Photo Credit- Team Navrashtra
मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात काळ्या जादूचा संशयित प्रकार उघडकीस आला आहे. न्यायालयाच्या बोर्डाखाली हळद-कुंकू लावलेले नारळ, लिंबू आणि काळ्या बाहुल्या आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या प्रकारामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेतला जात आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कठोर कायदे आहेत आणि अशा प्रकरणांमध्ये कारवाई केली जाते. तरीही न्यायाच्या मंदिरासमोर अशा अंधश्रद्धाजन्य कृत्य घडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि चिंता व्यक्त केली जात आहे.
हा प्रकार घडल्याने हायकोर्टाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. न्यायदानाचे कार्य पार पडणाऱ्या ठिकाणीच अंधश्रद्धेचे हे प्रकार उघडकीस येत असल्याने याची सखोल चौकशी होण्याची मागणी होत आहे.
बाकमी अपडेट होत आहे……