(फोटो सौजन्य: istock)
कसं समजतं मृत्यूचं कारण?
नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या मेडिकल एक्सपर्ट्सने सांगितले की, शरीरातील प्रत्येच अवयव हा मृत्यूपूर्वीच्या स्थितीबद्दल काही ना काही सांगत असतो. उदाहरणार्थ, जर हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळे, सूज किंवा रक्ताच्या गुठळ्या दिसून आल्या तर व्यक्तीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे मानले जाते. याचबरोबर जर फुफ्फुसांमध्ये पानी भरले असेल किंवा इन्फेक्शन आणि जळजळ होत असेल तर याचा अर्थ व्यक्तीचा गुदमरुन किंवा विषारी वायूने मृत्यू झाला असावा. ब्रेनची तपासणी देखील पोस्टमार्टम चाचणीत महत्त्वाची भूमिका बजावते. जर व्यक्तीच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असेल, किंवा डोक्याला सूज असेल तर एक्सपर्ट्स याला स्ट्रोक किंवा डोक्यावर झालेल्या बाह्य हल्ल्याशी कारण जोडतात. याबरोबरच जर लिव्हर आणि किडनीची स्थिती दर्शवते की व्यक्तीने विषाचे किंवा ड्रग्सचे अतिसेवन केले आहे.
चाचणीत वेळ का लागतो?
खरंतर पोस्टमार्टम करताना फक्त डोळ्याने पाहून कोणताही निर्णय घेतला जात नाही. याच अनेकवेळी अवयव आणि टिश्यूचे काही सॅम्पल घेऊन लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवले जाते. तिथे माइक्रोस्कोप आणि केमिकल टेस्ट केल्यानंतर आजार, इन्फेक्शन, विष किंवा शरीरातील अंतर्गत हानीची माहिती मिळते. हेच कारण आहे की, काही प्रकरणांमध्ये पोस्टमार्टम रिपोर्ट येण्यात आठवड्याभराचा कालावधी लागतो. ब्रिटनच्या रॉयल कॉलेज ऑफ पॅथॉलॉजिस्ट’ आणि ‘ह्युमन टिशू अथॉरिटी’च्या मते, पोस्टमार्टम फक्त मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी नाही तर आजारांना आणखी चांगल्या पद्धतीने समजून घेण्यास आणि भविष्यात त्यावर प्रभावी उपचार करण्यास मदतीचे ठरते.
लहान-सहान गोष्टींचीही तपासणी होते
डाॅक्टर सांगतात की, शरीरावरील लहान-सहान खुणा देखील या रिपोर्टमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. त्वचेचे रंग बदलणे, नखं निळी पडणे, शरीरावर जखमा किंवा गळा दाबल्याचे चिन्ह मृत्यूचे खरे कारण समजून घेण्यास मदत करते. अनेकदा बाहेरील जखमा आणि अंतर्गत अवयवांची स्थिती तपासून मृत्यू नैसर्गिक, अपघाती किंवा गुन्हेगारी स्वरूपाचा होता हे शोधून काढले जाते. पोस्टमार्टम केल्यानंतर, पॅथोलाॅजिस्ट आपला सविस्तर रिपोर्ट तयार करतात ज्यात मृत्यूचे संभाव्य कारण, शरीराच्या आत मिळालेले संकेत आणि लॅब टेस्टचे निकाल यांचा समावेश असतो. हाच रिपोर्ट पुढे पोलिसांच्या तपासात आणि कायदेशीर कारवाईत एक महत्त्वाचा पुरावा म्हणून वापरला जातो.






