Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जायकवाडी धरणात दोन मित्रांनी गमावला जीव; सुट्टी असल्यामुळे फिरायला गेले अन्…

पैठण येथील जायकवाडी धरण परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धरण परिसर पाहण्यासाठी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील दोन मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 01, 2026 | 03:42 PM
जायकवाडी धरणात दोन मित्रांनी गमावला जीव; सुट्टी असल्यामुळे फिरायला गेले अन्...

जायकवाडी धरणात दोन मित्रांनी गमावला जीव; सुट्टी असल्यामुळे फिरायला गेले अन्...

Follow Us
Follow Us:

पैठण : पैठण येथील जायकवाडी धरण परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धरण परिसर पाहण्यासाठी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील दोन मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून एका तरुणाचा मृतदेह शोध पथकाला मिळाला आहे. मात्र रात्रीचा अंधार सुरू झाल्याने दुसऱ्या तरुणाचा शोध तात्पुरता स्थगित करण्यात रविवारी आला होता. या तरुणाचा मृतदेह शोधण्यासाठी सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवण्यात येत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील मुकुंदवाडी परिसरातील अंबिकानगर भागात राहणारे सात तरुण रविवारी धरण पाहण्यासाठी व पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पैठण येथे आले होते. यावेळी काही तरुणांना धरणाच्या पाण्यात पोहायचा मोह आवरला नाही. मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने अनिकेत मनू – भारती (वय १९) व संकेत सिद्धार्थ खरात (वय १८) हे दोघे पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले.

सुसाट वाऱ्यामुळे शोधमोहिमेत अडथळे

घटनास्थळी उपस्थित पर्यटकांनी दोघांना वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र पाण्याची खोली अधिक असल्याने त्यांना यश आले नाही. दरम्यान, धरण नियंत्रण कक्षामार्फत माहिती मिळताच पैठण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलाला पाचारण केले. बचाव पथकाने सुरू केलेल्या शोधमोहीमेदरम्यान संकेत सिद्धार्थ खरात याचा मृतदेह सायंकाळी हाती लागला. मात्र अनिकेत मनू भारती याचा शोध सुरू असतानाच परिसरात अचानक सुसाट वारे सुरू झाले आणि अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. अनिकेतचा शोध सोमवारी सकाळी पुन्हा सुरू केला आहे.

अग्निशामक दलाचे मदतकार्य

मृत संकेत सिद्धार्थ खरात व बेपत्ता अनिकेत भारती हे दोघेही शिक्षण घेत होते. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी धरण परिसरात मोठी गर्दी केली होती. युवकांच्या मित्रपरिवारातही शोककळा पसरली आहे. यावेळी पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाचे जवान जबी धांडे तसेच पोलिस ठाण्याचे जमादार राजेंद्र जिवडे, हवालदार राजेश चव्हाण आदींनी शोधमोहीम राबविली.

हे सुद्धा वाचा : पोस्टमार्टमने कसं समजतं मृत्यूचं कारण? जाणून घ्या कशाप्रकारे शरीराचे अवयव देत असतात संकेत…

धरण परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

धरण परिसरात दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. मात्र धोकादायक ठिकाणी पोहण्यासाठी उतरणाऱ्या पर्यटकांमुळे वारंवार दुर्घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर धरण परिसरात अधिक कडक सुरक्षा व्यवस्था, चेतावणी फलक आणि पर्यटकांवर नियंत्रणाची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: A shocking incident has taken place in jayakwadi dam where two youths died

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Death
  • Jayakwadi Dam
  • maharashtra

संबंधित बातम्या

Jalgaon Earthquake Today: जळगाव हादरलं! जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का, नागरिकांमध्ये खळबळ
1

Jalgaon Earthquake Today: जळगाव हादरलं! जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का, नागरिकांमध्ये खळबळ

Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय
2

Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय

नोकरीला निघाले अन् काळाने घातली झडप; खासगी बस-कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू
3

नोकरीला निघाले अन् काळाने घातली झडप; खासगी बस-कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू

FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या अंतर्गत कोणकोणती कार्ये आणि विभाग येतात? सविस्तरपणे जाणून घ्या
4

FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या अंतर्गत कोणकोणती कार्ये आणि विभाग येतात? सविस्तरपणे जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.