Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळजी घ्या ! उन्हाचा कडाका आणखी वाढणार; 16-17 एप्रिलला उष्णतेची लाट येण्याचा अंदाज

१६ व १७ एप्रिल रोजी तापमानात लक्षणीय वाढ होऊन ते ४२ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक नोंदविले जाण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार असून उष्माघाताचा धोका वाढू शकतो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 15, 2026 | 11:09 AM
काळजी घ्या ! उन्हाचा कडाका आणखी वाढणार; 16-17 एप्रिलला उष्णतेची लाट येणार

काळजी घ्या ! उन्हाचा कडाका आणखी वाढणार; 16-17 एप्रिलला उष्णतेची लाट येणार

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. राज्यातील नागरिकांना भयंकर उकाड्याचा सामना करावा लागत आहे. असे असताना आता पुणे जिल्ह्यात १६ व १७ एप्रिल रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता कुलाबा येथील भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानात वाढ होताना दिसत आहे. तापमानात वाढ होत असल्याने वर्दळीच्या रस्त्यावरही दुपारी शुकशुकाट दिसून येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १६ व १७ एप्रिल रोजी तापमानात लक्षणीय वाढ होऊन ते ४२ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक नोंदविले जाण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार असून उष्माघाताचा धोका वाढू शकतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी १२ ते सायंकाळी ४ दरम्यान घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुरेसे पाणी पिणे, हलके व सैल कपडे परिधान करणे, डोके झाकण्यासाठी टोपी किंवा रुमाल वापरणे तसेच थेट सूर्यप्रकाशापासून दूर राहणे आवश्यक आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, शेतकरी, मजूर आणि बाहेरील काम करणाऱ्या व्यक्तींनी कामाचे वेळापत्रक सकाळी किंवा सायंकाळी ठेवावे, असेही प्रशासनाने सूचविले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासन अलर्ट मोडवर

उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क असून, नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले असून, एप्रिलमध्ये असे तर मे मध्ये कसे असा प्रश्न नागरिकाना पडला आहे.

अकोला ठरले सर्वात उष्ण शहर

दुसरीकडे, विशेषतः विदर्भात तर सूर्य चांगलाच कोपला असून, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचे तापमान ४० अंशांच्या पार पोहोचले आहे. सोमवारी राज्यात सर्वाधिक अकोल्यामध्ये तापमानची नोंद झाली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही अकोला तापले होते. विशेष म्हणजे, जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले आहे. तर देशात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात झाली आहे.

Mumbai Weather : पुन्हा उष्णतेचा कहर! अनेक ठिकाणी पारा 40 अंशांपलीकडे, हवामान विभागाचा इशारा

Web Title: A heatwave is expected in maharashtra on april 16 and 17

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • Maharashtra Weather
  • pune news

संबंधित बातम्या

पुण्यातील अनधिकृत होर्डिंग आता पाडली जाणार; महापालिका प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर
1

पुण्यातील अनधिकृत होर्डिंग आता पाडली जाणार; महापालिका प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर

बाजारात हापूस आंब्यांचा दर तेजीतच; उत्पादन घटले अन् मागणी वाढली
2

बाजारात हापूस आंब्यांचा दर तेजीतच; उत्पादन घटले अन् मागणी वाढली

पुणे जिल्हा परिषदेत विषय समित्यांचे वाटप; हुलावळे अन् नलावडे यांच्यावर ‘ही’ मोठी जबाबदारी
3

पुणे जिल्हा परिषदेत विषय समित्यांचे वाटप; हुलावळे अन् नलावडे यांच्यावर ‘ही’ मोठी जबाबदारी

Khanwadi School Case: चुकीची माहिती पसरवणे पडले महागात; शिक्षण विस्तार अधिकारी निलंबित
4

Khanwadi School Case: चुकीची माहिती पसरवणे पडले महागात; शिक्षण विस्तार अधिकारी निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.