Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Eknath Shinde: शेतकरी संकटात असताना सरकार मदत करताना हात आखडता घेणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणीतील मेळाव्यात दिली. शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवून कर्जपुनर्गठनासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 07, 2026 | 05:56 PM
शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Follow Us
Follow Us:
  • बळीराजाला मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे परभणीतील मेळाव्यात आश्वासन
  • संकटकाळात शिवसेनेचा १०० टक्के समाजकारणाचा निर्धार
  • कर्ज वसुली थांबवू, कर्जपुनर्गठन करण्याची ग्वाही
  • पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या २५ वर्षाच्या सेवा पर्वानिमित्त शिवसेनेचा उपक्रम
परभणी: दुष्काळाच्या संकटात राज्यातील गोरगरिब शेतकरी आणि लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडणार नाही. बळीराजाला मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही, असे आश्वासन शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. परभणी जिल्ह्यातील गांधी पार्क मैदानावर झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. संकटकाळात शेतकऱ्यांची कर्ज वसुली थांबवू, कर्जपुनर्गठन करु तसेच चाऱ्याची व्यवस्था करु. संकटात शेतकऱ्यांसाठी शिवसेना १०० टक्के समाजकारण करण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला. (Eknath Shinde)

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या २५ वर्षाच्या सेवा पर्वानिमित्त शिवसेना राज्यभरात सेवा से समर्पण ही गौरव यात्रा काढणार आहे. या उपक्रमाची सुरुवात आज परभणी जिल्ह्यातून झाली. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या मुलांना २५०० सायकली आणि लाडक्या बहिणींना २५०० शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज दुष्काळाचे सावट आहे. लाडका भाऊ आणि लाडकी बहिण संकटात असल्याची आपल्याला जाणीव आहे. दुष्काळाच्या सावटात बळीराजाला आणि त्याच्या कुटुंबाला शिवसेनेच्या माध्यमातून काही ना काही मदतीचा हात दिला पाहिजे, आधार दिला पाहिजे हा संकल्प आम्ही केलाय, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शिवसेनेकडून सेवा से समर्पण ही गौरव यात्रा सुरु झाली असून यात २५ हजार सायलकी, २५ हजार शिलाई मशीन, शेतकऱ्यांना आनंदाचा शिधा, गरजू वस्तूंचे वाटप, सामुदायिक विवाहांचे आयोजन केले जाईल, असे ते म्हणाले. दुष्काळाचे संकट जरी असले तरी राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

ते पुढे म्हणाले की पंतप्रधानांनी व्यस्त दिनक्रमातही एक तास चर्चा केली. यात अर्धा तास पंतप्रधानांनी राज्यातील दुष्काळावर, लाडक्या बहिणींवर चर्चा झाली. यावर पंतप्रधानांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले, असे ते म्हणाले. दुष्काळाचे संकट मोठं आहे. राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं आहे. बळीराजाला कधी वाऱ्यावर सोडलं नाही. आताही सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. राज्याचे सर्व मंत्रिमंडळ बांधावर गेले. शेतकऱ्यांची कैफियत ऐकली. त्यांना धीर देण्याचे काम केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे. राजकारण न करता सगळ्यांनी शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी काम केलं पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व राजकीय पक्षांना केले. राजकारणासाठी इतर व्यासपीठ आहेत पण या संकटकाळात शिवसेना ८० टक्के नव्हे तर १०० टक्के समाजकारण करेल, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी या कसोटीच्या काळात हार मानू नये, खचून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ते पुढे म्हणाले की, २०१४ नंतर देश आर्थिक महासत्तेकडे चालला आहे. भारताची अर्थव्यवस्था १० व्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केले. नेशन फर्स्ट या हेतून मोदीजी काम करत आहे. मुख्यमंत्री ते प्रधानमंत्री अशी सार्वजनिक जीवनातील २५ वर्ष मोदीजी यांनी पूर्ण केली. विरोधकांनी कितीही आरोप केले तरी मोदीजी डगमगले नाहीत. पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याचे काम पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भारताने केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Poonam Estate Navratri: बकरी ईदच्या वादानंतर पूनम इस्टेटमध्ये नवरात्रोत्सवावरून नवा वाद; 120 कुटुंबांची परवानगीची मागणी

Web Title: Eknath shinde assures full support to farmers loan recovery to stop parbhani rally sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 05:56 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Farmers
  • maharashtra

संबंधित बातम्या

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक
1

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती
2

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती

Poonam Estate Navratri: बकरी ईदच्या वादानंतर पूनम इस्टेटमध्ये नवरात्रोत्सवावरून नवा वाद; 120 कुटुंबांची परवानगीची मागणी
3

Poonam Estate Navratri: बकरी ईदच्या वादानंतर पूनम इस्टेटमध्ये नवरात्रोत्सवावरून नवा वाद; 120 कुटुंबांची परवानगीची मागणी

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला United Breweriesचा मोठा हातभार! ₹4200 कोटींचा कर महसूल आणि स्थानिक खरेदीला गती
4

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला United Breweriesचा मोठा हातभार! ₹4200 कोटींचा कर महसूल आणि स्थानिक खरेदीला गती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.