Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कराडच्या उड्डाणपुलाचे काम सुरु असताना दुर्घटना; भलामोठा सेगमेंटच कोसळला

सेगमेंट खाली कोसळल्यामुळे जोरदार आवाज झाला. या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच महामार्गावरून प्रवास करणारे अनेक वाहनचालकही त्याठिकाणी थांबले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 16, 2025 | 08:35 AM
कराडच्या उड्डाणपुलाचे काम सुरु असताना दुर्घटना; भलामोठा सेगमेंटच कोसळला

कराडच्या उड्डाणपुलाचे काम सुरु असताना दुर्घटना; भलामोठा सेगमेंटच कोसळला

Follow Us
Close
Follow Us:

कराड : पुणे-बंगळुरु महामार्गावर कोल्हापूर नाका, कराड येथे उड्डाणपुलावर सेगमेंट बसवताना सेगमेंट कोसळून दुर्घटना घडली. यामध्ये दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आसपास अन्य कर्मचारी व नागरिक नसल्याने मोठी दुर्घटनात टळली. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी गर्दी झाल्याने काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.

नरेंद्र सिंग (वय २८) आणि दिनेश सिंग (वय २९) अशी या दुर्घटनेत जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे-बंगळुरु महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सध्या गतीने सुरू आहे. यामध्ये कराड ते नांदलापूर दरम्यान सहापदरी उड्डाणपूल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याअंतर्गत शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याचा सुमारास कोल्हापूर नाका येथे उड्डाणपुलावर सेगमेंट बसवण्याचे काम सुरू होते.

सेगमेंट बसवण्यासाठी सेगमेंट लाँचर मशीन फिट केल्यानंतर 33 टन वजनाचा सेगमेंट ग्राउंड फ्लोअरला ठेवण्यात आला. यावेळी सेगमेंट लाँचर मशीनचा ऑपरेटर आणि अन्य कर्मचारी सेगमेंटवर उभे होते. त्यानंतर लाँचर मशीनने सेगमेंट उचलण्यास सुरुवात केली. मशीनने सेगमेंट उचलताना तो निसटून खाली कोसळला.

प्रसंगावधान राखत कर्मचाऱ्यांच्या उड्या

सेगमेंटवर उभे असलेल्या दोघांनी खाली उड्या टाकल्या. यामध्ये ते किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेवेळी सदरच्या कामावर असणारे अन्य कर्मचारी व आसपासचे नागरिक त्याठिकाणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

सेगमेंट कोसळल्याने मोठा आवाज

सेगमेंट खाली कोसळल्यामुळे जोरदार आवाज झाला. या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच महामार्गावरून प्रवास करणारे अनेक वाहनचालकही त्याठिकाणी थांबले होते. त्यामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

तज्ज्ञ अधिकारी नव्हते उपलब्ध

उड्डाणपुलावर सेगमेंट बसवताना तो कोसळल्याने मोठा आवाज झाला. यामुळे आसपासचे नागरिक त्याठिकाणी धावल्याने मोठी गर्दी झाली होती. सदर काम चालू असलेल्या ठिकाणी अन्य कर्मचारी व नागरिक नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, सदर सेगमेंट बसवताना त्याठिकाणी तज्ञ अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्याने, तसेच सदर कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली आहे.

– दादासाहेब शिंगण, कराड तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

Web Title: A segment of karad flyover collapsed while work was underway nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2025 | 08:35 AM

Topics:  

  • Bridge
  • Karad news

संबंधित बातम्या

Karad News : पालकमंत्री शंभूराज देसाईंनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती; दिले ‘हे’ महत्त्वपूर्ण आदेश
1

Karad News : पालकमंत्री शंभूराज देसाईंनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती; दिले ‘हे’ महत्त्वपूर्ण आदेश

भररस्त्यात पेटवून घेतल्याने महिलेचा होरपळून मृत्यू; कराडच्या ओगलेवाडी-टेंभू रस्त्यावरील घटना
2

भररस्त्यात पेटवून घेतल्याने महिलेचा होरपळून मृत्यू; कराडच्या ओगलेवाडी-टेंभू रस्त्यावरील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.