
सह्याद्री कारखाना सर्व आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज; बाळासाहेब पाटील यांचा विश्वास
माजी सभापती देवराज पाटील, शहाजी क्षीरसागर अजितराव पाटील चिखलीकर, माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, सौ संगीता साळुंखे, तानाजीराव साळुंखे, रवींद्र पवार, सुहास बोराटे, शंकरराव खापे, उद्धवराव बोराटे, प्रणव ताटे, प्रशांत यादव, दाजी पवार, प्रताप चव्हाण आदी उपस्थित होते.
बाळासाहेब पाटील म्हणाले सहकारावर दुष्काळाचे संकट व अभुतपूर्व स्थिती आहे. कराड उत्तरचा भाग दुष्काळाच्या छायेत आहे. धरणाच्या पाण्याची नियोजन होत नाही. मार्च – एप्रिलला पाणी द्यावे लागणार आहे. भविष्यात मोठ्या अडचणी आहेत. सह्याद्रीचा सभासद कारखान्याचा घटक आहे. ऊस गळिताच्या बाबतीत समान न्याय मिळणार आहे. यात भेदभाव केला जाणार नाही. शेतकऱ्यांचा पाण्यावर हक्क आहे. मात्र यात राजकारण जास्त आहे. शासनाने लिफ्टने पाणी देणे कर्तव्य आहे. सह्याद्री कारखान्यात राजकारण नाही.
कांतीलाल भोसले पाटील यांनी सह्याद्री कारखान्यांमुळे वैभव प्राप्त झाले. सह्याद्री जीव की प्राण ठरला आहे. 53 वर्षात कारखाना समृद्धीत आला. साडेबारा हजार मॅट्रिक टन कारखाना सर्वांच्या चिकाटीने चालणार आहे. असे स्पष्ट करून कारखान्याचा लौकिक टिकवा असे आवाहन केले. शहाजी क्षीरसागर, मानसिंगराव जगदाळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यकारी संचालक विश्वजीत शिंदे यांनी प्रास्ताविक केले. दादासाहेब पाटील यांनी सूत्रसंचालन केले. राहुल निकम यांनी आभार मानले.
सह्याद्रीने सभासदांना न्याय दिला. कारखान्याचे नियोजन चांगले आहे. खाजगी कारखान्यांचे आव्हान आहे. खाजगीत न्याय मिळत नाही. सभासदांचा सह्याद्रिवर विश्वास आहे. हा विश्वास सर्वसाधारण सभेत दिसला. दूरदृष्टीतून कारखाना उभारला आहे. कारखान्याचे विस्तारीकरण झाले. राजकारण न आणता कारखाना चालतो. ऊस घालीन तर सह्याद्रीलाच घालीन हा पॅटर्न राबवा.
सह्याद्री कारखान्यावर प्रेम करणारे सभासद आहेत. देवराज पाटील यांच्या म्हणण्यानुसार ऊस घालीन तर सह्याद्रीलाच हा स्लोगन ठरावा. बाळासाहेब पाटील या कर्तृत्ववान व्यक्तीचा हातात सह्याद्री कारखाना आहे. कारखान्याचे विस्तारीकरण महत्वपूर्ण ठरले. कामगारांचा प्रश्न महत्त्वपूर्ण असतो. त्यांची ती जबाबदारी असते. कारखान्याचे कार्यकारी संचालक, अधिकारी, कामगार चांगले काम करतात. संकटाच्या काळात बाळासाहेब पाटील यांच्या मागे रहा.