Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोहोळांचा भ्रष्ट मार्गाने माया जमवण्याचा प्रयत्न, जैन बोर्डिंग हाऊसची जमीन हडपणाऱ्यांना सोडणार नाही; काँग्रेसचा इशारा

मोहोळ हे भ्रष्ट मार्गाने माया जमवण्याचा प्रयत्न करत आहेत पण पुण्यातील हा जमीन व्यवहार रद्द केल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही, असे सपकाळ म्हणाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 20, 2025 | 12:24 PM
मोहोळांचा भ्रष्ट मार्गाने माया जमवण्याचा प्रयत्न, जैन बोर्डिंग हाऊसची जमीन हडपणाऱ्यांना सोडणार नाही; काँग्रेसचा इशारा

मोहोळांचा भ्रष्ट मार्गाने माया जमवण्याचा प्रयत्न, जैन बोर्डिंग हाऊसची जमीन हडपणाऱ्यांना सोडणार नाही; काँग्रेसचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:
  • जैन बोर्डिंग हाऊसच्या बेकायदेशीर विक्रीवरून राजकारण तापणार
  • हर्षवर्धन सपकाळांनी केले गंभीर आरोप
  • जमीन व्यवहार रद्द करण्याची काँग्रेसची मागणी
मुंबई : पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या बेकायदेशीर विक्रीवरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात जैन बोर्डिंग हाऊसची जमीन गोखले कन्स्ट्रक्शनला विकण्यात आली असून, यात मुरलीधर मोहोळांचीही भागीदारी असल्याचा आरोप जैन समाजाकडून कऱण्यात आला आहे. मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या दोन सहकारी बिल्डरांना जैन समाजाची जागा हडपल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. या प्रकरणावरुन आता काँग्रेसही आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावरुन प्रतिक्रीया दिली आहे.

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जागा हडप करण्याचा प्रकार युवक काँग्रेसने उघड केला आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जवळचा संबंध असल्याचे उघड झाले आहे. या जमीन व्यवहारात धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयातून तत्काळ परवानग्या देण्यात आल्या, हे धर्मादाय आयुक्त व मुख्यमंत्री यांचे निकटचे संबंध असल्याचे दिसत आहे तर बँकेकडून एकाच दिवसात कर्जही मंजूर करण्यात आले. मोहोळ हे भ्रष्ट मार्गाने माया जमवण्याचा प्रयत्न करत आहेत पण पुण्यातील हा जमीन व्यवहार रद्द केल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही, असे सपकाळ म्हणाले.

नेमकं काय आहे प्रकरण ?

पुण्यातील शिवाजीनगर येथे असलेल्या जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेवरून तीव्र वाद निर्माण झाला आहे. या परिसरात दिगंबर जैन आणि श्वेतांबर जैन अशी दोन वसतिगृहे आहेत. १९५८ साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी या वसतिगृहांची उभारणी केली होती. अलीकडच्या काही महिन्यांत या जागेवर नवीन विकास प्रकल्प राबविण्याच्या विश्वस्तांच्या प्रस्तावामुळे वाद निर्माण झाला. काही समाजबांधवांनी या विकास योजनेला विरोध दर्शवला होता. मात्र, अलीकडेच ही जागा परस्पर विक्री केल्याचा गंभीर आरोप जैन समाजाकडून करण्यात आला आहे. समाजाच्या म्हणण्यानुसार, धर्मादाय आयुक्त कार्यालयाने या जमीनविक्रीस मंजुरी देताना संबंधित नियम आणि कायद्यांचे उल्लंघन केले. तसेच या व्यवहारात गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचा सहभाग असून, त्या कंपनीचे संबंध खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Web Title: A senior congress leader has made serious allegations on the jain boarding house land

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 12:24 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • murlidhar mohol

संबंधित बातम्या

ओम बिरलानंतर आता मुख्य निवडणूक आयुक्त विरोधकांच्या निशाण्यावर; ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
1

ओम बिरलानंतर आता मुख्य निवडणूक आयुक्त विरोधकांच्या निशाण्यावर; ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव

Indian Politics: काँग्रेस सत्ता गमावणार? ‘या’ राज्यात ऑपरेशन Lotus? मुख्यमंत्री बदलणार अन्…
2

Indian Politics: काँग्रेस सत्ता गमावणार? ‘या’ राज्यात ऑपरेशन Lotus? मुख्यमंत्री बदलणार अन्…

शेतकऱ्यांच्या नुकसानीला मोदी सरकारच जबाबदार, अमेरिकेबरोबर व्यापारी करार केल्यामुळे…; काँग्रेसचा आरोप
3

शेतकऱ्यांच्या नुकसानीला मोदी सरकारच जबाबदार, अमेरिकेबरोबर व्यापारी करार केल्यामुळे…; काँग्रेसचा आरोप

चाकणला प्लॅस्टिकबंदीचा फज्जा, बाजारपेठेत कॅरीबॅगचा सुळसुळाट; कठोर कारवाईची मागणी
4

चाकणला प्लॅस्टिकबंदीचा फज्जा, बाजारपेठेत कॅरीबॅगचा सुळसुळाट; कठोर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.