
सांगली भाजपचे शिष्टमंडळ मुंबईत (फोटो सौजन्य - X.com)
महापालिका निवडणूकीत सांगलीत भाजपमध्ये प्रचंड गटबाजी, जुना नवा वाद उफाळला आहे. त्यामुळे गेली काही दिवस तिकीट वापट फायनत होत नाहीत. त्यात पक्षांचे यावेळी 78 जागांसाठी तब्बल 529 जणांचे अर्ज आले आहेत. त्यामुळे भाजपसमोर बंडखोरी टाळ्याचेही मोठे आव्हान आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पक्षांतर्गत गटबाजीवर तोडगा काढला आहे. सर्व नेत्यांत समन्वय करण्याचा प्रयत्न केला आहे.
गद्दारी करणाऱ्यांना त्यांच्याच प्रभागात जागा दाखवू; आमदार जयंत पाटलांचा इशारा
तिकीट वाटपाची चर्चा
तीन दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी थेट मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांसमोरच सांगलीच्या तिकीट वाटपाची चर्चा केली. त्यावेळीही प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्र्यांच्या बैठकीत सांगलीत नेत्यांची गटबाजी उफाळून आली. एका महिला नेत्यांनेही रुद्रावतार धारण करत नेत्यांना खडे बोल सुनावले. यानंतर मुख्यमंत्र्यांसमोरही पक्षातील स्थानिक नेत्यांतील गटबाजी दिसून आली. यानंतर हे नेते पुन्हा सांगलीत आले.
शनिवारी झाली चर्चा
शनिवारी शहरातील एका हॉटेलमध्ये आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार, प्रकाश ढंग यांच्यासह अन्य नेत्यांची उमेदवारी वाटपावर चर्चा झाली. यावेळी काही प्रभागातील उमेदवार निश्चित करण्यात आले. मात्र काही ठिकाणी नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याने अखेर पुन्हा मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आला असून पालकमंत्री पाटील यांनीही मुबंईला येण्यास सांगितले आहे. त्यानुसार हे सर्व नेते शनिवारी मुबंईकडे रवाना झाले आहे. रविवारी मुख्यमंत्री, पालकमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांच्याशी चर्चा होणार आहे. यानंतर भाजपची यादी अंतिम होण्याची शक्यता आहे
अंतिम यादी निश्चित होत आहे
महापालिका निवडणूुकीसाठी भाजपची उमेदवारांची अंतिम यादी निश्चित होत आहे. सांगलीतील तीन ते चार प्रभाग व मिरजेत एका प्रभागात वादाचा विषय आहे. सांगलीत गावभागातील प्रभाग 14 व वखारभागातील प्रभाग 12 मध्ये शिवप्रतिष्ठानने आपल्या उमेदवारांसाठी आग्रह धरला आहे. तसेच प्रभाग क्रमांक 9 व 10 मध्ये आ. गाडगीळ व जयश्री पाटील यांच्यात काही उमेदवारांवर एकमत होईना. याबाबत आता मुंबईत निर्णय होणार आहे.
सांगली मनपामध्ये माजी खासदारांचे पॅनल, तासगावचा गड जिंकून संजयकाकांची सांगलीकडे कूच
शिवसेनेबाबत आज निर्णय
भाजपने महापालिका निवडणूक महायुतीतून लढण्याची भूमिका जाहीर केली होती. मात्र राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. आरपीआय व शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाशी चर्चा सुरु होती. मात्र काही जागांवर एकमत होत नव्हते. आता आपीआयचा विषय संपला असून या पक्षाचे उमेदवार भजापच्या चिन्हावरच लढणार आहे. शिवसेनेचा मिरजेतील तिढा कायम आहे. त्यामुळे या पक्षाबरोबर युतीबाबात रविवारी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करुन निर्णय होणार आहे.