
Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
यासंदर्भाता तहसीलदार गोपाळ पाटील यांच्यामार्फत जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेचा एक निवेदन सादर केले. तालुक्यातील भूजल पातळी अत्यंत खालच्या स्तरावर गेल्याने विहिरी व कूपनलिकांनी तळ गाठला आहे. परिणामी, शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि गुरांच्या चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गिरणा धरणातून पाटाद्वारे पाण्याचे तीन आवर्तन सोडल्यास परिसरातील विहिरी व कूपनलिकांचे पुनर्भरण होऊन जलस्तर वाढण्यास मदत होईल.
Jalgaon News: ग्रामरोजगार सेवकांचा एल्गार! २४ महिन्यांचे थकीत …
प्रशासनाने या समस्येकडे त्वरित लक्ष न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ठेचा भाकरी’ आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिला आहे. एरंडोल तहसिलदारांनी गिरणा पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांशी तात्काळ संपर्क साधून शेतकरी प्रतिनिधींसोबत संयुक्त बैठक आयोजित करावी अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.
Jalgaon News: रावेर तालुक्यात नेमकं चाललंय काय? ९ महिन्यांत ९५ …
जर या बैठकीतून पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न तात्काळ निकाली निघाला नाही, तर येत्या काही दिवसांत एरंडोल तालुक्यातील हजारो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन ‘ठेचा-भाकरी’ आंदोलन छेडतील, असा इशाराही
निवेदन देतेवेळी सर्वपक्षीय उपस्थित होते. गुलाबराव वाघ (शिवसेना उपनेते), विजय महाजन (उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेस), कल्पिता रमेश पाटील (जिल्हाध्यक्ष, महिला-श.प. राष्ट्रवादी), सुनील पाटील (तालुकाध्यक्ष, काँग्रेस), किशोर महाले (जिल्हाध्यक्ष, शिवसेना-उबाठा), सुनील पाटील (तालुकाध्यक्ष, प्रहार), उमेश पाटील (तालुकाध्यक्ष, श.प. राष्ट्रवादी), डॉ. राजेंद्र देसले, संजय पाटील (शहराध्यक्ष, काँग्रेस), अब्दुल हक इसाक (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस), मदनलाल भावसार (खजिनदार, काँग्रेस), विशाल सोनार (तालुकाध्यक्ष, मनसे), तसेच जितेन्द्र तांदळे, लीलाधर पाटील, एन. डी. काळकर, सुरेश खैरनार, बापू पवार, दिलीप पाटील, रमेश जमादार, जयेश पिलोरे, दीपक पाटील, हरी राठी, हिंमतराव पाटील, जयेश दाभाडे, नंदू मराठे, शंकर क्षीरसागर, महेश शिंपी, डॉ. सय्यद अली अहमद अली, धनराज क्षीरसागर आदी उपस्थित होते.