नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पार पडणार आहेत. राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुकांचं बिगूल पावसाळ्यानंतर वाजू शकतं याचे कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी उद्या होणार आहे.दरम्यान राज्य सरकारने पंधरा दिवसांचा वेळ मागितल्याने मागील वेळेस होणारी सुनावणी टळली होती. त्यामुळे आता मनपा, जिल्हा परिषद निवडणुकांची तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका याबाबत सुप्रीम कोर्टात गेल्या अनेक महिन्यांपासून सुनावणी सुरु आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये, असं सत्ताधारी आणि विरोधकांचं म्हणणं आहे. याचसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच ठाकरे सरकारने मुंबई महापालिकेच्या वॉर्ड रचनेत बदल केले आहेत. पण शिंदे सरकारने सत्तेत येताच वॉर्ड रचनेत बदल न करता ती जैसे थी तसंच ठेवण्याचा निर्णय घेतला. शिंदे गटाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. याबाबत गेल्या वर्षभरापासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे.
कोरोना संकटामुळे अनेक महापालिकांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. खरंतर एखाद्या महापालिकेवर सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रशासन प्रशासक असू शकत नाही. पण कोरोना संकटापासून प्रशासनच महापालिकांचं कामकाज पाहत आहे. सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. त्यामुळे या निवडणुका रखडल्या. त्यानंतर या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. तेव्हापासून सातत्याने या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत.
मुंबईसह महत्वाच्या महापालिकेसाठी भाजप, शिवसेनेची जय्यत तयारी
एकीकडे महापालिका निवडणुका कधी होणार याबाबत स्पष्टता नाही तर दुसरीकडे सर्व पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत. मुंबईत भाजप आणि सत्ताधारी शिवसेना पक्ष चांगलाच कामाला लागले आहेत