File Photo : BJP
सोलापूर : भाजपचे विधान परिषदेचे सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत भाजपने त्यांना शिस्तभंगाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबत सात दिवसात लेखी स्वरुपात स्पष्टीकरण देण्याचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
रणजिंतसिंह मोहिते पाटील यांच्यावर काय आरोप करण्यात आले?
राम सातपुतेंची टीका
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीका केलीय. रणजितसिंह मोहिते पाटलांना जनाची नाही तर मनाची लाज असेल तर त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा, असा हल्लाबोल राम सातपुते यांनी केला. मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांचा दिवा विझायला लागला आहे. उत्तम जानकर यांनी राजीनामा देऊन कशावर हवे त्यावर निवडणूक लढवावी, मी लढायला तयार आहे असे आव्हान राम सातपुते यांनी दिलं आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांना जनाची नाही तर मनाची लाज असेल तर त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा असा टोलाही राम सातपुते यांनी लगावला.
हे सुद्धा वाचा : भुजबळांच्या समर्थनार्थ ओबीसी समाज आक्रमक; अजित पवारांना दिला गंभीर इशारा
सातपुतेंनी केली होती मागणी
रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उत्तमराव जानकर यांचा उघड प्रचार केला आहे. माझी पत्नी ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला गेली तिथं ट्रॅक्टर रस्त्यात आडवे लावून यांनी रस्ता आढावल्याचे देखील सातपुते म्हणाले. आमच्या कार्यकर्त्यांचं रक्त सांडलं आहे, त्यामुळे तत्काळ रणजितसिंह मोहिते पाटील यांची हकालपट्टी करा असे राम सातपुते म्हणाले होते. यांनी माझ्या कार्यकर्त्याला जबर मारहाण केली आहे. त्यांनी उत्तमराव जानकर यांचा उघड प्रचार केल्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले असल्याचे राम सातपुते म्हणाले होते.






