Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तांत्रिक विश्लेषणाद्वारे लावला एका रिक्षा चोरट्याचा शोध; दत्तवाडी पोलिसांच्या तपास पथकाची कारवाई

तांत्रिक विश्लेषणाद्वारे पुण्यातील (Pune) एका रिक्षा (Riksha) चोरट्याचा शोध दत्तवाडी पोलिसांच्या (Police) तपास पथकाने लावत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. मांजरी, सोलापूर रस्ता तसेच हडपसर भागात पोलिसांनी तळ ठोकून या चोरट्याला पकडले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 26, 2023 | 03:43 PM
तांत्रिक विश्लेषणाद्वारे लावला एका रिक्षा चोरट्याचा शोध; दत्तवाडी पोलिसांच्या तपास पथकाची कारवाई
Follow Us
Follow Us:

पुणे : तांत्रिक विश्लेषणाद्वारे पुण्यातील (Pune) एका रिक्षा (Riksha) चोरट्याचा शोध दत्तवाडी पोलिसांच्या (Police) तपास पथकाने लावत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. मांजरी, सोलापूर रस्ता तसेच हडपसर भागात पोलिसांनी तळ ठोकून या चोरट्याला पकडले. त्याच्याकडून दोन लाखांची एक रिक्षा जप्त केली असून, त्याने आणखी काही गुन्हे केल्याचा संशय आहे.

सुनील बब्रुवान लांडगे (वय ३१, रा. हडपसर) असे अटक केलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात वाहन चोरीप्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

दोन लाखांची एक रिक्षा जप्त

शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. पण, त्याप्रमाणात पोलिसांना गुन्हे उघडकीस आणण्यात यश येत नसल्याचे वास्तव आहे. यादरम्यान, दत्तवाडी परिसरातून काही दिवसांपुर्वी पार्क केलेली रिक्षा चोरून नेण्यात आली होती. या चोरट्याचा माग काढला जात होता.

दरम्यान, तांत्रिक विश्लेषणाद्वारे चोरटा मांजरी, हडपसर व सोलापूर रस्ता परिसरत फिरत असल्याचे लक्षात आले. त्यानूसार, वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, किशोर वळे, दयानंद तेलंगे पाटील, अमित सुर्वे व त्यांच्या पथकाने या परिसरात दोन दिवस या चोरट्याचा शोध घेतला. पथक दोन दिवस येथे तळ ठोकून संशयित चोरट्याचा व रिक्षाची वाट पाहत होते. पण, तो काही सापडत नव्हता. मात्र, पहाटेच्या सुमारास मांजरी रस्त्यावर नंबर क्रमांक नसलेली नवीन रिक्षा जात असल्याचे दिसून आले. लागलीच पथकाने या रिक्षा पाठलाग करून रिक्षा अडवली व चालकाकडे कागदपत्रांची माहिती विचारली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

रिक्षाची तपासणी केली असता शिट खाली संबंधित रिक्षाची नंबर प्लेट लपवून ठेवल्याचे दिसून आले. त्यानूसार, सुनील लांडगे याला पकडण्यात आले. त्याने यापुर्वीही असे गुन्हे केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानूसार, त्याचा शोध घेतला जात आहे.

Web Title: A rickshaw thief traced through technical analysis action of investigation team of dattawadi police nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2023 | 03:43 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Riksha

संबंधित बातम्या

डिजिटल शिक्षणाला बळ; महाज्योती-वनार्टीच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टॅबलेट वाटप
1

डिजिटल शिक्षणाला बळ; महाज्योती-वनार्टीच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टॅबलेट वाटप

Dadasaheb Gaikwad Scheme: शासकीय योजनेतून मिळालेल्या जमिनीवर परक्यांचा कब्जा? न्यायासाठी पारधी कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न
2

Dadasaheb Gaikwad Scheme: शासकीय योजनेतून मिळालेल्या जमिनीवर परक्यांचा कब्जा? न्यायासाठी पारधी कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Raigad News: माथेरानमध्ये १६ नोव्हेंबरपासून पाणी कपात! आठवड्यातून ३ दिवस पाणी बंद, हॉटेल व्यावसायिकांसमोर नवे संकट
3

Raigad News: माथेरानमध्ये १६ नोव्हेंबरपासून पाणी कपात! आठवड्यातून ३ दिवस पाणी बंद, हॉटेल व्यावसायिकांसमोर नवे संकट

तारळेतील अदानी प्रकल्पावर सयाजी शिंदे आक्रमक; वृक्षतोड आणि वन्यजीवांच्या अधिवासाचा मुद्दा ऐरणीवर
4

तारळेतील अदानी प्रकल्पावर सयाजी शिंदे आक्रमक; वृक्षतोड आणि वन्यजीवांच्या अधिवासाचा मुद्दा ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.