Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel युद्धामुळे लग्न थांबली? वधू-वरांची पंचाईत; केटरिंग व्यवसाय ठप्प अन् तारखा…

लग्नसराईचा हंगाम सुरू असताना ही परिस्थिती निर्माण झाल्याने वधू-वर पक्षांचीही मोठी गैरसोय होत आहे. अनेक कुटुंबांनी लग्नाच्या तारखा निश्चित करून सभागृह, केटरिंग आणि इतर व्यवस्था केल्या होत्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 13, 2026 | 04:10 PM
Iran Israel युद्धामुळे लग्न थांबली? वधू-वरांची पंचाईत; केटरिंग व्यवसाय ठप्प अन् तारखा

Iran Israel युद्धामुळे लग्न थांबली? वधू-वरांची पंचाईत; केटरिंग व्यवसाय ठप्प अन् तारखा

Follow Us
Follow Us:

पुण्यात केटरिंग व्यवसाय ठप्प
विद्यार्थ्यांचा मेसचा डबा 60 वरून 100 वर 
युद्धाचा परिणाम एलपीजी पुरवठ्यावर

सोनाजी गाढवे/पुणे: इराण-इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम देशांतर्गत एलपीजी पुरवठ्यावर टंचाई निर्माण होत असून, पुणे शहरात कमर्शियल गॅस सिलिंडरची टंचाई जाणवू लागली आहे. या टंचाईमुळे शहरातील विवाह सोहळ्यांचे नियोजन अडचणीत आले असून अनेक कुटुंबांना लग्नाच्या तारखा पुढे ढकलण्याची वेळ येत असल्याचे समोर आले आहे.

शहरातील केटरिंग व्यावसायिक आणि विवाह सोहळ्यांशी संबंधित सेवांवर या परिस्थितीचा थेट परिणाम होत आहे. मोठ्या प्रमाणावर स्वयंपाकासाठी कमर्शियल गॅस सिलिंडर आवश्यक असतात. मात्र सध्या सिलिंडरचा पुरवठा मर्यादित प्रमाणात होत असल्याने केटरर्सना लग्नाचे कार्यक्रम स्वीकारताना अडचणी येत आहेत. परिणामी काही ठिकाणी आधी निश्चित झालेल्या कार्यक्रमांबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे.

स्वयंपाकघर सध्या अडचणींच्या भोवऱ्यात? LPG चा तुटवडा अन् उद्योगधंद्यावरही परिणाम

लग्नसराईचा हंगाम सुरू असताना ही परिस्थिती निर्माण झाल्याने वधू-वर पक्षांचीही मोठी गैरसोय होत आहे. अनेक कुटुंबांनी लग्नाच्या तारखा निश्चित करून सभागृह, केटरिंग आणि इतर व्यवस्था केल्या होत्या. मात्र गॅस सिलिंडरची टंचाई वाढल्यास मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करणे कठीण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे काही कुटुंबे सुरक्षिततेच्या दृष्टीने विवाह सोहळ्यांच्या तारखा पुढे ढकलण्याचा विचार करत असल्याची माहिती व्यावसायिकांकडून मिळत आहे.

विद्यार्थांने नाव न सांगता सांगीतले की, मी ज्या मेसला आहे त्या मेस व्यवसायीकाने आमचा डबा पुर्वी फक्त ६० रुपायला मिळायचा आता तो त्या मध्ये ४० रु. प्लस करून १०० रुपायला देत आहेत. आणि मुलांचे यात खुप पैसे जात आहेत. शासनाने यावर त्वरीत तोडगा काढवा माझी विनंती आहे. गॅस मिळाला नाहीत तर मेस व्यवसाय़ीक मेस बंद करणार आहे. आम्ही जायच कुठे आता पंचाईत झाली.

सगळं संपणार! पुण्यात हॉटेल्स, मेसचे लॉकडाउन? विद्यार्थी अन् कामगार ‘गॅस’वर, चिंता वाढली

आमच्या कडे आजच्या पुरते गॅस शिल्लक आहेत आणि उध्या पासून अम्ही काम बंद ठेवणार आहोत. जो व्यक्ती आम्हाल गॅस ची सुविधा देईल त्याच्या लग्नात अम्ही. जेवण बणवण्याचे कामकरू नाही मिळाला तर बंद ठेऊ.
-नरपत महाराज केटरिंग व्यवसायीक
माझ्या कडे पाच सहा लग्नाच्या तारखा आल्या होत्या पण इराण-इज्रायल आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गॅसची टंचाई आहे. मी त्या कुटूंबाला सांगितले की लग्न पुढे ढकला किंवा माझ्या साठी गॅस  उपल्बध करून द्या, त्यानंतरच आम्ही सांगू शकतो.
– पुमचंद महाराज केटरिंग व्यवसायीक

 

Web Title: Marriage dates miss and catering business stopped by commercial gas shortage pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 04:09 PM

Topics:  

  • hotel
  • Iran Israel Conflict
  • Marriage News
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.