरोप आहे की भाजप इतर पक्षांना दोष देत असतानाही अशा कारवायांमध्ये सहभागी आहे.






