Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Wari 2026: ‘माऊलींची सेवा हीच ईश्वरसेवा’; पत्रकार संघाचा पालखी सोहळ्यात सेवाभावी उपक्रम

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यानिमित्त उत्तर कोरेगाव तालुका पत्रकार संघाने तरडगाव येथे वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे वाटप करत सेवाभावी परंपरा जपली. पत्रकार संघाच्या या समाजाभिमुख उपक्रमात पदाधिकारी, सदस्य तसेच स्थानिक मान्यवरांनी सक्रिय सहभाग घेतला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 17, 2026 | 12:37 PM
'माऊलींची सेवा हीच ईश्वरसेवा'; पत्रकार संघाचा पालखी सोहळ्यात सेवाभावी उपक्रम

'माऊलींची सेवा हीच ईश्वरसेवा'; पत्रकार संघाचा पालखी सोहळ्यात सेवाभावी उपक्रम

Follow Us
Follow Us:
  • उत्तर कोरेगाव तालुका पत्रकार संघाची समाजाभिमुख वाटचाल
  • माऊलींच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची तहान भागवून जपली मानवतेची परंपरा
  • उत्तर कोरेगाव पत्रकार संघाच्या उपक्रमाचे कौतुक
कोरेगाव : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यादरम्यान लाखो वारकरी भक्तिभावाने पंढरीच्या वाटेने मार्गक्रमण करत असताना, त्यांच्या सेवेसाठी अनेक सामाजिक संस्था पुढे सरसावत आहेत. याच सेवाभावी परंपरेचा वारसा जपत उत्तर कोरेगाव तालुका पत्रकार संघाने यंदाही वारकऱ्यांसाठी तरडगाव येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी अधोरेखित केली.

पालखी मार्गावर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी स्वतः उपस्थित राहून वारकऱ्यांना थंडगार पिण्याचे पाणी वाटप केले. कडक उन्हात आणि प्रदीर्घ प्रवासामुळे थकलेल्या वारकऱ्यांनी या सेवाकार्याचे मनापासून स्वागत केले. “माऊलींची सेवा हीच खरी ईश्वरसेवा” या भावनेतून पत्रकार संघाच्या सदस्यांनी हा उपक्रम राबविल्याचे यावेळी सांगण्यात आले.

‘ज्ञानोबा माऊली’च्या गजरात चांदोबाच्या लिंबावर माऊलींचा अश्व धावला! आषाढी वारीतील पहिले उभे रिंगण उत्साहात संपन्न

उत्तर कोरेगाव तालुका पत्रकार संघ गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेबरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करत आहे. विविध सामाजिक उपक्रम, जनजागृती मोहीम, रक्तदान शिबिरे तसेच आपत्तीच्या काळात मदतीचा हात देण्याची परंपरा संघाने कायम ठेवली आहे. पालखी सोहळ्यातील हा उपक्रम देखील त्याच समाजाभिमुख वाटचालीचा एक भाग मानला जात आहे.

या उपक्रमामुळे वारकरी संप्रदायातील सेवाभाव आणि पत्रकारितेतील सामाजिक उत्तरदायित्व यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. समाजातील विविध घटकांना एकत्र आणत मानवतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. यावेळी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, रेणुका कंस्ट्रक्शन वाठार स्टेशनचे युवा उद्योजक धनाजी मोहिते, शिवसेना शिंदे गटाचे उप तालुका प्रमुख चंद्रकांत पवार, विकास मतकर, यांनी पत्रकारांच्या या आदर्श उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

२५ ते २८ जुलै: पंढरपुरात मुक्काम (आषाढी एकादशी सोहळा २५ जुलै). नंतर परतीचा प्रवास.
रिंगण सोहळ्यांचे वेळापत्रक रिंगण हे वारीतील सर्वात भावपूर्ण आणि ऐतिहासिक सोहळे आहेत. वारकरी आणि सेवेकरी यात सहभागी होतात.
पहिले उभे रिंगण – १६ जुलै २०२६ (चांदोबाचा लिंब, तरडगाव जवळ)
पहिले गोल रिंगण -२० जुलै २०२६ (पुरंदवडे, माळशिरस)
दुसरे गोल रिंगण – २१ जुलै २०२६ (खुडूस/खडूस फाटा, वेळापूर)
तिसरे गोल रिंगण – २२ जुलै २०२६ (ठाकुरबुवाची समाधी, भंडीशेगाव)
दुसरे उभे रिंगण -२३ जुलै २०२६ (बाजीरावची विहीर, वाखरी)
तिसरे उभे रिंगण – २४ जुलै २०२६ (इसबावी/पंढरपूर प्रवेशादरम्यान, दुपारी)

काही ठिकाणी अतिरिक्त छोटे रिंगण किंवा पारंपरिक सोहळे होऊ शकतात. वेळापत्रकात छोटे बदल होण्याची शक्यता आहे.

चांदोबाच्या लिंब येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पहिले उभे रिंगण; लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने अश्वांची नेत्रदीपक दौड

Web Title: Uttar koregaon taluka patrakar sangh water distribution service for warkaris tardgaon palkhi sohala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 12:37 PM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • Koregaon
  • maharashtra

संबंधित बातम्या

Jalgaon Earthquake Today: जळगाव हादरलं! जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का, नागरिकांमध्ये खळबळ
1

Jalgaon Earthquake Today: जळगाव हादरलं! जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का, नागरिकांमध्ये खळबळ

Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय
2

Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय

नोकरीला निघाले अन् काळाने घातली झडप; खासगी बस-कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू
3

नोकरीला निघाले अन् काळाने घातली झडप; खासगी बस-कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू

FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या अंतर्गत कोणकोणती कार्ये आणि विभाग येतात? सविस्तरपणे जाणून घ्या
4

FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या अंतर्गत कोणकोणती कार्ये आणि विभाग येतात? सविस्तरपणे जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.