Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar Airport : पुरंदर विमानतळाबाबत मोठी अपडेट; भूसंपादन दरनिश्‍चितीसाठी ‘या’ तारखेला होणार बैठक

पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. भूसंपादन दर निश्चितीसाठी सोमवारी बैठक घेण्यात येणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 06, 2025 | 11:24 AM
Purandar Airport, Pune News, Land Acquisition, Maharashtra Infrastructure,

Purandar Airport, Pune News, Land Acquisition, Maharashtra Infrastructure,

Follow Us
Follow Us:
  • पुण्यातील पुरंदर विमानतळाबाबत मोठी अपडेट
  • भूसंपादन दरनिश्‍चितीसाठी होणार बैठक
  • शेतकऱ्यांशी चर्चा करून दर निश्चित होणार
पुणे : प्रस्तावित आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी आवश्यक असलेली परवानगी राज्य सरकारकडून मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांशी चर्चा करून भूसंपादनासाठी देण्यात येणाऱ्या मोबदल्याबाबतचे दर निश्चित केले जाणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने येत्या सोमवारी (दि. ८) बैठक आयोजित केली आहे. जमीन संपादनाच्या दृष्टीने ही बैठक एक महत्वाचा दुवा ठरणार आहे.

 

पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. भूसंपादनापोटी द्यावयाच्या मोबदल्याच्या रकमेचा तपशील असलेला अहवाल ११ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. हा अहवाल राज्य शासनाने मान्य करून उद्योग विभागाकडे पाठविला. या अहवालाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कायद्यातील ३२ (१) कलमानुसार उद्योग विभागाची मान्यता मिळणे आवश्यक असते. आठ दिवसांपूर्वी उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चर्चा केली होती. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या ३२(१) च्या प्रस्तावाला उद्योग विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता मिळाल्याने आता जमिनीच्या दरासंदर्भात शेतकऱ्यांशी वाटाघाटी करण्यास जिल्हा प्रशासनाला अडचण जाणवणार नाही.

पुरंदर तालुक्यातील सात गावांतील १ हजार २८५ हेक्टर अर्थात तीन हजार एकर जमिनीचे संपादन करण्यात येत आहे. त्यापैकी सुमारे सव्वा बाराशे हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांकडून संमती मिळाली आहे. सुमारे ५० हेक्टर क्षेत्रासाठी अद्याप संमती मिळणे बाकी आहे. त्याशिवाय, नकाशाच्या बाहेरील सुमारे २४० हेक्टर जमीन देण्यासाठी देखील शेतकऱ्यांची मान्यता दिली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कायद्यातील ३२ (३) तरतुदीनुसार शेतकऱ्यांना द्यावयाच्या मोबदल्याबाबतचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

प्रस्तावित आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांशी चर्चा करून दर निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या सोमवारी बैठक आयोजित केली आहे. दराबाबतचा निर्णय झाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी.

Web Title: A major update has been received regarding purandar airport in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 11:22 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Purandar Airport

संबंधित बातम्या

दुष्काळाच्या झळा, शेतकऱ्यांना मदतीची आशा; दौंड तालुक्यात पीक नुकसानीचे पंचनामे सुरू
1

दुष्काळाच्या झळा, शेतकऱ्यांना मदतीची आशा; दौंड तालुक्यात पीक नुकसानीचे पंचनामे सुरू

Maharashtra Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद! दुष्काळी परिस्थितीवर फडणवीसांची केंद्रीय पथकासोबत महत्त्वाची बैठक
2

Maharashtra Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद! दुष्काळी परिस्थितीवर फडणवीसांची केंद्रीय पथकासोबत महत्त्वाची बैठक

विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्यास उद्याचे आंदोलन महागात पडेल; आमदार रोहित पवारांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
3

विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्यास उद्याचे आंदोलन महागात पडेल; आमदार रोहित पवारांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

विद्यार्थ्यांवर नाही, माझ्यावर गुन्हे दाखल करा! रोहित पवार आक्रमक; फडणवीसांवरही साधला निशाणा
4

विद्यार्थ्यांवर नाही, माझ्यावर गुन्हे दाखल करा! रोहित पवार आक्रमक; फडणवीसांवरही साधला निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.