Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालिकेच्या ‘पुस्तक घरा’तून बेघर, बेवारस होण्याची पुस्तकांवर वेळ; कर्वेनगरातील करुण घटना

'पुस्तक घरा'तून पुस्तकांनाच बेघर आणि बेवारस होण्याची वेळ आली आहे. पुस्तके रस्त्यावर धूळ खात अवस्थेत पडलेली राजाराम पुलाजवळील ʻपुस्तक घराʼत अशी परिस्थिती दिसून आली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 18, 2024 | 02:22 PM
पालिकेच्या 'पुस्तक घरा'तून बेघर, बेवारस होण्याची पुस्तकांवर वेळ; कर्वेनगरातील करुण घटना

पालिकेच्या 'पुस्तक घरा'तून बेघर, बेवारस होण्याची पुस्तकांवर वेळ; कर्वेनगरातील करुण घटना

Follow Us
Follow Us:

पुणे/ दीपक मुनोत : ‘शांतता पुणेकर वाचत आहेत’ आणि ‘पुणे पुस्तक महोत्सव ‘ असे कार्यक्रम प्रचंड गाजावाजाने सुरू असताना पुस्तकांसाठी असलेल्या ‘पुस्तक घरा’तून पुस्तकांनाच बेघर आणि बेवारस होण्याची वेळ आली आहे. पुस्तके रस्त्यावर धूळ खात अवस्थेत पडलेली राजाराम पुलाजवळील ʻपुस्तक घराʼत अशी परिस्थिती दिसून आली.

पुणे महानगरपालिकेने नगरसेवकांच्या आग्रहाखातर किंवा विशिष्ट योजनांमध्ये त्यांच्या त्यांच्या वार्डामध्ये काही विशेष प्रकल्प सुरू केले आहेत. त्यातीलच एक प्रकल्प हा ʻपुस्तक घरʼ होता. राजाराम पुलाजवळील मातोश्री वृद्धाश्रमाजवळ असेच एक ʻपुस्तक घरʼ काही वर्षांपूर्वी थाटात सुरू करण्यात आले. त्याचे उद्घाटनही चांगल्या थाटामाटात झाले. या पुस्तक घरामध्ये हिंदी, इंग्रजी, मराठी मासिके आणि कथा कादंबऱ्या आदी काही पुस्तके शेल्फ मध्ये ठेवण्यात आली होती.

पुस्तकांची देवघेव करण्यासाठी अल्पकाळ कर्मचारीही नेमण्यात आला होता. परंतु सुरू झाल्यानंतर काही दिवसातच हे ʻपुस्तक घरʼ कुलूप बंद झाले. गेल्या काही काळामध्ये पुस्तकांवर धुळीचे थरच्या थर चढले. पुस्तक संख्या रोडावत गेली. ऊन आणि पावसाच्या माऱ्यात बिचारी उरलीसुरली पुस्तके कुजली आणि केविलवाणी होऊन गेली. त्यांची ती अवस्था पाहून रसिकांना हळहळ वाटली.

कर्वेनगर, नवसह्याद्री सोसायटीसारख्या प्रतिष्ठित भागामध्ये हे पुस्तक घर सुरू करण्यात आले होते‌ मात्र त्याला वाचकांचाही प्रतिसाद मिळाला नसावा. दोन चार दिवसांपासून ‘पुण्यात ‘शांतता पुणेकर वाचत आहेत’ ‘पुणे पुस्तक महोत्सव ‘ अशा साहित्यिक उपक्रमांची गजबज असताना या ʻपुस्तक घराʼतील पुस्तके बेवारस अवस्थेत आणि आणखीन धूळखात रस्त्यावर पडलेली दिसून आली.

हे सुद्धा वाचा : भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यावर होणार कारवाई? शिस्तभंगाची पाठवली नोटीस

पूर्वी येथे असलेल्या पुस्तकांचे काय झालेॽ की ती पळून गेली? की रद्दीत विकली गेली? की कोणी चोरली? या प्रकल्पावर नेमका किती खर्च झाला? ʻपुस्तक घरʼ योजना यशस्वी करण्याची जबाबदारी नेमकी कोणावर होतीॽ त्यांनी कुचराई केली काॽ, असा प्रश्न करदात्या जागरुक पुणेकरांना पडला आहे. आता या पुस्तक घराच्या जागी कोणता दुसरा उपक्रम सुरू होणार की ‘माननीयां’साठी ती जागा अडवून ठेवली जाणार, तेथे काही भलताच धंदा सुरू होणार याविषयी नागरिकांना उत्सुकता आहे.

पुस्तक खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सवाला सुरुवात झाली आहे. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले असून रविवारी मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी या प्रदर्शनाला भेट देत पुस्तक खरेदी केली. जगभरातील साहित्यातील पुस्तके खरेदी करण्यासाठी पुणेकरांची झुंबड उडाली आहे.

Web Title: A shocking pattern of dusty books in the book house has come to light nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 02:19 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम; एमपीएससी आंदोलनाचा आठवा दिवस
1

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम; एमपीएससी आंदोलनाचा आठवा दिवस

Mumbai News: मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई! ४१.५२ कोटींची थकबाकी, इम्पीरियल ग्रँड पॅलेस हॉटेलचा होणार लिलाव
2

Mumbai News: मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई! ४१.५२ कोटींची थकबाकी, इम्पीरियल ग्रँड पॅलेस हॉटेलचा होणार लिलाव

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
3

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
4

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.