Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : जांभोरी गाव होणार ‘मधाचे गाव’; २० बचत गटांतील आदिवासी महिलांचा स्त्युत्य उपक्रम

जांभेरी गावातील २० बचत गटांतील आदिवासी महिलांना प्रत्येकी १० याप्रमाणे एकूण २०० मधपेट्यांचे (बी बॉक्स) वाटप आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 13, 2026 | 03:15 PM
Bee-keeping industry in Jambhori village, undertaken by tribal women through Self-Help Groups

Bee-keeping industry in Jambhori village, undertaken by tribal women through Self-Help Groups

Follow Us
Follow Us:

मंचर : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील जांभोरी गावाने विकासाची एक नवी दिशा पकडली आहे. जांभोरी गावाला भविष्यात “मधाचे गाव” म्हणून नवी ओळख मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत गावातील २० बचत गटांतील आदिवासी महिलांना प्रत्येकी १० याप्रमाणे एकूण २०० मधपेट्यांचे (बी बॉक्स) वाटप आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. (Nanded News)

या अभिनव उपक्रमाची बीजे २०२४ मध्ये रोवली गेली. ग्रामीण महिलांना शाश्वत रोजगार देण्याचा विचार पुढे आला. त्यानंतर खादी ग्रामोद्योगच्या सहकार्याने या प्रकल्पाचे नियोजन झाले. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ मध्ये या प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आणि १२ मार्च २०२६ रोजी या महत्त्वपूर्ण टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले.

शेतीला मिळाला पूरक व्यवसायाचा आधार

मधमाशी पालन हा केवळ मध मिळवून देणारा व्यवसाय नसून, यामुळे पिकांच्या परागीभवनास मदत होऊन शेती उत्पादनातही वाढ होते. आदिवासी भागातील महिला आता स्वतःच्या हक्काच्या व्यवसायातून स्वावलंबी बनणार असून, हा प्रकल्प जांभोरी परिसराच्या आर्थिक विकासाचा महत्त्वाचा सौत ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

हे देखील वाचा : गॅस टंचाईवर CM देवेंद्र फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक! महाराष्ट्र सरकारने घेतले ‘हे’ पाच निर्णय

प्रशिक्षण आणि तांत्रिक सक्षमीकरण गरजेचे

महिलांना केवळ साहित्य देऊन न थांबता त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ३ ते १२ डिसेंबर २०२५ या कालावधीत १२ दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. कोल्हापूर येथील तज्ज्ञ मार्गदर्शक विद्या कांबळे आणि सुनील कांबळे यांनी महिलांना मधमाशी पालन, मध संकलन आणि शास्त्रीय व्यवस्थापनाचे धडे दिले. जांभोरी येथे आयोजित भव्य कार्यक्रमात उद्योजक रमेशभाऊ येवले, भीमाशंकर कारखान्याचे संचालक गणेश कोकणे, सेवानिवृत्त अप्पर आयुक्त अभिमन्यू काळे, जिल्हाध्यक्ष देविदास दरेकर, सरपंच प्रदीप आमुंडकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते मधपेट्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी किसन पारधी आणि अजय मुलुक यांनी विशेष परिश्रम घेतले.

हे देखील वाचा : मासिक पाळीमध्ये महिलांना पगारी रजा..! पेड पिरीयड लीव याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

जळाऊ सरपण साठा; वनविभागाची कारवाई

आंबेगाव तालुक्यातील शिनोली परिसरात विनापरवाना जळाऊ सरपण साठवून ठेवलेल्या वीटभट्टी मालकाविरोधात वनविभागाने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत सुमारे १५ घनमीटर जळाऊ सरपण जप्त करण्यात आले असून संबंधित प्रकरणाचा पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल, शिनोली व त्याच्या सहका-यांनी मौजे शिनोली येथे शिनोली-उगलेवाडी रस्त्यालगत असलेल्या एका वीटभट्टीवर पाहणी केली. या पाहणीदरम्यान वीटभट्टी परिसरात विविध वृक्ष प्रजातींचे मोठ्या प्रमाणात जळाऊ सरपण साठवून ठेवलेले आढळून आले. वनविभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत सुमारे १५ घनमीटर इतक्या प्रमाणात जळाऊ लाकूड विनापरवाना वाहतूक करून साठवून ठेवले असल्याचे निदर्शनास आले. जप्त करण्यात आलेल्या सरपणामध्ये रायवळ जातीचे निलगिरी, कडुलिंब, बोर, करंज, अकेशिया, चिंच, पिपळ आणि उंबर या विविध वृक्षप्रजातींचा समावेश असल्याचे वनविभागाने स्पाट कल

Web Title: Bee keeping industry in jambhori village undertaken by tribal women through self help groups

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • daily news
  • honey
  • pune news
  • pune news update

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Live Updates Today: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय; १७ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार
1

Maharashtra Breaking News Live Updates Today: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय; १७ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट
2

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
3

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर
4

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.