फोटो सौजन्य - IANS
विनेश फोगाट : भारतीय स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिची डिसक्वालिफिकेशन केस सुरु आहे. सध्या जगभरामध्ये या संदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे. परंतु अजुनपर्यत यासंदर्भात CAS कोणत्याही प्रकारचा निर्णय दिला नाही त्यामुळे आता विनेश फोगाटला सिल्वर मेडल मिळणार की नाही याबाबत कोणत्याही प्रकारचा अजूनपर्यत खुलासा झाला नाही. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या अमन सेहरावतसह विनेश नवी दिल्लीत उतरेल. विनेश मंगळवारी भारतीय वेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरेल.
हेदेखील वाचा – नीरज चोप्रा मायदेशी न येता जर्मनीला रवाना, का गेला विदेशात? वाचा सविस्तर प्रकरण
आता एक मोठी बातमी समोर आली आहे की, विनेश फोगाट लवकरच मायदेशी परतणार आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये विनेश फोगाट तिच्या बॅग घेऊन जाताना दिसत आहे. परंतु दुसरीकडे विनेशचे पती सोमवीर राठी यांनी एका मीडिया मुलाखतीत सांगितले की, विनेशच्या परतण्याबाबत अद्याप कोणतेही अपडेट आलेले नाही.पण सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओनुसार, विनेश सोमवारी पॅरिसहून भारताला निघताना दिसत आहे. सीएएसने अद्याप कोणताही निर्णय न दिल्यामुळे विनेश पदकाविना भारतात परतणार का, अशी अटकळ बांधली जात आहे.
In visuals: Wrestler Vinesh Phogat outside the Games Village in Paris pic.twitter.com/RyMRk36pxL
— IANS (@ians_india) August 12, 2024
कुस्तीपटू विनेश फोगटने सिल्वर मेडलची मागणी CAS कडचे केली होती. सीएएस याआधी भारतीय वेळेनुसार १० ऑगस्ट रोजी या अपीलवर निकाल देणार होती, परंतु आता ही तारीख १३ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, ११ ऑगस्टपर्यंत विनेश फोगट आणि युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तरे मागवण्यात आली होती.