Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम; एमपीएससी आंदोलनाचा आठवा दिवस

महाज्योतीच्या परीक्षेदरम्यान नांदेड, पुणे आदी ठिकाणी परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणी आणि गोंधळ झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. संबंधित परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्यात यावी, तसेच संबंधित केंद्रे काळ्या यादीत टाकावीत, अशी मागणी करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 08, 2026 | 11:29 AM
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम; एमपीएससी आंदोलनाचा आठवा दिवस

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम; एमपीएससी आंदोलनाचा आठवा दिवस

Follow Us
Follow Us:
  • गरवारे महाविद्यालयाजवळील एस. एम. जोशी पुल परिसरात आंदोलन सुरू
  • आमदार रोहित पवार यांच्याकडून कारभारावर प्रश्नचिन्ह
  • टीईटी परीक्षेतील गैरप्रकाराचा मुद्दाही आंदोलनस्थळी
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा गुरुवारी आठवा दिवसही गरवारे महाविद्यालयाजवळील एस. एम. जोशी पुल परिसरात सुरू राहिला. आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनावर यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम असून, आयोगाच्या कारभारात शुद्धीकरण आणि परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्याची मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान, महाज्योतीच्या परीक्षेतील गोंधळावरून मंत्री अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणीही आंदोलनात पुढे आली.

आमदार रोहित पवार यांनी आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एमपीएससीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. गरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मोठा आर्थिक संघर्ष करावा लागत असून, परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांचा सर्वाधिक फटका याच विद्यार्थ्यांना बसतो, असे त्यांनी सांगितले. एमपीएससीच्या परीक्षांमध्ये सामान्यीकरणाची (नॉर्मलायझेशन) पद्धत नको, अशी विद्यार्थ्यांची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाज्योतीच्या परीक्षेदरम्यान नांदेड, पुणे आदी ठिकाणी परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणी आणि गोंधळ झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. संबंधित परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्यात यावी, तसेच संबंधित केंद्रे काळ्या यादीत टाकावीत, अशी मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर महाज्योतीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहनही करण्यात आले. महाज्योतीचे विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाल्यास त्यांच्या मागण्यांमध्ये अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणीही समाविष्ट करण्याची भूमिका आंदोलकांनी मांडली.

Travel News : ट्रॅफिकमध्ये अडकलाय आणि ट्रेन सुटणार आहे? टेन्शन घेऊ नका, रेल्वे देते बोर्डिंग स्टेशन बदलण्याची संधी

टीईटी परीक्षेतील गैरप्रकाराचा मुद्दाही आंदोलनस्थळी उपस्थित करण्यात आला. यापूर्वी टीईटी गैरप्रकाराचा तपास करण्यात आला होता; मात्र त्यानंतरच्या घटनांबाबत सरकारने ठोस कारवाई केली का, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडेही सरकारने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनाला नांदेड, जालना, पुणे, नागपूर, अहिल्यानगरसह विविध जिल्ह्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी पाठिंबा दिला. आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

राख सावडण्याचा कार्यक्रम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षांच्या प्रतिकात्मक तिरडी जाळण्यात आली होती. बुधवारी त्याची राख सावडण्याचा कार्यक्रम आंदोलनस्थळी करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आरडा ओरड करून दुःख व्यक्त केले.

शास्त्रीय रस्ता आंदोलन

मी स्वतः एमपीएससीचा विद्यार्थी राहिलो आहे. विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊ नये, ऑब्जेक्टिव्ह पद्धतीत पारदर्शकता राहावी, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. विद्यार्थ्यांचा आवाज विधिमंडळात मांडू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांचे प्रश्न निश्चित सोडवतील. आगामी अधिवेशनातही त्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही पुढाकार घेऊ.

  • अमित गोरखे, विधान परिषद आमदार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विद्यार्थ्यांबद्दल आपुलकी आहे. ते कायम विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात. एमपीएससीच्या प्रश्नासाठी आयुक्त व्हि. राधा यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली असून तिचे काम सुरू आहे. सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास आहे. मात्र, रोहित पवार यांच्यासारखे नेते विद्यार्थ्यांना भरकटवून राजकीय वापर करत आहेत, ते त्यांनी थांबवावे.
  • जगदीश मुळीक, माजी आमदार

Web Title: Students are firm on their demand for the resignation of the mpsc chairman vivek bhimanwar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • mpsc news
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद
1

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद

Ratnagiri News : केंद्रीय विद्यालय आणि MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर महायुती सरकार सकारात्मक; उदय सामंतांची विरोधकांवर टीका
2

Ratnagiri News : केंद्रीय विद्यालय आणि MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर महायुती सरकार सकारात्मक; उदय सामंतांची विरोधकांवर टीका

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव
3

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव

पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल
4

पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.