Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्लास्टरसाठी रुग्णाकडून 400 रुपयांची लाच; पैसे मागणाऱ्या ‘त्या’ कामगाराला केले निलंबित

कल्याण डोंबिवली पालिकेच्या कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयातील एका सफाई कामगाराला निलंबित केले आहे. मुकेश पंडित असे या सफाई कामगाराचे नाव आहे. त्याची विभागीय चौकशीही प्रस्तावित करण्यात येणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 16, 2026 | 12:15 PM
प्लास्टरसाठी रुग्णाकडून 400 रुपयांची लाच; पैसे मागणाऱ्या 'त्या' कामगाराला केले निलंबित

प्लास्टरसाठी रुग्णाकडून 400 रुपयांची लाच; पैसे मागणाऱ्या 'त्या' कामगाराला केले निलंबित

Follow Us
Follow Us:

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या कल्याण मधील रुक्मिणीबाई रुग्णालयातील एक सफाई कामगार दोन दिवसापूर्वी रात्रीच्या वेळेत एका रुग्णाकडून दुखावलेल्या पायाला प्लास्टर करण्यासाठी ४०० रूपये मागत होता. यासंबंधीची दृश्यध्वनी चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित होताच, पालिका प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्या सफाई कामगाराला तडकाफडकी शुक्रवारी पालिका सेवेतून निलंबित केले आहे. मुकेश पंडित असे या सफाई कामगाराचे नाव आहे.

पालिकेची शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई रुग्णालये अनागोंदी कारभारामुळे गेल्या दोन वर्षापासून चर्चेत आहेत. तरीही पालिका प्रशासन या रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या बदल्या, झाडाझडती करत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. अलीकडेच एका कारवाईच्या फेऱ्यात सापडलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याशी मुकेश पंडितचे सलोख्याचे संबंध असल्याची पालिका रुग्णालयात चर्चा आहे. या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने सफाई कामगार असुनही मुकेश पंडित रुग्णांना आपण रुग्ण सेवेतील मोठे जाणकार असल्याचा आव आणून मार्गदर्शन करत असत, अशा तक्रारी आहेत. बुधवारी संध्याकाळी चार वाजता बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात एक रुग्ण डाव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी दाखल झाला. यावेळी कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्याने त्या रुग्णाला तपासले. त्यांच्या पायाला फॅक्चर असल्याने पायाला आधार देण्यासाठी त्याला प्लास्टर करण्याचा सल्ला दिला. हे प्लास्टर सकाळी अस्थितज्ज्ञ डॉक्टर करतील असे ठरले.

दरम्यान, संबंधित रुग्णाला प्लास्टर करण्यासाठी कक्षात नेण्यात आले. तेथे सफाई कामगार मुकेश पंडितने रुग्णाच्या नातेवाईकांकडून प्लास्टर ऑफ पॅरिसचे साहित्य आणण्यासाठी ४०० रूपयांची मागणी केली. रुक्मिणीबाई रुग्णालयात प्लास्टर करण्याच्या साहित्याचा पुरेसा साठा होता. ते साहित्य पंडितने रुग्णाला उपलब्ध करून देणे आवश्यक होते. पंडितने रुग्ण, नातेवाईकांची अडवणूक करून त्यांच्याकडे पैसे दिल्याशिवाय प्लास्टर होणार नाही अशी भूमिका घेतली. रुग्णाच्या नातेवाईकांनी कर्मचारी प्लास्टर करण्यासाठी कसे पैसे मागतो याची गुपचूप मोबाईलमधून दृश्यध्वनी चित्रफित तयार केली.

हे सुद्धा वाचा : क्षुल्लक भांडणाचा भयंकर शेवट; पत्नीचा मृत्यू, आईला फोन लावला अन् घाबरलेल्या पतीनेही उचलले टोकाचे पाऊल

रुग्णालयातील मुकेश पंडितच्या अनेक तक्रारी 

रुक्मिणीबाई रुग्णालयात प्लास्टर नसल्याची आणि त्यासाठी रुग्णाकडे कामगार मुकेश पंडित पैसे मागत असल्याच्या दृश्यध्वनी चित्रफितीची वैद्यकीय आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी गंभीर दखल घेतली. रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आला. या अहवालात रुग्णालयात व अपघात कक्षात प्लास्टरचा पुरेसा साठा आहे. तरीही सफाई कामगार पंडितने रुग्णाच्या नातेवाईकांकडे पैशांची मागणी केली. पंडितच्या गैरवर्तनामुळे पालिकेची आणि रुग्णालय प्रशासनाची बदनामी झाली म्हणून त्यांनी आपल्या कर्तव्यात कसुरी आणि गैरवर्तन केल्याने महाराष्ट्र नागरी सेवा व शिस्त नियमाने त्याला पालिका सेवेतून डॉ. दीपा शुक्ल यांनी निलंबित केले आहे. त्याची विभागीय चौकशीही प्रस्तावित करण्यात येणार आहे.

Web Title: A hospital worker at rukminibai hospital has been suspended for demanding money from a patient

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • Hospital
  • kalyan
  • Kalyan Dombivli Municipal

संबंधित बातम्या

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास
1

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास

KDMC News: केडीएमसीची STP निविदा वादात; नव्या कंत्राटदारांना संधी नसल्याचा नितीन तरे यांचा आरोप
2

KDMC News: केडीएमसीची STP निविदा वादात; नव्या कंत्राटदारांना संधी नसल्याचा नितीन तरे यांचा आरोप

Kalyan News: जागतिक हृदय दिनानिमित्त कल्याणमध्ये ‘हर घर CPR हिरो’ उपक्रम; १५० हून अधिक सहभागी
3

Kalyan News: जागतिक हृदय दिनानिमित्त कल्याणमध्ये ‘हर घर CPR हिरो’ उपक्रम; १५० हून अधिक सहभागी

Kalyan Maggi News: ईईईई…मॅगी खाण्यापूर्वीच दिसल्या आळ्या; पॅकेटची एक्सपायरी 2027, FDAच्या कारवाईदरम्यान कल्याणमधील प्रकाराने खळबळ
4

Kalyan Maggi News: ईईईई…मॅगी खाण्यापूर्वीच दिसल्या आळ्या; पॅकेटची एक्सपायरी 2027, FDAच्या कारवाईदरम्यान कल्याणमधील प्रकाराने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.