Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील 14 वर्षीय मुलीला लग्नाच्या आमिषाने नेलं अन् मध्य प्रदेशात 50 हजारांत विकलं, इतकंच नाहीतर…

कात्रज परिसरातून एक १४ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. नातेवाईकांनी मुलगी बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दिली. या तक्रारीचा तपास उपनिरीक्षक अतुल थोरात हे करत होते. त्यांना मुलीला प्रेमाच्या जाळ्यातून मध्यप्रदेशात नेल्याची माहिती मिळाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 27, 2023 | 07:01 PM
पुण्यातील 14 वर्षीय मुलीला लग्नाच्या आमिषाने नेलं अन् मध्य प्रदेशात 50 हजारांत विकलं, इतकंच नाहीतर…
Follow Us
Follow Us:

पुणे : विवाहासाठी एका १४ वर्षीय महाराष्ट्रीयन मुलीची (Maharashtrian Girl Sold in MP) फसवणूक करत मध्यप्रदेशात नेऊन ५० हजारात विक्री केली. तसेच, तिचा येथील एका तरुणाशी विवाह जबरदस्तीने लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीला प्रियकर मध्य प्रदेशात गेल्याची बतावणी केली. तसेच, तिला तुला भेट घालून देते आणि तुझा त्याच्याशी विवाहही लावते म्हणत नोकरीच्या बहाण्याने पुण्यात आलेल्या मध्यप्रदेशातील महिलेने पुण्यातून नेले होते. पण, भारती विद्यापीठ पोलिसांनी या मुलीची मध्यप्रदेशातील ग्यारा ग्राम या गावातून सुखरूप सुटका करून महिलेसह तरुणाला अटक केली आहे.

धर्मेंद्र किलेदारसिंग यादव (वय २२, रा. ग्यारा ग्राम, ता. सेवढा, जि. दतिया. मध्यप्रदेश) तसेच शांती उर्फ सन्तो हरनाम कुशवाह (वय ४०) यांना अटक केली आहे. याप्रकरणात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद होता. ही कारवाई परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात, रवींद्र चिप्पा, सागर कोंडे, पुजा लोंढे व त्यांच्या पथकाने केली आहे.

कात्रज परिसरातून एक १४ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. नातेवाईकांनी मुलगी बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दिली. या तक्रारीचा तपास उपनिरीक्षक अतुल थोरात हे करत होते. त्यांना मुलीला प्रेमाच्या जाळ्यातून मध्यप्रदेशात नेल्याची माहिती मिळाली. माहिती घेताना मुलगी ग्यारा ग्राम शहरात असल्याचे समजताच पोलिसांनी पथकाने याठिकाणी धाव घेतली. एका घरात छापेमारी करत मुलीची सुखरूप सुटका केली.

मुलीकडे चौकशी केल्यानंतर शांती उर्फ सन्तो हिने या मुलीला येथे आणल्याचे समजले. पोलिसांनी प्रथम शांतीला पकडले. तसेच तिला विचारपूस केल्यानंतर पूर्ण घटनेचा पर्दाफाश झाला. तिने धर्मेंद्र याला ५० हजारांत या मुलीला विवाहासाठी विक्री केल्याचे समोर आले.

Web Title: A minor girl took at mp with fake marriage promise and sold her in 50 thousands nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2023 | 07:01 PM

Topics:  

  • a minor girl
  • crime news
  • Fake Marriage Promise
  • maharashtra

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.