Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMC Election Result 2026: स्वीकृत नगरसेवक पदांसाठी स्पर्धा रंगणार; मात्र मर्यादित जागा ठरणार डोकेदुखी

यंदाच्या निवडणुकीत पुणे मनपात १६५ नगरसेवक निवडून आले आहेत. उमेदवारी वाटपाच्या टप्प्यावर, विशेषतः भाजपमध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड होती. तिकीट न मिळाल्याने काहींनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 19, 2026 | 09:38 AM
PMC Election Result 2026:  स्वीकृत नगरसेवक पदांसाठी स्पर्धा रंगणार; मात्र मर्यादित जागा ठरणार डोकेदुखी
Follow Us
Close
Follow Us:
  • महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यानेअनेकजण नाराज
  • नाराजी शमवण्यासाठी राजकीय पक्षांनी ‘स्वीकृत नगरसेवक’ (नॉमिनेटेड कॉर्पोरेटर) पदांचे आश्वासन
  • यंदाच्या निवडणुकीत पुणे मनपात १६५ नगरसेवक निवडून आले आहेत
पुणे शहर प्रतिनिधी: पुणे महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची नाराजी शमवण्यासाठी राजकीय पक्षांनी ‘स्वीकृत नगरसेवक’ (नॉमिनेटेड कॉर्पोरेटर) पदांचे आश्वासन दिले होते. मात्र शासनाने ठरवून दिलेल्या कोट्यामुळे आता हीच आश्वासने पक्षनेत्यांसाठी अडचणीची ठरण्याची चिन्हे आहेत. नियमानुसार भाजपला सात, राष्ट्रवादी काँग्रेसला दोन आणि काँग्रेसला केवळ एकच स्वीकृत नगरसेवक पद मिळणार आहे. अपेक्षा मोठ्या आणि जागा कमी—यामुळे अंतर्गत असंतोष पुन्हा उफाळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पुणेकरांना मनस्ताप? Grand Challenge Tour मुळे ‘हे’ रस्ते बंद; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

राजकीय पुनर्वसनाचा ‘मार्ग’

महानगरपालिकेच्या कामकाजात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी व्हावेत, या उद्देशाने स्वीकृत नगरसेवकांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र या पदांचा वापर अनेकदा निवडणुकीत नाराज झालेल्या कार्यकर्त्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी होतो, ही उघड गोष्ट आहे. स्वीकृत नगरसेवकांना सभागृहात मतदानाचा अधिकार नसतो, तसेच ते इतर कोणत्याही वैधानिक पदावर नियुक्त होऊ शकत नाहीत. तरीही त्यांच्या कामांसाठी अर्थसंकल्पात ठरावीक तरतूद असल्याने या पदांकडे ‘सन्मानजनक प्रवेशद्वार’ म्हणून पाहिले जाते.

नेत्यांची कसरत वाढणार

यंदाच्या निवडणुकीत पुणे मनपात १६५ नगरसेवक निवडून आले आहेत. उमेदवारी वाटपाच्या टप्प्यावर, विशेषतः भाजपमध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड होती. तिकीट न मिळाल्याने काहींनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरले होते. त्या वेळी वरिष्ठ नेत्यांनी समजूत काढत भविष्यात स्वीकृत नगरसेवक पद, वृक्ष प्राधिकरण समिती किंवा प्रभागस्तरीय स्वीकृत सदस्यपद देण्याचे आश्वासन दिले होते. आता नियुक्त्यांची वेळ जवळ येताच, मर्यादित जागांमुळे कोणाला प्राधान्य द्यायचे, हा प्रश्न नेत्यांसमोर उभा ठाकणार आहे.

Beed Crime: बीड हादरलं! GST अधिकारी सचिन जाधवर यांचा कारमध्ये मृत्यू; सुसाईड नोटमुळे खळबळ

सभागृहातील पक्षीय ताकद
भाजप – ११९
राष्ट्रवादी काँग्रेस – २७
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) – ३
काँग्रेस – १५
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – १
एकूण – १६५

मर्यादित स्वीकृत नगरसेवक पदांमुळे अपेक्षाभंग अटळ ठरणार की पक्षनेतृत्व समतोल साधण्यात यशस्वी ठरणार—याकडे आता पुण्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.

Web Title: A fierce competition is expected for the nominated corporator positions however the limited number of seats will be a cause for concern

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • pune news
  • Pune Politics

संबंधित बातम्या

Dharashiv News: शिंदे सेनेतील एक गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत…; तानाजी सावंतांचे खळबळजनक विधान
1

Dharashiv News: शिंदे सेनेतील एक गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत…; तानाजी सावंतांचे खळबळजनक विधान

Raigad News: रायगडमध्ये राजकारण तापलं! आगामी निवडणुकांसाठी नेते कायद्याच्या कचाट्यात, राजकीय हालचालींना वेग
2

Raigad News: रायगडमध्ये राजकारण तापलं! आगामी निवडणुकांसाठी नेते कायद्याच्या कचाट्यात, राजकीय हालचालींना वेग

Maharashtra Politics: उल्हासनगरात शिवसेनेचा महापौर? वंचितच्या 2 नगरसेवकांनी थेट…
3

Maharashtra Politics: उल्हासनगरात शिवसेनेचा महापौर? वंचितच्या 2 नगरसेवकांनी थेट…

पुणेकरांना मनस्ताप? Grand Challenge Tour मुळे ‘हे’ रस्ते बंद; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
4

पुणेकरांना मनस्ताप? Grand Challenge Tour मुळे ‘हे’ रस्ते बंद; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.