Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmers News: 15 दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही; शेवगावच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ

मृग नक्षत्राच्या सुरुवातीला झालेल्या अल्प पावसानंतर शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली. मात्र गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने कपाशीची कोवळी पिके सुकू लागली असून दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. महागडी बियाणे आणि खतांवर खर्च केलेल्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 17, 2026 | 12:44 PM
15 दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही; शेवगावच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ

15 दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही; शेवगावच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ

Follow Us
Follow Us:
  • शेवगाव तालुक्यात कपाशी कोमेजली!
  • १५ दिवसांपासून पावसाची दडी
  • हजारो रुपयांचा खर्च मातीत जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल
पोपट पिटेकर, शेवगाव : मृग नक्षत्राच्या सुरुवातीला झालेल्या किरकोळ पावसानंतर मोठ्या आशेने पेरणी केलेल्या शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आता थेट दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने कपाशीची पिके शेतातच सुकू लागली आहेत. हजारो रुपये खर्च करून कपाशीची लागवड केलेला शेतकरी आता आभाळाकडे डोळे लावून बसला असून, संपूर्ण तालुक्यात चिंतेचे सावट पसरले आहे.

सुरुवातीच्या पावसाने दिली हुलकावणी

चालू हंगामाच्या सुरुवातीला तालुक्यात एक ते दोन दिवस किरकोळ स्वरूपात पावसाने हजेरी लावली होती. जमिनीतील तात्पुरता ओलावा पाहून शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीची घाई केली. पाऊस नियमित पडेल या आशेने हजारो रुपये खर्च करून महागडी बियाणे आणि खते खरेदी केली व पेरणी पूर्ण केली. मात्र, पेरणी होताच पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण गणित पुरते कोलमडले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष, सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही; काँग्रेसचा इशारा

उन्हाच्या तीव्रतेने पिके वाळू लागली

गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाचा पत्ता नसल्याने आणि कडक ऊन पडत असल्याने शेतातील ओल पूर्णपणे नष्ट झाली आहे. अंकुरलेली कपाशीची कोवळी पिके आता कोमेजू लागली असून पानांवर पिवळकी पडली आहे. कपाशी वाचवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे, मात्र पाण्याच्या उपलब्धतेअभावी डोळ्यांदेखत पिके जळून खाक होत असल्याचे भीषण चित्र आहे.

“तीन एकरावर हजारो रुपये खर्च केले, आता काय करायचे?”

“सुरुवातीला पाऊस पडल्याने मी मोठ्या आशेने तीन एकर क्षेत्रावर कपाशीची लागवड केली. बियाणे, खते आणि मशागतीसाठी हजारो रुपयांचा खर्च केला आहे. पण १५ दिवस झाले पावसाचा थेंबही नाही. पिके डोळ्यांसमोर वाळत चालली आहेत. आता पुन्हा पाऊस आला तरी ही पिके वाचतील की नाही यावर शंका आहे. शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.”,  शेवगाव पीडित शेतकरी यलप्पा कुसळकर यांनी माहिती दिली.

दुबार पेरणीचे संकट आणि आर्थिक कोंडी

शेवगाव तालुक्यात कापूस हे मुख्य पीक मानले जाते. जर पुढील दोन-तीन दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येणार हे आता निश्चित झाले आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्याला आता पुन्हा बियाणे आणि खतांसाठी पैसे कुठून आणायचे, हा मोठा प्रश्न सतावत आहे. पुढील २४ ते ४८ तासांत पाऊस न झाल्यास तालुक्यातील शेती अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कराड तालुक्यात खळबळ! ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीच चर खोदून बंद केले शेतरस्ते; संपूर्ण गाव वेठीस, खरीप हंगामातील कामे ठप्प

Web Title: Shevgaon cotton crop dry spell farmers face re sowing crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 12:44 PM

Topics:  

  • Farmers
  • maharashtra
  • Shevgaon

संबंधित बातम्या

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
1

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती
2

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू
3

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू

Maratha Reservation Protest: ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून जाळली, उमरग्यात चार जण ताब्यात
4

Maratha Reservation Protest: ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून जाळली, उमरग्यात चार जण ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.