Photo Credit L team Navrashtra
मुंबई : राज्यात सर्वांनाच विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहेत. राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाकडून कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. पण राज्यातील विधानसभा निवडणूका कधी होणार, आचारसंहिता कधी लागणार असेही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अशातच राज्यातील विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याची माहिती समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक आचारसंहिता लागू शकते. तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा: विनेश फोगाट मेडलशिवाय भारतात परतणार? पहिला लुक आला समोर
राज्यातील निवडणुका दिवाळीनंतर होणार असल्या तरी राजकीय पक्षांनी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यभरात राजकीय पक्षांच्या सभा, दौरे, बैठका होऊ लागल्या आहेत. तरीही नव्या विधानसभेसाठीआणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये लागणार असबव नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान आणि त्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मतमोजणी होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीतील संघर्ष संपूर्ण राज्याने पाहिला. महाविकास आघाडीला राज्यात चांगले यश मिळाले. तर महायुतीला मात्र अपेक्षित यश मिळवता आले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वासही दुणावला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत समीकरणेही बदलणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे विधासभा निवडणुकीतही लोकसभेची पुनरावृत्ती होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा: Smartphone Tips: खराब स्मार्टफोन होईल नव्यासारखा! फक्त ‘या’ टिप्स फॉलो करा
दुसरीकडे, आगामी निवडणुकीसाठी मनसे आणि वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली आहे. राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौराही सुरू झाला आहे. एकापाठोपाठ सभा, बैठका होऊ लागल्या आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला दिवाळी असल्याने दुसऱ्या आठवड्यात मतदान प्रकिया आणि तिसऱ्या किंवा चौख्या आठवड्यात म्हणजे साधार 15 ते 20 नोव्हेंबरच्या आसपास निवडणुकीचा निकाल जाहीर होऊ शकतो. असेही काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.