Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुष्काळामुळे तुकाराम मुंढेंचे व्याख्यान टाऊन हॉलमध्येच; कराड नगरपरिषदेचा काटकसरीचा निर्णय

Tukaram Mundhe Karad Lecture in Town Hall: कराड तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक खर्च टाळण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांचे व्याख्यान कृष्णाबाई घाटाऐवजी टाऊन हॉलमध्येच घेण्याचा निर्णय कराड नगरपरिषदेने घेतला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 15, 2026 | 07:39 PM
Tukaram Mundhe Karad Lecture

Tukaram Mundhe Karad Lecture

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळाचे भान, खर्चावर नियंत्रण
  • मुंढेंचे व्याख्यान टाऊन हॉलमध्ये गर्दी
  • नियंत्रणासाठी नगरपरिषदेचे नियोजन
कराड: कराड तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर आर्थिक काटकसरीला प्राधान्य देत, आयुक्त तुकाराम मुंढे यांचे व्याख्यान टाऊन हॉलमध्येच घेण्याचा निर्णय कराड नगरपरिषदेने घेतला आहे. यापूर्वी अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन कृष्णाबाई घाटावरील वाळवंटात व्याख्यान आयोजित करण्याचे नियोजन सुरू होते. मात्र, दुष्काळाच्या परिस्थितीत अनावश्यक खर्च टाळण्याच्या दृष्टीने नियोजनात बदल करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी दिली.

पुणे-सासवड मार्गावरील दिवे घाटाला ‘मिसिंग लिंक’ची गरज! वाढती वाहतूक अन् विमानतळाच्या पुरंदर पार्श्वभूमीवर पर्यायी मार्गाची मागणी

कराड नगरपरिषदेच्या शारदीय व्याख्यानमालेतील सातवे पुष्प गुंफण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे शनिवारी, दि. १७ ऑक्टोबर रोजी कराडमध्ये येत आहेत. सायंकाळी सहा वाजता यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल) येथे त्यांचे व्याख्यान होणार आहे. मुंढे यांच्या व्याख्यानाबाबत तरुणाईमध्ये उत्सुकता असून, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

संभाव्य गर्दीचा विचार करून नगरपरिषदेने मुख्य प्रेक्षागृहासह लगतच्या सभागृहात बैठक व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे. तसेच टाऊन हॉल परिसरात स्क्रीन लावून बाहेर उपस्थित असलेल्या नागरिकांनाही व्याख्यानाचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे स्थळ न बदलता उपलब्ध जागेचा अधिकाधिक उपयोग करून गर्दीचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न नगरपरिषदेकडून केला जाणार आहे.

वाहनांऐवजी पायी येण्याचे आवाहन

व्याख्यानाला येणाऱ्या नागरिकांनी शक्यतो खासगी वाहनांऐवजी पायी येण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन नगराध्यक्ष यादव यांनी केले आहे. दुचाकी वाहनांसाठी साई मंदिरासमोरील प्रवेशद्वारातून विठामाता विद्यालयात, तर चारचाकी वाहनांसाठी शिवाजी विद्यालयात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.नागरिकांनी वाहने टाऊन हॉल परिसरात आणू नयेत, निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच वाहने लावावीत आणि वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर खर्चाला मर्यादा घालत व्याख्यानाचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा, यासाठी नगरपरिषदेकडून नियोजन करण्यात येत आहे.

Bombay High Court : मुंबईत दिवाळीला फटाक्यांवर बंदी? डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईट्सबाबतही उच्च न्यायालयाचे दिले महत्वाचे निर्देश

Web Title: Tukaram mundhe karad lecture town hall drought cost cutting pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 07:39 PM

Topics:  

  • Karad
  • Karad news
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Nana Patekar Prayer Meet: नानांना अखेरचा निरोप; तुकाराम मुंढेंसह मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली, बॉलिवूडच्या गैरहजेरीची चर्चा
1

Nana Patekar Prayer Meet: नानांना अखेरचा निरोप; तुकाराम मुंढेंसह मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली, बॉलिवूडच्या गैरहजेरीची चर्चा

FDA चा औषध माफियांना दणका! ६ महिन्यांत ४,७२३ तपासण्या, १,५८१ परवान्यांवर कारवाई; १५ जणांना अटक
2

FDA चा औषध माफियांना दणका! ६ महिन्यांत ४,७२३ तपासण्या, १,५८१ परवान्यांवर कारवाई; १५ जणांना अटक

Karad News : सह्याद्री कारखाना सर्व आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज; बाळासाहेब पाटील यांचा विश्वास
3

Karad News : सह्याद्री कारखाना सर्व आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज; बाळासाहेब पाटील यांचा विश्वास

नियम मोडला की दणका बसणारच! FDA ने Zepto अन् ब्रीजवासीला दाखवले दिवसा तारे, थेट लायसन्स रद्द
4

नियम मोडला की दणका बसणारच! FDA ने Zepto अन् ब्रीजवासीला दाखवले दिवसा तारे, थेट लायसन्स रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.