घरातून बाहेर पडले मात्र…
सचिन जाधवर हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील चुंब या गावचे रहिवाशी आहेत. मागील काही वर्षात ते बीडच्या जीएसटी कार्यालयात सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी सचिन जाधवर राहत्या घरातून बाहेर पडले मात्र शनिवार पर्यंत घरी परत आले नाही. यावरून त्यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोबाईल लोकेशनद्वारे जाधवर यांचा शोध घेतला. तेव्हा बीड जवळील कपिलधारवाडी परिसरात त्यांचा मृतदेह गाडीत संशयास्पदरित्या आढळून आला.
वरिष्ठांच्या त्रासाचा संशय
पोलिसांना घातपाताचा संशय आल्याने फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकाराचा तपास सुरू केला. मृतदेह शवविच्छेदन करिता पाठविण्यात आला. घटनास्थळाचा पंचनामा करतांना जाधवर यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळली. सुसाईड नोटमध्ये वरिष्ठाच्या त्रासाचे कारण नमूद करण्यात आले आहे. त्या अनुशंगाने पोलिसांनी एका अधिकाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. उपलब्ध झालेल्या पुराव्यानुसार पुढील कारवाई सुरू असल्याचं बीड पोलिसांनी सांगितले.
सखोल चौकशी मागणी
सचिन जाधवर 2012 च्या एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिले आले होते. सर्वांशी मनमिळावू असलेले जाधवर यांच्या मृत्यूचे गूढ संशयास्पद आहे. बंद कारमध्ये मडक्यात कोळसा आणि लाकूड जाळून धूर केल्याचं प्रथम दर्शनी निदर्शनास आलं. त्यामुळे या सर्व घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. ही हत्या आहे की आत्महत्या? याचा देखील तपास करत आहे.
धाराशिवमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर
Ans: सचिन जाधवर, सेल्स टॅक्स ऑफिसर, बीड
Ans: वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय
Ans: सुसाईड नोट, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि वरिष्ठांची भूमिका






