Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रस्ता नसल्याचा रुग्णाला बसला फटका; चक्क झोळीतून नेण्यात आले रुग्णालयात

मागील तीन वर्षांपासून नागरिक या रस्त्याच्या कामासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. अनेक वेळा तक्रारी, अर्ज आणि विनंत्या करूनही अद्याप कोणतीच ठोस कार्यवाही झालेली नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 12, 2025 | 11:59 AM
रस्ता नसल्याचा रुग्णाला पुन्हा फटका; झोळीतून नेण्यात आले रुग्णालयात

रस्ता नसल्याचा रुग्णाला पुन्हा फटका; झोळीतून नेण्यात आले रुग्णालयात

Follow Us
Follow Us:

सफाळे : रस्त्याअभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यात आता सफाळे पश्चिम येथील टेपाचापाडा (पाटीलनगर) भागात रस्ता नसल्याने नागरिकांना अक्षरशः दररोज त्रास सहन करावा लागत आहे. बुधवारी सकाळी या भागातील एका वयोवृद्ध महिलेला अचानक अस्वस्थता जाणवली. तातडीने रुग्णालयात नेण्याची गरज होती. मात्र, रस्ता नसल्याने ग्रामस्थांना तिला चादरीत झोळी करून उचलत तब्बल दीड किलोमीटर चालत न्यावे लागले. पुढे पक्का रस्ता मिळालेल्या ठिकाणाहून तिला वाहनाद्वारे विरार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मागील तीन वर्षांपासून नागरिक या रस्त्याच्या कामासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. अनेक वेळा तक्रारी, अर्ज आणि विनंत्या करूनही अद्याप कोणतीच ठोस कार्यवाही झालेली नाही. पावसाळ्यात हीच वाट चिखलमय बनते, त्यामुळे शाळकरी मुले, गर्भवती महिला, आणि वृद्धांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. स्थानिकांच्या मते, रेल्वे रुळांवर मालगाड्‌या थांबवल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होतात, आणि त्यातच योग्य रस्ता नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत मदत मिळणे अशक्य बनते.

हेदेखील वाचा : Marathwada News : पूरग्रस्त बळीराजासाठी कल्याणकर सरसावले; मराठवाड्यात जीवनावश्यक वस्तू -अन्नधान्य आणि औषधांचा ताफा रवाना

टेपाचापाडा परिसरातील ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायत, रेल्वे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींना या समस्येबाबत कळविले आहे. ‘आम्ही अनेक वर्षांपासून मागणी करत आहोत, पण प्रशासन कानाडोळा करत आहे. आज एका रुग्णाला झोळीतून न्यावं लागलं, कुणाचा जीव जाईल, हे सांगता येणार नाही’, असे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

तातडीने उपायाची मागणी

या भागात तातडीने पक्का रस्ता तयार करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Web Title: A patient carried to the hospital in a sling incident in saphale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 11:59 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Palghar news

संबंधित बातम्या

Jalgaon News: उपवर्गीकरणाविरोधात मुक्ताईनगरात ‘एल्गार’! सकल बौद्ध समाजाचा विराट मोर्चा
1

Jalgaon News: उपवर्गीकरणाविरोधात मुक्ताईनगरात ‘एल्गार’! सकल बौद्ध समाजाचा विराट मोर्चा

Jai Jawan Govinda Pathak Dahi Handi 2026: १० थरांची हॅट्रिक करणारा जय जवान यंदा ९ थरांवरच अडकला! मैदानात नेमकं काय घडलं?
2

Jai Jawan Govinda Pathak Dahi Handi 2026: १० थरांची हॅट्रिक करणारा जय जवान यंदा ९ थरांवरच अडकला! मैदानात नेमकं काय घडलं?

Jalgaon News: २ रुपयांचा भाव पाहून शेतकऱ्याचा संताप! दीड लाखांचा खर्च करून पिकवलेली भेंडी रस्त्यावर फेकली
3

Jalgaon News: २ रुपयांचा भाव पाहून शेतकऱ्याचा संताप! दीड लाखांचा खर्च करून पिकवलेली भेंडी रस्त्यावर फेकली

Pune News : पुण्यात ‘सेंटिएंट’ बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी; फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन
4

Pune News : पुण्यात ‘सेंटिएंट’ बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी; फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.