Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: मुंबईकरांच्या कटिंगला साखरेचा कडू घोट; तलफ कशी भागणार? वाढत्या महागाई खिशावर भार

साखरेच्या दरात वाढ झाल्यामुळे मुंबईची ओळख असलेला कटिंग चहा सुद्धा महागला आहे. १३ रुपयांचा कटिंग आता १४ रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारात साखरेच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामन्य नागरिकांना सुद्धा महागाईचा फटका बसला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 31, 2026 | 11:25 AM
मुंबईकरांच्या कटिंगला साखरेचा कडू घोट; तलफ कशी भागणार? वाढत्या महागाई खिशावर भार

मुंबईकरांच्या कटिंगला साखरेचा कडू घोट; तलफ कशी भागणार? वाढत्या महागाई खिशावर भार

Follow Us
Follow Us:

मुंबईची ओळख असलेला कटिंग चहा पुन्हा एकदा महागण्याच्या वाटेवर आहे. चहातील गोडवा वाढवणारी साखरच आता कडू झाली आहे. किरकोळ बाजारात साखर ५८ रुपये किलोवर पोहोचल्याने टपरीचालकांचे गणित बिघडले असून, १३ रुपयांचा कटिंग आता १४ रुपयांवर जाणार का, याची चर्चा चहाच्या टपऱ्यांवर रंगू लागली आहे.(फोटो सौजन्य – istock)

रुग्णालयांची दर सहा महिन्यांनी सुरक्षा तपासणी! आगीचा धोका; अनेक ठिकाणी आढळल्या त्रुटी, अमरावती घटनेनंतर यंत्रणेला जाग

काही आठवड्यांपूर्वी ४९-५० रुपये असलेली साखर थेट ७५-८० रुपयांपर्यंत गेली होती. सध्या दर थोडा उतरला असला तरी तो अजूनही महिन्याभरापूर्वीच्या तुलनेत महागच आहे. चहाच्या दरवाढीची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी इंधनटंचाई आणि इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला. दुधाच्या दरवाढीने फटका बसला, चहापती, पेपर कप आणि इतर साहित्यही महागले, त्यामुळे १० रुपयांना मिळणारा कटिंग आता १३ रुपयांवर पोहोचला आहे, काही ठिकाणी ५ रुपयांचा छोटा चहा ६ रुपयांवर गेला आहे. विक्रेत्यांच्या मते, दररोज किलोमध्ये साखर लागणाऱ्या व्यवसायात प्रतिकिलो ८-१० रुपयांची वाढही महिन्याला हजारोंचा फटका देते. त्यामुळे सध्याचा दर टिकवणे कठीण होत आहे. ग्राहकांच्या खिशालाही याचा फटका बसणार असून, रोज दोन कटिंग घेणाऱ्याला महिन्याला ६० रुपये, तर तीन कटिंग घेणाऱ्याला ९० रुपये अधिक मोजावे लागतील, चहाच्या व्यवसायात रोज मोठ्या प्रमाणात साखर लागते, त्यामुळे प्रतिकिलो काही रुपयांची वाढही मासिक खर्चात लक्षणीय भर घालते.

इंधन, दूध यानंतर आता साखरेची झळ बसल्याने मुंबईकरांच्या रोजच्या कटिंगचा गोडवा टिकवण्यासाठी आणखी पैसे मोजावे लागणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. साखरेचे दर चढेच राहिल्यास चहाच्या दरात आणखी वाढ अटळ असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. वाढत्या खर्चाचा थेट परिणाम वदत्यायावरचा आहे. परिणाम दरवाढ नको असते; मात्र दूध, साखर, चहापती आणि अन्य साहित्याचा खर्च वाढत असल्याने जुना दर कायम ठेवणे कठीण होत आहे. साखरेचे दर पुढे कसे राहतात, हे पाहून पुढील निर्णय घ्यावा लागेल.

पीओपी मूर्तींसाठी विसर्जनानंतर स्वतंत्र शेड! पुनर्वापराचे पर्याय शोधण्यासाठी महानगरपालिकेची तयारी

साखर महागल्याचा परिणाम छोट्या चहावरही दिसू लागला आहे. काही टपन्यांवर ५ रुपयांचा छोटा चहा ६ रुपयांना विकला जात आहे. मात्र कटिंगच्या दरात अद्याप सर्वत्र वाढ झालेली नाही. अनेक विक्रेते साखरेचे पुढील दर कसे राहतात, याकडे लक्ष ठेवून आहेत.एका रुपयाची वाढ किरकोळ वाटली तरी नियमित चहा पिणाऱ्यांच्या खिशावर त्याचा परिणाम होणार आहे. दिवसाला दोन कटिंग घेणाऱ्याला महिन्याला ६० रुपये अधिक मोजावे लागतील, तर तीन कटिंग घेणाऱ्याचा अतिरिक्त खर्च ९० रुपयांपर्यंत जाईल.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: A bitter bite of sugar for mumbaikars cutting how will the loss be spread rising inflation weighs on pockets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • Mumbai News
  • Sugar
  • Sugar Price

संबंधित बातम्या

दिवाळीत ‘लालपरी’ थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, परिवहन मंत्री काय म्हणाले?
1

दिवाळीत ‘लालपरी’ थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, परिवहन मंत्री काय म्हणाले?

Mumbai News: प्रकाशातील अदृश्य बदल आता टिपणार ग्राफीन! आयआयटी मुंबईच्या संशोधनातून अचूक मापनाची नवी दिशा
2

Mumbai News: प्रकाशातील अदृश्य बदल आता टिपणार ग्राफीन! आयआयटी मुंबईच्या संशोधनातून अचूक मापनाची नवी दिशा

गोणीत बांधून समुद्रात फेकलेला मृतदेह कोणाचा? तपासात धक्कादायक खुलासा; सहा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
3

गोणीत बांधून समुद्रात फेकलेला मृतदेह कोणाचा? तपासात धक्कादायक खुलासा; सहा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Mumbai News : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आझाद मैदानात DYFI आणि SFI चे आंदोलन; ‘वोट चोरी’चा आरोप
4

Mumbai News : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आझाद मैदानात DYFI आणि SFI चे आंदोलन; ‘वोट चोरी’चा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.